10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला ऑक्टोबर १८ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा हृषीकेश पाटील लिखित पदभ्रमंती बद्दलचा लेख “राजगड ते रायगड”  आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'रंगकमळ'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...मित्रहो,

सस्नेह नमस्कार आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गेल्या महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील विशेष लेख आहे तो ट्रेकिंगवरच. पण यावेळी आहे तो आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या किल्ल्यांच्या भ्रमंतीचा. हृषीकेश पाटील लिखित “राजगड ते रायगड” पदभ्रमंती बद्दलचा हा लेख आपणाला नक्कीच आवडेल.

“बुक हंगामा शिफारस” या सदरातून आम्ही आपणाला दर महिन्याला एका नवीन इ-बुकची ओळख करून देत असतो. आपणास माहित असेलच की बुक हंगामातर्फे आता ऑडीओ बुक्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि हि ऑडीओ बुक्स तुम्ही बुक हंगामाच्या App मधेच ऐकू शकता. म्हणजे इ-बुक आणि ऑडीओ बुक्स साठी वेगवेगळ्या App ची गरज नाही.

तर यावेळी “बुक हंगामा शिफारस” या सदरातून आम्ही एका ऑडीओ बुकची ओळख करून देत आहोत. हे पुस्तक आहे कमळ देसाई लिखित ‘रंगकमळ’.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आनंदात वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि