100 218
Download Bookhungama App

हिटलर - ह. अ. भावे

Description:

जर्मनीतील हुकुमशाही एका व्यक्तीच्या हिटलरच्या अधिकारलोभातून निर्माण झाली आणि परिणामी सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या अग्नि दिव्यातून जावे लागले असे हुकूमशहा कसे निर्माण होतात व परिस्थितीही त्यांना कसे निर्माण करते याचे सखोल विवेचन या चरित्रात्मक पुस्तकात केलेले आहे.



प्रस्तावना हुकुमशाही कशी उत्पन्न होते याचा अनुभव आपल्या देशाने नुकताच घेतला. सुदैवाने ही हुकुमशाही थोड्याच कालावधीत संपली. जर्मनीतील हुकुमशाही एका व्यक्तीच्या हिटलरच्या अधिकारलोभातून निर्माण झाली आणि परिणामी सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या अग्नि दिव्यातून जावे लागले असे हुकूमशहा कसे निर्माण होतात व परिस्थितीही त्यांना कसे निर्माण करते याचा आलेख पुन्हा एकदा मांडणे हा या चरित्रात्मक पुस्तकाचा हेतू आहे. हिटलरने जगावर लोटलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास हा या पुस्तकाचा विषय नाही. हिटलर आणि त्याचे व्यक्तिमत्त्व हे केंद्र कल्पूनच या पुस्तकाची रचना केलेली आहे. हिटलरबद्दल जो दृष्टिकोन किंवा मत या पुस्तकात मांडले आहे ते पुस्तक वाचून समजेलच. प्रसंग नाट्यमय करून सांगणे याला पुस्तकात प्राधान्य नाही. नसलेले नाट्य निर्माण करण्याचाही प्रयत्न नाही. प्रखर वास्तवता कृत्रिम नाड्यापेक्षाही जास्त प्रत्ययकारी असते हे वाचकांना जाणवेल.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)