Id SKU Name Cover Mp3
घेऊया रे शपथ


24 56
Download Bookhungama App

घेऊया रे शपथ - सौ.मीरा नांदगांवकर

Description:

कुमारवयीन मुलांसाठी  कथासंग्रहमनोगत कुमारवयीन मुलांसाठी माझा या आधीचा कथासंग्रह ‘ शिंपल्यातले मोती ’ बहुसंख्य वाचकांना भावला. मला तशी काही पत्रेही आली. काहींनी प्रत्यक्ष भेटीत तर काहींनी फोनवरून तसं सांगितले. दुसरा असाच कथासंग्रह प्रकाशित करावा असा आग्रही सल्लापण काही वाचकांनी दिला. मी खरोखरच आनंदित झाले. आज आपणासमोर ‘ घेऊ या रे शपथ ! ’ नावाने हे कथासंकलन ठेवताना तो आनंद द्विगुणित होतोय. माझ्या गोष्टी सांगण्याच्या छंदातून या कथा मी लिहिल्या आहेत. मराठी, हिन्दी व इंग्रजीतून वाचलेल्या विविध कथांप्रमाणे जी कथाबीजं माझ्या गोष्टीवेल्हाळ मनांत घर करुन होती ती फुलवून या कथांमधून आपणासमोर ठेवीत आहे. ही कथाबीजं फुलवताना, मनातील एक सुप्त बीज या कथांमधून सातत्याने व अपरिहार्यपणे डोकावते. संस्कार, उत्तम गुणांची जोपासना यांचा एक ठसा संस्कारक्षम कुमारवयीन मनावर खोल उमटावा यासाठीचा आग्रह हे ते सुप्त बीज होय. जीवनमूल्ये शाश्वत असतात. कुमारवयीन वाचकांच्या भावविश्वावर त्या मूल्यांचा ठसा गोष्टीरुपाने नक्की उमटतो हा माझा दृढ विश्वास आहे. शपथपूर्वक केलेल्या गोष्टींशी मन गुंतलेले असते. ती गोष्ट साध्य करण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी तन ते आनंदाने झेलते. म्हणूनच ‘ घेऊ या रे शपथ ! ’ असे म्हणावेसे वाटले. उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सुधाकर जोशी यांची मी ऋणी आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करुन देणारे श्री. राजेंद्र नेवासकर व अंतर्गत रेखाटन करुन देणारे श्री. राहुल थोरात यांची मी आभारी आहे. आपल्या व्यापातून वेळ काढून, ज्यांनी आशीर्वादपर प्रस्तावना लिहिली त्या आदरणीय श्री. वा. ल. मंजूळ यांचे मनापासून, कृतज्ञतेने आभार मानते. कृतज्ञ, मीरा नांदगावकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि