90 150
Download Bookhungama App

हिटलरचे महायुद्ध - वि. ग. कानिटकर

Description:

दुसऱ्या महायुद्धाचा चित्रमय इतिहास, अगदी कमीत कमी निवेदनासह आता इ-बुक स्वरुपात.प्रयोजन

दुसऱ्या महायुद्धाचा चित्रमय इतिहास, अगदी कमीत कमी निवेदनासह वाचकांना उपलब्ध करावा हा या पुस्तकामागचा माझा हेतू आहे. या इतिहासात शिरण्यापूर्वी ज्या व्यक्तीमुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे हे महायुद्ध भडकले, त्या अॅडॉल्फ हिटलरची चरित्ररेखा व जागतिक राजकारणाचा आलेख सुरवातीलाच संदर्भासाठी द्यावा हे संयुक्तिक वाटल्याने या पुस्तकाचा पहिला भाग हा मी नंतर तयार केला. याला आणखीही एक कारण होते.

गेल्या काही वर्षांत, हिटलरच्या जीवनातील बारीकसारीक तपशील नव्याने प्रकाशात आले आहेत. एप्रिल १९७६ ते जून १९७६ या काळात मला अमेरिका व इंग्लंडची सफर करण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील १४-१५ शहरांत व लंडनमध्ये मला वास्तव्य करता आले. या शहरांतील पुस्तकांच्या दुकानातून फिरताना माझ्या लक्षात आले की दुसऱ्या महायुद्धावर व हिटलरच्या जीवनावर नवी नवी पुस्तके सतत लिहिली जात आहेत व ती लाखांनी खपत आहेत. अनेक पुस्तके मी परत येताना बरोबर आणली. त्या पुस्तकांचा भरपूर उपयोग मी केलेला आहे.

माझे प्रकाशक मित्र श्री. . . भावे यांनी या पुस्तकाचा पहिला भाग तयार करताना मला खूपच साहाय्य केले आहे. परदेशातून आणलेली सर्व पुस्तके मी त्यांच्या हवाली केली, कारण ते स्वतः नवीनहिटलरचरित्र प्रसिद्ध करीत होते. त्यांनी विस्तारपूर्वक लिहिलेल्या चरित्रातील भरपूर तपशील, मला माझ्या पहिल्या भागातील निवेदनात समाविष्ट करता आल्याने माझे काम सोपे झाले; व हे पुस्तक कमीत कमी वेळात तयार होऊ शकले. त्यांचा मी फार आभारी आहे.

माझा तरुण लेखक-मित्र रवींद्र गुर्जर हा या पुस्तकासह प्रकाशनाच्या व्यवसायात येतो आहे. त्याला हे पुस्तक प्रकाशित केल्याचा पश्चाताप होणार नाही, एवढीच आशा मी बाळगून आहे.

 

वि. . कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि