Id SKU Name Cover Mp3
फिटे अंधाराचे जाळे


80 174
Download Bookhungama App

फिटे अंधाराचे जाळे - रुपाली देशिंगकर

Description:

 निसर्ग प्रेमींसाठी एक मेजवानीच. वन्य जीवन, झाडे, फुले, पक्षी ह्यांची माहिती देणारी पत्रे अनिरुद्ध देशिंगकर ह्यांची काढलेल्या उत्कृष्ठ रेखा चित्रांसोबत. Letters which can be a real Treat for Nature Lovers covering wild life, trees, flowers, birds illustrated by excellent sketches by Aniruddh Deshingkarप्रकाशकाचे मनोगत निसर्ग आपल्या अवतीभोवती असतोच. झाडे, फुले, प्राणी, पक्षी सतत आपल्या आजूबाजूला असतात. होते काय कि.. शहरात आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण त्यांच्या कडे पहायची दृष्टी गमावून बसतो.  हल्ली सकाळी चिमण्या ओरडलेल्या ऐकू येत नाहीत, कोंबड्याच्या आरवण्याने जाग येत नाही, रातराणीचा सुगंध रात्री दरवळत नाही....प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला दिसत नाही. असे आपले जीवन यंत्रवत झाले आहे. आणि अशा वेळी रुपाली देशिंगकर ह्यांनी सृजन ची समांतर चळवळ जी “न लिहिलेली पत्रे” ह्या नावाने फेसबुक वर चालू आहे...त्या पेज वर पत्रे लिहायला सुरुवात केली. अल्पावधीत त्यांच्या पत्रांनी सर्वांना वेड लावले. त्यांना लाखो वाचक लाभले. विस्मरणात गेलेले किती तरी पक्षी, प्राणी, झाडे पुन्हा एकदा वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभे राहिले.  अंधाराचे पटल दूर झाले. ज्ञानाचा प्रकाश पसरू लागला. ह्यातूनच प्रस्तुत पुस्तकाचे नाव जन्माला आले...”फिटे अंधाराचे जाळे”. रुपाली देशिंगकर ह्या निसर्ग तद्न्य आहेत. त्यांनी ह्या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे... देहराडूनच्या संस्थेतून.  महाराष्ट्र राज्याच्या अनेक कार्यशाळा त्या तद्न्य म्हणून चालवतात. त्यांची ह्या विषयाशी असलेली बांधिलकी इतकी तीव्र आहे कि सापांचे संरक्षण करण्यासाठी...त्या पाठच्या अंधश्रद्धे विरुद्ध लढा देण्या साठी त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांच्या समवेत जनजागरण करण्याचे दौरे सुद्धा केले. रेखा चित्रांशिवाय ह्या पुस्तकाला काहीच मजा आली नसती.   हे अवघड काम रुपाली देशिंगकर ह्यांचे आयुष्यातील साथीदार अनिरुद्ध देशिंगकर ह्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि ते उत्तम यशवी केले ह्यात शंका नाही. त्यांचे सृजन आभार मानते आहे. “फिटे अंधाराचे जाळे” हे पुस्तक प्रकाशित करताना सृजन आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करते आहे असे आम्हाला वाटते. अशी पुस्तके प्रकाशित करणे हे वाचकांच्या सक्रीय पाठींब्याशिवाय शक्य नाही.   सृजन


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि