10.00 30.00
Download Bookhungama App

FC रोड : मस्तीची पाठशाळा सप्टेंबर 2018 - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा उल्का खानोलकर लिखित लेख "मी, एक कैलासी..." आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'बॉम्बे बिट्स'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...मित्रहो सस्नेह नमस्कार

FC Road चे नवीन स्वरूप आपणा सर्वाना आवडू लागले आहे याचा खूप आनंद आहे. आपल्या प्रतिक्रिया, सुचना आपण आमच्याकडे जरूर पाठवा. FC Road अधिकाधिक आकर्षक आणि उत्तम होण्यास त्याची आम्हाला मदतच होईल.

FC Road म्हणजे मस्तीची असली तरी “पाठशाला” हीआहे. त्यामुळे मस्ती, मनोरंजन करतानाच आपल्या ज्ञानभांडारात थोडीफार भर पडेल याकडेही Team FC Road लक्ष ठेवून असते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या विषयावर एक विशेषलेखाचा समावेश करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यातअगदी रंगभूमी, चित्रपट, प्रवास, अशा विषयापासून ते अगदी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य अशा विषयापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करण्याचा FC Road चा प्रयत्न असेल.

त्याचबरोबर भविष्यात काही नवीन सदरे चालू करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

असो. ऑगस्ट महिना म्हटला कि भटक्यांना वेध लागतात ते हिमालयातील भटकंतीचे. मग ते उत्तराखंडातील ट्रेक असोत किंवा लडाखमधील किंवा थेट तिबेटमधील कैलास मानसरोवर असो. यातकैलास मानसरोवर हे ट्रेक बरोबरच धार्मिक भावनेने सुद्धा केले जाते. एक कठीण खडतर यात्रा म्हणून ख्याती असलेली ही यात्राकेवळ तरुणाच करतात असे नाही तर मनात इच्छा असेल तर जिद्दीने निवृत्तीनंतर हि परिक्रमा करणारेही आहेत. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर ही यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उल्का खानोलकर यांचे त्या यात्रेबाद्दल्चे अनुभव वाचा “मी, एक कैलासी...” याविशेष लेखात.

तर यावेळची “बुकहंगामा शिफारस” आहेभाग्यश्री भोसेकर बीडकर लिखित“बॉम्बे बिट्स”.

याशिवाय आपपल्या “नुक्कडच्या कट्ट्यावर”, “मिशीतल्या मिशीत”, आणि “कवितेचे पान” या नेहमीच्या सदरांबरोबर कथा, लघुकथा, ललितबंध असे बरेच काही.

तर जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की पाठवा.

आणि हो, आपले साहित्य पाठवीत रहाच.....


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि