10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - जुलै २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा विक्रम भागवत लिखित विशेष लेख “विनय.... (एक जगणे)” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस विक्रम भागवत लिखित “लुप्त”. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...सस्नेह नमस्कार,

आम्हाला खात्री आहे की तुम्ही सगळे विश्वचषकात मश्गुल असाल. त्याचसाठी तर आम्ही गेल्या अंकात मागच्या दोन विश्वचषक विजयांची तुलना करणारा लेख दिला होता. त्याला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मराठी माणूस जसा क्रिकेटवेडा तितकाच तो नाटकवेडा. याच नाट्यसृष्टीतील एक अवलिया म्हणजे विनय आपटे. विनय म्हणजे एक वादळ... झंझावत. १७ जून हा त्याचा जन्मदिवस.

या अवलीयाशी आपल्या विक्रम भागवतांचे नाते म्हणजे “तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना” असे. विक्रमच्या नाटकांना योग्य न्याय दिला तो फक्त आणि फक्त विनयनेच. मग ते ‘घनदाट’ असो किंवा ‘अफलातून’ किंवा ‘एक लफडे विसरता न येणारे’.

विक्रम म्हणतात त्याप्रमाणे विनय आपटे हा “चालू वर्तमानकाळ” आहे. विनय आपटे हा भूतकाळ होऊच शकत नाही. “होता” हे क्रियापद त्याच्यासाठी नाहीच. म्हणून तर १७ जून हा त्याचा स्मृती दिन असे न म्हणता “जन्मदिवस” असे म्हटले.

तर त्याच्या जन्मदिवसा निमित्त त्याच्या बद्दल विक्रम भागवतांचा विशेष लेख वाचा “विनय.... (एक जगणे)”.

या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये “लुप्त” या विक्रम भागवत लिखित कादंबरीचा परिचय.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात विश्वचषक सामन्यांची मजा लुटाच आणि वाचतही रहा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धाकळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक

भारतीय सौर दिनांक आषाढ , शके १९४१ (०१ जुलै २०१९)

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि