60 116
Download Bookhungama App

हे मित्रवर्या - रा. ग. जाधव

Description:

‘हे मित्रवर्या’ हा कविता संग्रह म्हणजे रा. ग. जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पवित्र स्मृत्यर्थ लिहिलेल्या ६७ चिंतन कविता. ‘He Mitravarya’ is a compilation on 67 musing poems written by R. J. Jadhav in the memory of social activist late Dr. Narendra Dabholkarप्रस्तावना  वयाच्या अवघ्या ६८व्या वर्षी दाभोलकर गेले. तहहयात समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी दाभोलकर झटले. ‘साधना’च्या संपादकपदी असताना साधना साहित्य संमेलने, शेकडो विशेषांक, बालकुमार दिवाळी अंकाच्या लाखोच्या खपाचा प्रयोग, साधना मिडिया सेंटर, साने गुरुजी सभागृह असे अनेक उपक्रम, चळवळी डॉक्टरांनी राबवल्या. हे करत असताना आत्म प्रशंसा कायम त्याज्य मानली. ग्रामीण-शहरी भागात कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले. सर्वांशी मृदुपणे बोलणे, समान वागणूक देणे, संयमाने शांतपणे आपला मुद्दा पटवून देणे अशा व्यक्तिमत्व विशेषामुळे डॉक्टरांची लोकप्रियता वाढली मात्र डॉ. आत्मप्रौढी पासून कायम अलिप्त राहिले. सर्वांशी मित्रत्वाने वागणाऱ्या डॉक्टरांच्या विचारांशी शत्रुत्व असलेल्या समाजकंटकांनी मात्र त्यांची हत्या केली. डॉ. या अकाली जाण्याने निर्माण झालेल्या उद्विग्नतेला रा. ग. जाधव यांनी या कवितांमधून वाट करून दिली आहे.


Format: Adaptive

Publisher: साधना (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)