100 250
Download Bookhungama App

इस्रायलः युद्ध, युद्ध आणि युद्धच! - वि. ग. कानिटकर

Description:

ज्या कणखरपणे गेली अनेक वर्षे इस्रायलने मध्य पूर्वेतील इस्लामी धर्मांध आक्रमकांचा मुकाबला केला, त्याची समग्र ओळख सर्वांना असावी हाच या इतिहास निवेदनामागील हेतू आहे. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने...

‘युद्धातून युद्धाकडे’ ही लेखमाला सुरुवातीला ‘माणूस’ साप्ताहिकातून छापून येत होती. नंतर आपल्या ‘प्रपंच’ मासिकातून ही लेखमाला पूर्ण करणारे श्री. माधव कानिटकर यांनी ‘इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच’ हे जास्त अनुरूप नाव सुचविले. मी ते स्वीकारले आणि या नावाने पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८७ मध्ये प्रकाशित झाली.

ज्यू धर्मियांनी शतकानुशतके जगभर होणारी अवहेलना व छळ यातून मुक्त होण्यासाठी ‘इस्रायल’ हा स्वतःचा देश अस्तित्वात आणण्यात यश मिळविले. शेजारच्या अरब देशांबरोबर शांततापूर्ण सहजीवन व अभ्युदयाची स्वप्ने पाहण्यापूर्वीच त्यांच्या देशावर चहुबाजूंनी आक्रमण झाले. 

ज्या कणखरपणे गेली अनेक वर्षे इस्रायलने मध्य पूर्वेतील इस्लामी धर्मांध आक्रमकांचा मुकाबला केला, त्याची समग्र ओळख सर्वांना असावी हाच या इतिहास निवेदनामागील माझा हेतू होता. 

इस्लामी देशांची मनोवृत्ती ध्यानात घेतली तर त्यांनी सुरू केलेले धर्मयुद्ध सतत चिघळत जाईल व तपावर तप गेली तरी इस्रायलला शांतता लाभणार नाही असे दिसते. यामुळे आता १७ वर्षांनंतर पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना पुस्तकाचे नाव ‘इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच’ हे उचितच ठरले आहे.

या आवृत्तीतील उत्तरार्ध लिहिताना १९८७ (पहिली आवृत्ती) ते २००२ या कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मी घेतला आहे. यासाठी आवश्यक ते संदर्भ मिळविण्यासाठी तीन मित्रांनी बहुमोल मदत केली. शास्त्रीय विषयाचे ज्येष्ठ लेखक श्री. निरंजन घाटे यांनी मला या कालखंडातील इंग्रजी नियतकालिके उपलब्ध करून दिली. माझे तरुण स्नेही डॉ. प्रसाद दाढे यांनी कॉम्प्युटरवरून, इंटरनेटवरून मला आवश्यक ती माहिती खूप कष्ट करून मिळवून दिली. माझे इस्रायलमधील अनेक वर्षांचे स्नेही श्री. शालोम चिंचोळकर यांनी इस्रायलमध्येच उपलब्ध असलेली अनेक प्रकाशने, पुस्तके तत्परतेने माझ्यासाठी खरेदी करून मला भारतात आणून दिली. या सर्व मित्रांचा याबद्दल मी अतिशय आभारी आहे. 

यांच्या मदतीशिवाय ही अद्ययावत आवृत्ती शक्य झाली नसती.

- वि. ग. कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि