60 116
Download Bookhungama App

गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे या साहस वीराची अजून एक साहस कथावर्षापूर्वी असाच तो दिल्लीमार्गे काश्मीरला गेला होता— सुट्टीतली सहल म्हणून. मामा-मामींनी त्याला नेले होते. त्याच वेळी पॅराशूटवाले पाकिस्तानी हेर काश्मीरच्या खोऱ्यात उतरल्याची आवई उठली होती. नुसती आवई नाही. अक्षरश: खरे ठरले होते ते. कारण चंदेरी कोल्ह्याची शिकार करताना त्याला नि त्याच्या अन्वर नावाच्या काश्मिरी मित्राला झेलमच्या काठी पॅराशूटचे फाटके कापड सापडले होते. आणि मग... ट्टॉक ! त्याच्या धाग्यांवरून दोघांनी खऱ्याखुऱ्या पाक हेरांच्या कारस्थानाचा माग काढला होता. श्रीनगरच्या नव्या पुलाला सुरुंग लावण्याचा कट त्यांनी खूप धावाधाव करून उधळला होता. त्या वेळी त्याची मामेबहीण माली पण बरोबर होती. चित्रकार मालीने पण हेर पकडण्याच्या कामात खूप भाग घेतला होता. खूप म्हणजे जिवापाडच. कारण त्या बदमाषांनी चक्क तिचे हातपाय बांधून जंगलातल्या एका कोठडीत तिला कैद करून ठेवले होते. डिटेक्टिव्ह मन्सूरला केवढी मदत या शाळकरी पोरांनी केली होती ! मोठा दिलदार हौशी गडी तो डिटेक्टिव्ह मन्सूर. या पोरांना तो इतका पसंत पडला होता की त्याला ते मन्सूरचाचा म्हणूनच हाक मारीत. आज तो एकेक प्रसंग बन्याच्या डोळ्यांपुढून चित्रपट्टीसारखा सरकत होता. त्याला अचानक ओढ लागली होती काश्मीरच्या अन् तिथल्या आपल्या लाडक्या मित्राची— अन्वरची !... काय करीत असेल अन्वर आता ? माझी आठवण येत असेल का त्याला ? तसं म्हटलं तर दिल्लीहून काश्मीर दूर नाही. म्हणजे पुण्याहून जितकं दूर आहे तितकं तरी नाहीच. मग आपण जर दिल्लीपर्यंत आलो आहो तर काश्मीरची ट्रिप आपल्याला का करता येऊ नये ? किंवा अन्वरने दिल्लीची ट्रिप का काढू नये ? पण— पण ते कसं शक्य आहे ? आणि तरी, तसं म्हटलं तर दोन-तीन दिवस इथं दिल्लीत माशा मारीत घालवायचे आहेतच. पाहण्यासारखं खूप आहे खरं इथं. पण आपण साऱ्याच्या साऱ्या बारा दिल्ल्या पालथ्या घातल्या आहेत की. कुतुबमिनार, सफदरजंग, पुराणा किल्ला— सारं पुन्हा पुन्हा बघण्यासारखं आहे यात शंकाच नाही. पण आत्ता तरी आपल्याला त्या दगडमातीत रस वाटेनासा झालाय. आपल्याला हवा आहे अन्वर ! वाचा पुढे काय झाले....


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि