Id SKU Name Cover Mp3
हेल्पलाईन परीक्षेची


80 174
Download Bookhungama App

हेल्पलाईन परीक्षेची - स्वाती धर्माधिकारी

Description:

परीक्षे दरम्यान निर्माण होणाऱ्या ताणतणावांना कसे हाताळावे ह्याचे मार्गदर्शन करणारे उत्कृष्ठ पुस्तक. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे नव्हे तर पालकाना सुद्धा ह्यात उपयुक्त माहिती...सुचना उपलब्ध होतील. Quick help to the students who undergo huge stress during the period of Examination. The book is not only excellent for students for it is highly helpful to the parents as well. "प्रकाशकाचे मनोगत साधारणतः फेब्रुवारी उजाडला की आपल्या घरांमधले वातावरण जरा तंग होते. दूरदर्शन संच बंद होतात. रात्री दिवे जळू लागतात आणि पहाटे सुद्धा ते प्रकाशु लागतात. मुलांच्या चेहऱ्यावर तणाव दिसतोच..पण त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर सुद्धा तो अतोनात दिसू लागतो. एकूणच युद्धसदृश्य वातावरण घराघरांमध्ये जाणवू लागत.  ह्याचे एकमेव कारण... येऊ घातलेली परीक्षा! आपल्या शिक्षण पद्धतीचा तो आत्मा आहे.  विषय समजून घेण्यापेक्षा घोकमपट्टी करून स्मरणशक्तीच्या जोरावर कागदावर सर्व उतरवून काढायचे आणि मार्क मिळवायचे अशी ही शिक्षण पद्धती. आणि सर्व ताणतणावांच्या मुळाची जरी हि सदोष शिक्षण पद्धती असली तरी ती बदलणे आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर ह्या ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देणे. आणि हाच ह्या पुस्तकाचा हेतू आहे...मध्यवर्ती गाभा आहे. प्रा. स्वाती धर्माधिकारी ह्या मानसशास्त्रद्न्य आहेत.  तिरपुडे  कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपूर इथे त्या मानसशास्त्राच्या विभागप्रमुख आहेत. त्या खूप नावाजलेल्या समुपदेशक सुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विषयक अनेक समित्यांवर त्या कार्यरत आहेत. अनेक शहरांमधून त्यांची व्याख्याने होत असतात. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्या मानसशास्त्राच्या अनुषंगाने स्तंभलेखन करीत असतात. हेल्पलाईन परीक्षेची हे पुस्तक प्रथम छापील  स्वरूपात प्रसिद्ध झाले आणि हातोहात त्याची विक्री झाली. त्यातूनच जाणीव झाली कि जरका महाराष्ट्राच्या कानोकपारी ते पोचवायचे असेल तर ई-बुक खेरीज दुसरा पर्याय नाही. सृजन ने तरुण पिढीशी आणि त्यांच्या पालकांशी असलेल्या आपल्या बांधिलकीची जाणीव ठेवूनच हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.  तुम्ही सर्व त्याचा भरपूर उपयोग कराल अशी सृजन ला खात्री आहे,   सृजन  


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि