Id SKU Name Cover Mp3
FC Road : Mastichi Pathshala - October 2019


10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - ऑक्टोबर २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मदिना निमित्त त्यांनी दिलेल्या चंपारण्यातील लढ्याचेवर्णनत्यांच्याच शब्दात वाचा “चंपारण्याचा लढा” या विशेष लेखात आणि विक्रम भागवत लिखित “एक शून्य शून्य – एक वेडा प्रवास” या लेखमालिकेतील पुढील भाग. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...सस्नेह नमस्कार,

ऑक्टोबर २०१९. महात्मा गांधी यांच्या१५०व्या जन्मदिनाचा महिना. खरे तर सर्व भारतीयांच्या अभिमानाचा विषय. तसा तो आहेच. पण प्रश्न हा आहे की आपल्यात“गांधी” आहेत का?

गांधीजीनी चंपारण्य येथे आंदोलन करून एकशे दोन वर्षे झाली. जुलमी इंग्रजी सत्तेविरूद्ध लढण्याचे बळ त्यांनी दिले. कोणतीहीहिंसा न करताहा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि तेथील नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पण आज शेतकऱ्यांची काय स्थिती आहे?

प्रश्न हा पडतो की गांधीजीना आदरांजली कशी द्यावी? म्हणजे तसे आदरांजली देण्याचे सरकारी सोहळे नेहमीच्यापद्धतीने उरकले गेले. पण ते फक्त एक कर्मकांड होते.

पण आपण हे विसरता कामा नये की याच गांधीजीनी आपल्याला अन्याया विरुध्द, दडपशाहीविरुध्दउभे राहिला, त्या विरुध्द आवाज उठवायला शिकवले.अर्थात अहिंसक मार्गानेच. आजस्वातंत्र मिळाले असले तरीही दडपशाही चालूच आहे.

म्हणूनच“आरे” पासूनकाश्मीर पर्यंत चालू असलेल्या दडपशाहीचा निषेध करून आपण महात्माजीना आदरांजली अर्पण करू आणि त्यांच्या विचारांनी पुढील मार्गक्रमण करण्याचानिर्धार करुया.

तर मित्रहो,महात्मा गांधी यांच्या१५०व्या जन्मदिना निमित्त त्यांनी दिलेल्या चंपारण्यातील लढ्याचेवर्णनत्यांच्याच शब्दात वाचा “चंपारण्याचा लढा” या विशेष लेखात.

एक शून्य शून्य च्या आठवणींचापट उलगडण्यास विक्रम भागवतांनी सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहातच. तर वाचा या अंकात.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”...

एव्हाना तुम्ही दिवाळीच्या तयारीत बिझी झाला असाल. तयारी जोरात करा आणि वाचतही रहा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धाकळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक

भारतीय सौर दिनांक आश्विन १६,शके १९४१ (०८ ऑक्टोबर, २०१९)


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि