Id SKU Name Cover Mp3
FC Road Mastichi Pathshala - August 2019


10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - ऑगस्ट २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा विक्रम भागवत लिखित विशेष लेख “एक शून्य शून्य – एक वेडा प्रवास” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस डॉ. माधवी वैद्य लिखित "गुंफिरा". त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही... 

सस्नेह नमस्कार,

तर मित्रहो, पावसामुळे दोन दिवस मुंबईकराना सक्तीने घरी बसावे लागले. रस्ते अगदी ओंस पडले होते. असेच निर्मनुष्य रस्ते ३०-३१ वर्षापूर्वी दर आठवड्याला पावसाळा नसतानासुद्धा व्हायचे ते आठवताय.

ते साल होत १९८८. म्हणजेजेंव्हा टीव्हीवर एकच चॅनेल असेआणि टीव्ही संध्याकाळी ५.३० ते रात्री ११ एवढाच असे. तर... त्यावर्षीअचानकगुरुवारी रात्री रस्ते निर्मनुष्य व्हायला लागले. एवढेच काय नेहमीची लोकल ट्रेन मधेच थांबून उशीर व्हायला लागला तर बिचाऱ्या मोटरमन आणि गार्डना नेहमी लोकलचा लेट निमूट सहन करणारे प्रवासी शिव्या घालायला लागले. नाही नाही वर्ल्डकप वगैरे काही नव्हत चालू. त्याचे कारण होते एक दूरदर्शन वरील मालिका. एवढी दर्शकसंख्या(viewership) रामायण या मालिकेनंतर प्रथमच मिळत होती. पण रामायण होती हिंदी मालिका त्यातही अवघ्या देशाचा श्रद्धेचा विषय.

या दर्शकसंखेला आव्हान देणारी ही मालिका चक्क मराठमोळी. मराठी मालिका असूनही अमराठी दर्शनाना टीव्हीसमोर खेचून आणणारी मालिका चक्क एक गुन्हेगारी जगतावर(crime-based) आधारित होती. ही मालिका होती “एक शून्य शून्य....”. या मालिकेचे दिग्दर्शक होते बी पी सिंह आणि लेखक होते विक्रम भागवत.गुन्हेगारी जगतावरील एक अभिजात (Classic) मालिका असेच तिचे वर्णन करायला लागेल.

या मालिकेने प्रचंड दर्शकसंख्या मिळवलीच पण जेमतेम २५-३० भागांच्या या मालिकेने अनेक अफलातून गोष्टी केल्या.One shot one episode (म्हणजे २३-२४ मिनिटाचा अख्खा भाग एक “शॉट”) म्हणून चित्रित करण्याचा विश्वविक्रम देखील याच मालिकेने केला. ज्याची नोंद गिनीज बुक मध्ये घेतली गेली. याच मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबई पोलिसांनी शहर आणि उपनगर याना जोडणारा महत्वाचा रस्ता एस व्ही रोड काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद केला होता. या मालिकेच्या अशा अनेक अफलातून आठवणी/ गोष्टी आपल्या साठी घेऊन येत आहेत विक्रम भागवत. या त्यांच्या लेख मालिकेची सुरवात या महिन्याच्या विशेष लेखांनी. “एक शून्य शून्य – एक वेडा प्रवास”.

या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये माधवीवैद्य लिखित गुंफिरा या पुस्तकाचा परिचय.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, पावसाचीमजा लुटाच आणि वाचतही रहा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धाकळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक

भारतीय सौर दिनांक श्रावण१३, शके १९४१ (०४ ऑगस्ट २०१९)

 

 


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि