Id SKU Name Cover Mp3
Garud Uganda che


40.00 78.00
Download Bookhungama App

गारुड Ugandaचे - अनिल जोशी, भारती जोशी

Description:

प्रवास करणं आणि प्रवासवर्णने लिहिणे यातून जग अधिक समृद्ध होत गेलं. या प्रवासवर्णनांमधून लोकांना प्रेरणा मिळाल्या. नव्या दिशा सापडल्या. नव-नवी आव्हानं समोर येत गेली. नवं जाणून घेण्याचा ध्यास निर्माण झाला. या सगळ्या कसोट्यांवरगारुड Ugandaचेपुस्तक उतरतं. ओघवती भाषाशैली, उत्कंठावर्धक मजकूर, समकालीन वास्तव, भारतीय परिस्थितीचे संदर्भ, मराठी माणसाची टिपणी करणारी शोधक वृत्ती या सगळ्याचा परिपोष या वर्णनात आहे. रूढ अर्थाने हे प्रवास वर्णनच नाही तर ते आत्मकथन सुद्धा आहे. लोकल ते ग्लोबल असा प्रवास जोशीद्वयाने केला त्याच्या खाणा-खुणा पुस्तकात ठायी -ठायी दिसतात.मनोगत

पूर्व आफ्रिकेतील, केनिया या देशातील, ‘नैरोबीया राजधानीच्या शहरातील दहा-बारा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारतात परतण्याचा विचार निश्चित करुन आम्ही आमच्या विंचवाच्या पाठीवरिल बिऱ्हाडाच्या आवरा-आवरीत मग्न होतो. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ‘नैरोबीसोडण्याच्या जेमतेम एक आठवडा आधी, योगायोगाने अचानक केनियाच्या पश्चिमेला असलेल्या, पूर्व आफ्रिकेतीलच ‘‘युगांडानांवाच्या देशातीलकंपालाया राजधानीच्या शहरात, ‘मुकवानो’ (‘Mukwano’ या स्वाहिली भाषेतील शब्दाचा अर्थमैत्रीअसा आहे.) ‘ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजया युगांडातील अतिशय सुप्रसिद्ध आणि मान्यवर अशा कंपनीत नोकरीची एक संधी समोर आली आणि समोर आलेल्या या संधीचा स्विकार करुन, आम्ही दोन दिवसांत कंपालात नोकरी निमित्त रुजू होण्याचे ठरवले.

ईदी अमीनया युगांडाच्या एका विचीत्र स्वभावाच्या आणि विकृत प्रकृतीच्या प्रेसिडेन्टमुळे या देशाची ‘‘अपकिर्ती” (कृष्णवर्णिय प्रतिमा) सर्व जगभर पसरली होती आणि आजही बहुतांशी ती तशीच आहे. तीचकाळी प्रतिमाआमच्याही मनात अजूनही, कुठेतरी, खोलवर रुजलेली आहे याची जाणीव युगांडाला येतांना आम्हांला झाली. ‘Entebbe’ या नांवाच्या, एका छोट्या गावातील, युगांडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असतांनाच येथे सर्वत्र पसरलेल्या हिरवाईने मन भारुन गेले. निसर्गाचे भरभरुनवरदानलाभलेल्या या देशातील लोकांनी अप्रिय अशा भूतकाळाला मागे सारुन, फिनीक्स पक्षाप्रमाणे, राखेतून फिरुन एकदा प्रगतीच्या दिशेने घेतलेली झेप, इथली संस्कृती, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक पद्धती यांची ओळख जशी जशी व्हायला लागली तशी तशी या देशाबद्दल मनात आपुलकी वृद्धिंगत व्हायला लागली.

युगांडाहा देश केनिया पेक्षाही जास्त निसर्गसंपन्न असला तरी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आकर्षित करुन घेण्याच्या दृष्टीने आवश्यक अशी नियोजनबद्ध पावले सरकारी पातळीवरुन अजूनपर्यंत तरी उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे हा देश बघायला येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच वन्यप्राणी जीवनही येथे केनियापेक्षा कमी आहे. वानर जमातीतल्यागोरिला’ (Gorilla) या जातीच्या माकडांचे प्रमाण जगातील ज्या ४-५ देशात जास्त प्रमाणात आहे त्यातील एक युगांडा हा देश आहे.

येथील टुरिस्ट बोर्डाच्या मोजणीनुसार सातशेच्या आसपास गोरिला येथे आहेत. त्यातील जवळ जवळ ३८० च्या पेक्षाही जास्त गोरीला येथील ‘‘बिवींडी राष्ट्रीय उद्यानातच” (Biwindi National Park) असून बाकीचे ‘‘म्गाहिंगा राष्ट्रीय उद्यानात” (Mgahinga National Park)  आणि अन्यत्र विखुरलेले आहेत. गोरिला प्रमाणेच मानव जमातीचा दुसरा जवळचा नातेवाईक म्हणजेचिंपांझी’  (Chimpanzee). ह्यांचेही प्रमाण येथे मोठ्या प्रमाणात आहे. हे प्राणी प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय असल्याने आता येथील पर्यटन खाते ही मध्यवर्ती कल्पना ठेवून काही नवीन योजना आखत आहे.

केनिया हा देश Wild-life साठी जगप्रसिद्ध आहे तर युगांडा हा ईदी अमीनमुळे आणि अत्यंत सुपिक, समृद्ध कसदार जमिनीमुळे जगप्रसिद्ध आहे. हा देश Food Basket म्हणूनही प्रसिद्ध आहे. सर्व आफ्रिका खंडाला अन्नधान्याचा पुरवठा करु शकण्याइतकी नैसर्गिक अनुकुलता या देशाला लाभली आहे. आणि त्यामुळेच येथील कृषी आणि वनसंपत्तीवरच सर्व देशाचे अर्थकारण मुख्यतः चालते. आज इजिप्तसारख्या देशाने, सरकारी पातळीवरुन प्रयत्न करुन, येथील शेकडो एकर जागा, त्यांच्या देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी भाड्याने घेतली आहे.

खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने पोटासाठी (अन्नासाठी) झगडण्याची फारशी गरज येथील आम-जनतेला वाटत नाही. बाकीच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठीच जे काय कष्ट करावे लागतात तेवढेच आवश्यक तेवढे कष्ट घेतले जातात. ‘‘उपासमारमग ती अन्नाची असो किंवा शारिरीक, नैसर्गिक भूकेची येथे ती फारशी जाणवत नाही. कारण शारिरीक गरजेच्या हाकेला येथील लोक आपल्यापेक्षा फार वेगळ्या दृष्टीने प्रतिसाद देतात. त्यामुळे अन्नासाठी किंवा शारिरीक संबंधांसाठी वखवखलेल्यानजरेचाइथे बऱ्यापैकी अभाव आहे.

शारिरीक संबंधांच्या बाबतीतल्या बंधनविरहीत वर्तनामुळे या देशात HIV AIDS चे प्रमाण प्रचंड होते. परंतु सरकारी पातळीवरुन कसून केल्या गेलेल्या प्रयत्नांमुळे आता ते बरेच आटोक्यात आले आहे. शरीर सुखासाठी कधीही, कुठेही, कोणाबरोबरही शृंगारात रमण्याची तयारी असलेल्या येथील लोकांमधे ‘‘सेफ सेक्सबद्दल जनजागृती घडवून आणण्यात येथील सामाजिक संस्था, आरोग्य खाते यांना आता यश आले आहे. तरीही आपल्यासारखेएक पतीव्रताकिंवाएक पत्नीव्रतांचे’ ‘व्रतआयुष्यभर जपणाऱ्या लोकांचे प्रमाण येथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहे. हे सत्य पचवायला आमच्या सारख्या भारतीय मनोवृत्तीच्या पठडीतील लोकांच्या आयुष्यातील बराच काळ लोटावा लागतो.

युगांडा येथे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे प्रमाणही अगदीनगण्यम्हणजे जवळ जवळ नाहीतच जमा आहे. पूर्व आफ्रिकेतीलचकांगो, केनिया, सुदान, रवांडायेथे अगदी सर्रास दरोडे घातले जातात, परंतु युगांडात मात्र असे क्वचितच घडते. परंतु भुरट्या चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण मात्र येथे प्रचंड आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणेही फिके पडावे इतक्या शिताफीने येथे चोऱ्या होतात, केल्या जातात, कारण त्यात त्यांना काहीही गैर वाटतच नाही. नैतिक अधःपतन नांवाची काय चिज असते? हे त्यांच्या खिसगणतीत तर नाहीच आणि त्याची त्यांना पर्वाही नाही. जे आपल्याकडे नाही ते आपल्याला मिळाले पाहिजे एवढाच त्यांचा मूलभूत विचार असतो.

सर विंस्टन चर्चिल यांनी या देशाला ‘‘पर्ल ऑफ आफ्रिकाम्हणून नावाजलेले होते. त्या या युगांडा देशातील काळ्या पार्श्वभूमिला बाजूला सारून चांगल्या गोष्टींचा शोध घेतांना ‘‘शिंपल्यातून मोतीमिळवण्या इतकेच कष्ट घ्यावे लागले. हेच मोती शब्दरुपात तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि