80 160
Download Bookhungama App

फिटनेस कमवा फॅट गमवा - सनत्कुमार पुंडलीक

Description:

आरोग्यपूर्ण, आनंदी आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटत असते . आजच्या धावपळीच्या आणि प्रचंड तणावाच्या जीवनशैली मुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत. व्यायामाचे महत्व आपण जाणतोच पण अपूर्ण ज्ञान अज्ञाना ईतकेच घातक असते. आरोग्यसंपन्न आणि उत्साही रहाण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाने स्वानुभवावर आधारित केलेले असे हे मार्गदर्शन असून अतिशय सोप्या भाषेत केलेले असे हे लेखन आहे .मनोगत  मी फिटनेसच्या क्षेत्रात कधी आलो ते मलाच समजलं नाही. तसं शाळेच्या जिममध्ये व्यायाम करताना आनंद वाटायचा खरा, पण यात करिअरसुद्धा करता येतं हे मला त्यावेळी अजिबात माहीत नव्हतं. तसं पाहिलं तर वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत मला फिटनेस या शब्दाचं स्पेलिंगसुद्धा बरोबर लिहिता आलं नसतं, मग त्याची अजून काही माहिती असणं ही दूरचीच गोष्ट म्हणायची. मला माहीत नव्हतं, पण त्या वेळेला पुण्यात एक नवीन फिटनेस क्लब सुरू होत होता. तेव्हा गिरीश नावाच्या माझ्या एका मित्राने मला तिथं इंटरव्ह्यूसाठी जाण्याचा सल्ला दिला. मला त्यात फारसा काही उत्साह नव्हता, पण प्रयत्न करण्यात फारसा तोटाही नव्हता. म्हणून मी एक अर्ज म्हणून काहीतरी खरडून इंटरव्ह्यूसाठी गेलो. आता माझ्या अर्जावर तारीख नव्हती, खाली माझी सही नव्हती. मी काय लिहिलं त्यात फारसा अर्थ होता की नाही हे सांगता येण्यासारखं नव्हतं. पण त्यात माझा काही दोष नव्हता हे वेगळं सांगायला नको कारण मला ओळखणारे माझ्याकडून त्यापेक्षा जास्त काही अपेक्षाही करत नाहीत. एवढं सगळं सांगितल्यावर त्यावेळी मी साधी दाढीही केलेली नव्हती हे वेगळं सांगायला नको. तरी मी तसाच एखाद्या अजागळासारखा त्या जिमच्या हॉलमध्ये जाऊन बसलो. आलेले इतर बहुतेक सर्व कँडिडेट सूट-बूट, टाय अशा वेषात सर्व तयारीनिशी आलेले होते. ते पाहून मला वाटलं, की माझा या सर्व काँपिटिशनमध्ये निभाव लागणार नाही, म्हणून मी चिंटूसारखा घाबरलो आणि एक आवंढा गिळला. तिथं झालेल्या लेखी परीक्षेत मला नेमके किती मार्क मिळाले तेही सांगणं इथं शक्य नाही. पण थोड्यावेळाने एका प्यूनने मला सांगितलं की साहेबांनी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलेलं आहे. मी ऑफिसमधे गेलो आणि तिथं टेबलामागे बसलेल्या व्यक्तीला विचारलं, “अभिमन्यु नावाचे एक गृहस्थ माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत, ते कुठे भेटतील?” त्या व्यक्तीने माझ्या अजागळ ध्यानाकडे थोडा वेळ रोखून पाहिलं आणि सांगितलं-“आय अॅम अभिमन्यु. सिट डाऊन.” पुढं इंटरव्ह्यूमधे मी ज्या प्रश्नांची उत्तर दिली तीही फारशी बरोबर नसावी. पण इंटरव्ह्यू संपल्यावर अभिमन्यु सरांनी मला सांगितलं “ओ. के. यू स्टार्ट वर्किंग फ्रॉम टुमॉरो.” या वेळेपर्यंत अभिमन्यु साबळे ही कोण व्यक्ती आहे आणि फिटनेसच्या क्षेत्रात तिला किती उच्च दर्जाचे स्थान आहे या गोष्टी मला अजिबात माहिती नव्हत्या. पण नंतर मात्र या विषयात आपण चांगलं काम करू शकतो, नाव कमावू शकतो आणि पोट तर नक्कीच भरू शकतो हा आत्मविश्वास मला अभिमन्यूंनीच दिला.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)