Id SKU Name Cover Mp3
Jagannath Shankar Sheth


200.00 350.00
Download Bookhungama App

ना. जगन्नाथ शंकरशेठ -

Description:

ना. जगन्नाथ शंकरशेठया महानगरी मुंबईचे शिल्पकार कोण? असा प्रश्न केला तर कोणीही प्रथम नाव घेईल ते नाना शंकरशेट म्हणजेच जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटेयांचेच. १० फेब्रुवारी १८०३ रोजी जन्मलेल्या नानांनी पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली.

त्यांना सार्वजनिक कार्याची आवडहोती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रियसहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीसत्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्हएज्युकेशन सोसायटी”, “सर जे. जे. स्कूल ऑफआर्टस“, “एल्‌फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्‌सलिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेशहोता. मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांचीच दुरदृष्टी होती.

१८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेण्याच्या ध्यासापायी त्यांनी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली आणि नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली.

नानांनी इंग्रजांच्या व राजाराममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातकआहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले.

मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्यालत्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्याई जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना “आधुनिक मुंबईचा शिल्पकार” तसेच “भारतीयरेल्वेचे जनक” समजण्यात येते.

अशा या द्रष्ट्या आणि महान व्यक्तिमत्वाची ओळख Audio Book द्वारे.....

 


Format:

Publisher: Zankar Audio Cassettes