60 114
Download Bookhungama App

हरिण बालक - भा.रा.भागवत

Description:

प्रस्तुत पुस्तक म्हणजे मार्जोरी किनन रॉलींग्ज् यांच्या ‘द ईअरलिंग’ या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद आहे.मनोगत प्रिय वाचक, स. न. जगातल्या विविध भाषांमधल्या, सर्व वयोगटातील वाचकांना रुचेल, अशा उत्तम साहित्याचे रुपांतर मराठी भाषेत आणावे अशी कल्पना मनात होतीच. त्या मालेतील पहिलेच पुस्तक ‘द ईअरलिंग’सारखी कादंबरी व भाषांतर कै. भा. रा. भागवत यांचे असावे हा सुयोगच म्हणला पाहिजे. बालवाङ्मय म्हणजे काय हे मराठीत माहितही नव्हते, तेव्हा भा. रां. नी नाना भाषांमधली, वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांची रुपांतरे केली, मुला-मुलींना नायक बनवून स्वातंत्र्यलढ्यापासून सागरी मोहिमांपर्यंत विविध धाडसांमध्ये सहभागी केले. मराठीत तर नाहीच, पण जगातल्या कोणत्याही भाषेत एकाच लेखकाने इतक्या विविध विषयांवर, नाना प्रकारे, एकहाती इतकी समृद्ध भर घातली असेल असे वाटत नाही. त्यांना मराठी बालसाहित्याचे भीष्माचार्य म्हटले जाते, पण खरे तर त्यांना मराठी बालसाहित्याचे व्यासमुनीच म्हटले पाहिजे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे मार्जोरी किनन रॉलींग्ज् यांच्या ‘द ईअरलिंग’ या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वीच्या अमेरिकेच्या जंगलात एक मुलगा त्याच्या आईबापासोबत राहतो आहे. त्याला मित्र-मैत्रिणी, शेजार नाही, त्यामुळे आपले स्वतःचे, एकट्याचे मालकीचे काहीतरी असावे ही तीव्र इच्छा त्याला आहे. त्यातूनच त्याला एक पाडस पाळायला मिळते. त्याची ही कथा. पण ही फक्त हरीण व बालकाची गोष्ट राहत नाही. तर तो मुलगा, त्याचे कुटुंब, त्यांचे राहणे, सारे जगणे आपल्यापुढे साक्षात उभे राहते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणवाद (Ecology) हा शब्दही तयार झाला नव्हता, तेव्हा लेखिकेने मानव व निसर्ग यांचे आदर्श संबंध कसे असावेत हे कादंबरीतील पेनी बॅक्स्टरच्या व्यक्तीरेखेतून दाखवून दिले आहेत. भा. रां. नी त्यांच्या नेहमीच्या ओघवत्या, सरळ शैलीत मूळच्या प्रदीर्घ कादंबरीचा आत्मा नेमका पकडला आहे. मूळ भाषातरांमधील भाषा व जुने शुद्धलेखन यांचा वापर या आवृत्तीत केला आहे. भाषांतर जास्त चांगले व्हावे यासाठी आवश्यक ते बदल मात्र केले आहेत. - प्रकाशक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि