FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा जयंत पोंक्षे लिखित विशेष लेख “गोष्ट: गाडल्या गेलेल्या गावांची” आणि विक्रम भागवत लिखित “एक शून्य शून्य – एक वेडा प्रवास” या लेखमालिकेतील पुढील भाग. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...
संपादकीय
सस्नेह नमस्कार,
आमच्या सर्व वाचक, लेखकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
गेल्या महिन्यातील एक शून्य शून्य च्या आठवणींचा पट उलगडण्यास विक्रम भागवतांनी सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहातच. तर वाचा या अंकात.
या महिन्याचा विशेष लेख आहे दोन हजार वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या रोमन साम्राज्यातील दोन शहरांबद्दल. पॉम्पे आणि हरक्यूलॅनीयम या उत्खननात सापडलेल्या शहरांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर रोमन संस्कृतीचे चित्र उभे करणारा विशेष लेख “गोष्ट: गाडल्या गेलेल्या गावांची”
या अंकात प्रत्यक्ष भेटीवर आधारित आणखी एक लेख समाविष्ट केला आहे. तो आहे काश्मीर मधील तुर्तुक या छोट्याशा भागाबद्दल. बाल्टीस्थान मधील हा भाग १९७१ पर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात होता. १९७१ च्या युद्धात भारतीय सेनेने या भागावर कब्जा मिळवला. पाक अरेरावीला कंटाळलेल्या तूर्तुकच्या राजाने आणि तेथील रहिवाशांनी मनापासून भारतीयत्व स्वीकारले ते आजतागायत. याच तूर्तुकला आणि तेथील राजास दिलेल्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव शब्दबद्ध केला आहे उल्का खानोलकर यांनी.
याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”...
तेंव्हा गणपतीबाप्पाचा प्रसाद भरपूर खा आणि वाचतही रहा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धाकळवत रहा.
आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.
संपादक
भारतीय सौर दिनांक आषाढ भाद्रपद १५, शके १९४१ (०६ सप्टेंबर२०१९)