10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - एप्रिल २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा  विशेष लेख “ब्लॅक लाईट थिएटरची जादू” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस इंदुमती जोंधळे लिखित "बिनपटाची चौकट". त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...

 



संपादकीय

सस्नेह नमस्कार,

FC रोडच्या सर्व लेखक, वाचक, आणिहितचिंतकाना FC रोड परिवारा तर्फे भारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वानासुखाचे, समृद्धीचे, सहिष्णुतेचे आणि युद्ध-विरहित जावो.

FC रोड मध्ये विविध विषयांवर लेख समाविष्ट करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. विविध क्षेत्रात मग ते कलाक्षेत्र असो किंवा क्रीडा अथवा विज्ञान, त्यात केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर काय घडते आहे किंवा घडले आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. नुकत्याच झालेल्या जागतिक रंगभूमी दिना निमित्त जागतिक रंगभूमीवरील प्रवाहांचा धांडोळा घेऊन एक विशेष लेख या अंकात आहे. चेक रिपब्लिक मधील ब्लॅक लाईट थिएटर या प्रकाराबद्दल वाचा “ब्लॅक लाईट थिएटरची जादू” या विशेष लेखात.

या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये “बिनपटाची चौकट” या इंदुमती जोंधळे लिखित पुस्तकाचा परिचय.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि