60 116
Download Bookhungama App

गंगार्पण - राजेंद्र बनहट्टी

Description:

‘गंगार्पण’ हा दीर्घ कथांचा संग्रह आहे. या कथा मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावाचे कंगोरे उलगडत जातात. आपल्या खास शैलीने बनहट्टी वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. The Book ‘Gangarpan ’ is a compilation of stories about human nature, emotional travel, relationships and behaviour. He engrosses reader with his deft handling of his characters and lucid narrative. प्रस्तावना स्वच्छ-सरळ निवेदन, नादमय प्रवाही भाषा, कथाकाराला अपरिहार्य असलेला, माणसाचा शोध-वेध घेणारा अंतर्चक्षू आणि त्रीपार्श्व-काचेतून (prism) मनुष्य स्वभाव हेरणारे उत्कट व संवेदनक्षम मन, या सामार्थ्यांनी बनहट्टींची कथा वाचकाच्या मनाचा नेमका ठाव घेते. जीवन-कलहात सापडलेल्या व्यक्तींच्या मनाचे व्यामिश्र पापुद्रे उलगडताना, प्रसंगोपात्त होणारी त्यांची व्याक्षोभावस्था मांडताना बनहट्टींची सूचक व विश्लेषक लेखणी अत्यंत सोप्या भाषेचा आश्रय घेते; याचे उदाहरण म्हणून प्रस्तुत कथासंग्रहातील सर्वच कथांकडे बोट दाखवता येईल. तथापि ‘समंध’, ‘गंगार्पण’, ‘देवळातले तीन दिवस’, ‘पूर्वज’, आणि ‘आत्मा अमर आहे ! ’ या कथांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल. - आनंद अंतरकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि