Id SKU Name Cover Mp3
galivharchya-adbhut-safari


40.00 100.00
Download Bookhungama App

गलिव्हरच्या अद्भुत सफरी - मा. कृ. बेहरे

Description:

गलिव्हरच्या सफरी म्हणजे गलिव्हर ट्रॅव्हल्स्. या पुस्तकाचे संपूर्ण नाव (द ट्रॅव्हल्स ऑफ गलिव्हर) “The Travels of Galiver in to Several Remote Nations of the World.” असे आहे. हे पुस्तक प्रसिद्ध आयरिश लेखक ‘जोनाथन स्विफ्ट’ याने सन् १७२१ पासून सन् १७२६ पर्यंत लिहिले. सफरीवर जाण्यापूर्वी

गलिव्हरच्या सफरी म्हणजे गलिव्हर ट्रॅव्हल्स्. या पुस्तकाचे संपूर्ण नाव (द ट्रॅव्हल्स ऑफ गलिव्हर) “The Travels of Galiver in to Several Remote Nations of the World.” असे आहे. हे पुस्तक प्रसिद्ध आयरिश लेखकजोनाथन स्विफ्टयाने सन् १७२१ पासून सन् १७२६ पर्यंत लिहिले. हे पुस्तक प्रथम २८ ऑक्टोबर १७२६ या दिवशी लंडन येथे प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासूनच ते आतोनात लोकप्रिय झाले. जगातील सर्व भाषांत या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. आणि या पुस्तकाच्या आजवर किती आवृत्या निघाल्या त्याची गणतीच करता येत नाही.

जोनाथन स्विफ्ट हा आयर्लंड बेटातील डब्लिन या राजधानीच्या गावी ३० नोव्हेंबर १६६७ या दिवशी जन्माला आला. तो जन्माला येण्यापूर्वी चारच महिने म्हणजे १६६७ च्या वसंत ऋतूत त्याचे वडील मृत्यू पावले होते. ते धर्मगुरू होते. त्यामुळे स्विफ्ट धर्मगुरू होणार हे ठरलेलेच होते. आपल्या काकांकडेच तो वाढला. डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये १६६७ साली त्याला बी. .ची पदवी मिळाली. कॉलेजच्या जीवनात तो एक सर्वसामान्य विद्यार्थी होता. पिता नसल्यामुळे जोनाथनला मनात नेहमी अस्थिरतेची भावना असे. सन १७१७ मध्ये डब्लिन येथील सेंट पॅट्रिक कॅथड्रल येथील डीन म्हणून त्याची नेमणूक झाली. सन् १७४५ पर्यंत मृत्यू येईपर्यंत तो या पदावर होता.

सन १७१० मध्ये तो लंडनला गेला. तेथे त्याची ओळख तत्कालीन श्रेष्ठ लेखक - डॉ. जॉन्सन, पोप वगैरेंची झाली. त्यावेळी इंग्लंडमध्ये व्हॅनोव्हर घराण्यातील पहिला जॉर्ज राज्यावर आला होता. त्याकाळी इंग्लंडमध्ये लोकशाहीची स्थापना होत होती. तेथे व्हीग आणि टोरी असे दोन पक्ष होते. जोनाथन स्विफ्ट टोरी पक्षाचा म्हणजे राज्यकर्त्यांचा पुरस्कर्ता होता. त्यावेळी रॅशनॅलिझम उदार मतवादाचे तत्त्व पुढे येत होते. त्याचा पुरस्कार स्विफ्टने केला.

जोनाथन स्विफ्ट आपल्या उपरोधिक व विनोदी लिखाणाबद्दल प्रसिद्ध आहे. ‘गलिव्हरचे प्रवासही तत्कालीन राजकारणावरील एक महान रूपक आहे. तत्कालीन इंग्लंडचा पंतप्रधान वॉलपोल याच्या काही धोरणांची त्यात टिंगल केली आहे. पण ती समजायला तत्कालिन राजकारण माहीत असायला हवे.

हे पुस्तक किशोरांप्रमाणेच थोरांनाही आवडणारे आहे.


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)