60 116
Download Bookhungama App

हरवलेला गाव - डॉ. बाबुराव उपाध्ये

Description:

डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘हरवलेला गाव’ या कथासंग्रहातील कथा ह्या ग्रामीण जीवनावर आधारित, तिथल्या सामाजिक समस्या, स्त्री-जीवन, गरिबी, जगण्याची धडपड यांचे चित्रण करणाऱ्या कथा आहेत. ‘Harvalelaa Gav’ Stories Written by Dr. Baburao Upadhye is based on rural life, social issues, women’s life, poverty and struggle of survival.प्रस्तावना प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये हे माझे गुरुबंधू. त्यांच्या 'हरवलेला गाव' ने मला अंतर्मुख केले. पारंपरिक कथेपेक्षा या कथा वेगळ्या वाटल्या. मनात ठसल्या. कथांबद्दल चिमटीत पकडला जाणारा मुद्दा माझ्याकडे नाही पण सगळ्या कथा मात्र मनात झिरपल्या. प्राध्यापकीय नात्यांपेक्षा त्यांचे, माझे नाते वेदनाच्या जवळीकतेने अधिक आहे. त्यांचा जीवन प्रवास परिश्रमाचा आहे. म्हणून त्यांच्या कथा मला माझ्या माणसांच्या कथा वाटल्या. डॉ. उपाध्ये कुंभार समाजातले, त्या दृष्टीने काही कथा येथे लक्षणीय आहेत. 'पणत्या' ही कथाचित्र दर्शी आहे. हृदय पिळवून टाकणारी. अपेक्षाभंगाचे ओझे वाहणारा मुलगा त्या कथेचा नायक आहे. ''कुंभारानं माती मळता मळता माती आड व्हायचं'' हे त्या कथेतील मनस्वी दुःख आहे. 'देणगी' कथेत गल्लीतल्या कुत्र्यांसारखी देणगी मागायला आलेली पोरं अंगावर येतात. आणि गावाच्या हरवलेपणात अधिक भर घालत जातात. मानवी जीवनातील अनेक गुंते या गावाच्या नजरेत भरतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे असेल, तर शिक्षक आदर्श हवेत असा विचार 'गुरूदक्षिणा' ही कथा सांगते. ओल्या मातीला आकार देणारी स्त्री आईच असते. हे 'आई' कथेतून जाणवते. सत्य, सुंदर आणि सौंदर्य ही या कथांची बेरीज आहे. उपमा, अलंकार, म्हणी, ग्रामीण बोली यांनी या कथा बहरल्या आहेत. या कथासंग्रहात देवावर श्रद्धा ठेवणारा काभू आहे. गावाच्या कल्याणासाठी मरण पत्करणारी ‘कौशी' आहे. गरिबीशी मुकाबला करणारा रामचंद्र आहे. ही सर्व पात्रे जीवनप्रेरणा देणारी आहेत. अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, जातीय ताणतणाव, शैक्षणिक दुरावस्था या मूलभूत समस्यांवर प्रकाशझोत टाकत, मुळात भकास असणारी खेडी अधिक कंगाल कशी बनत गेली. यांचे सम्यकदर्शन लेखकाने विविध कथांतून घडविलेले आहे. - कॅप्टन डॉ. अशोक शिंदे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि