10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - जून २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा वि. वि. करमरकर लिखित विशेष लेख “विश्वचषक: कपिलचा अन् धोनीचा – फरक मात्र जमीन अस्मानाचा” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस उमेश पटवर्धन लिखित“Publishड अनपब्लिशed” . त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही... 

हा अंक आपल्या हातात पडेपर्यंत विश्वचषक स्पर्धेचे दहा सामने झाले असतील. पुढील महिनाभर सर्वत्र क्रिकेटमय वातावरण असेल. अनेकांना २०११ मधील चषक उंचावलेला सचिन आठवत असेल तर काहीना १९८३ मधील क्रिकेट पंढरी लॉर्डसच्या गॅलरीत उभा राहून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारणारा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिलदेव.

१९८३ च्या विश्वचषक विजयाने भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलला. या विजया नंतर भारत क्रिकेटच्या चिमुकल्या विश्वात का होईना एक महासत्ता म्हणून पुढे आला आणि स्थिरावला. अर्थात १९८३ आणि २००३ मधील विजयात गुणात्मक आणि संख्यात्मक (Qualitative आणिQuantitative) जमीन अस्मानाचा फरक आहे. हाच फरक स्पष्ट करून सांगत आहेत जेष्ठ क्रीडा समीक्षक वि. वि. करमरकर त्याच्या विशेष लेखात विश्वचषक: कपिलचा अन् धोनीचा फरक मात्र जमीन अस्मानाचा

या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये उमेश पटवर्धन लिखितपब्लिश- अनपब्लिशया पुस्तकाचा परिचय.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”....

तर आरामात, आनंदात विश्वचषक सामन्यांची मजा लुटाच आणि वाचतही रहा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

आपल्या FC रोड परिवारातर्फे भारतीय संघास शुभेच्छा!!!

संपादक

भारतीय सौर दिनांक जेष्ठ १७, शके १९४१ (०७जून२०१९)

 

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि