Id SKU Name Cover Mp3
इन्स्पेक्टर जयंत वागळे यांच्या सत्यकथा


60 116
Download Bookhungama App

इन्स्पेक्टर जयंत वागळे यांच्या सत्यकथा - सौ. मेधा तेलंग

Description:

३० सप्टेंबर १९७३ रोजी दुपारी दोन वाजता यल्लम्मा नेहमीप्रमाणे आपल्या तान्ह्याला घेवून कर्जतला निघाली. ज्या इसमाकडून नियमितपणे ती तांदूळ घ्यायची तो इसम बाहेर गेला होता, म्हणून त्याची वाट पाहात तिला कर्जतला संध्याकाळचे ७.३० वाजले. पंधरा किलो तांदूळ तिने घेतले. झपाझप पावले टाकीत ती कर्जत स्टेशनवर पोहोचली.यल्लम्माऽऽ ओऽऽ यल्लम्मा “शंकऱ्या! बस् कर. एकापेक्षा जास्त ग्लास नाय, समजलं?” प्यायला बसलेल्यापैकी एकाने शंकरला दरडावून सांगितलं. तो त्यांचा मुख्य वाटला. “का माहित हाय? च्यायला पैका संपला, मालकाने भडव्याने उधार देणं बंद केलं.” त्या गटात ते चौघेजण होते. त्यांचे डोळे लाल झाले होते. “आता कोणती शिकार मिळते त्यावर आपलं पिणं अवलंबून, चला चला... इथे बसून काय ग्लासं फुकटची भरणार आहेत थोडीच...?” त्यांचा मुख्य... प्रफुल्ल त्याचं नाव... काऊंटरवर गेला, टेबलावर पैसे आपटले, “मदन्या साल्या उधारी बंद करतोस काय? हे घे आताचे पैसे... आणि हे पन्नास रुपये निराळे देतो, हे उधारीचे काय चाळीस पंचेचाळीस झाल्यात ते... साल्या आमच्यामुळे धंदा चालतोय तुझा... उधारी बंद करतोस काय? तीन धंदेवाले तुझ्या बाजूला हायत... किती?... तीन! तरीपण तुझ्याकडे येत होतो... का? आमचा यार म्हणून ना! नशा चढली तुला... वा!! म्हणे उधारी बंद... मदन्या, परत येतो, जरा थांब...” असं म्हणून प्रफुल्ल, त्याचे साथीदार निघून गेले. चौघेजण करी रोड स्टेशनवर गेले. साध्या वर्दीतल्या पोलीसांसारखे वाटत होते. “हऱ्या”, एकजण म्हणाला, “साल्या अजून लांब मिशा ठेव ना मग खरा सखाराम दिसशील. पोलिसची भरती चालू आहे. अजूनही ट्राय कर. उंची, बॉडी फर्स्टक्लास आहे तुला. मग काय मालामाल.” प्रफुल्लची नजर इकडे तिकडे फिरत होती. एक प्रौढ इसम पत्र्याची पेटी व बेडींग घेवून प्लॅटफॉर्मवरून बाहेर जाण्याच्या दिशेने निघाला होता. “शंकऱ्या, तू नि पांडू घे त्याला. आम्ही चलतो दुसऱ्या शिकारीला. शिंच्यानो, हात हालवित येवू नका, खिसा एकदम खाली हाय...” हऱ्या व प्रफुल्ल पुढे गेले. स्टेशनबाहेर आल्यावर शंकर व त्याच्या जोडीदाराने त्या प्रौढ इसमाला थांबविलं व पोलिसाच्या रुबाबात सिगारेटचे झुरके मारत शंकर बोलला, “थांबा हो मालक! बॅग उघडा आधी” “काही नाही बॅगेत हवालदार साहेब; माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, तिला पाहायला आलो.” “सगळेच असं म्हणतात.” साथीदाराकडे बघून “काय रे ह्याचा कितवा नंबर हॉस्पिटलचं निमित्त सांगायचा? काही नाही, तुम्ही असं करा, पोलीस स्टेशनलाच चला...”


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि