10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला मे 2018 - विविध लेखक

Description:

'FC Road : मस्तीची पाठशाला मे 2018' अंकाचा या महिन्याचा विषय आहे 'सावज'.  

संपादकीय

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो !

FC रोडचा या महिन्याचा अंक तुमच्या हाती देताना मला नेहमीप्रमाणेच खूप आनंद होत आहे. या महिन्याचा विषय होतासावज’. नेहमीप्रमाणेच विषय जाहीर झाल्यापासून FC रोडच्या gmail अकाऊंटवर भरभरून साहित्य यायला लागले.

सावज म्हटलं की मला फक्त बंदूकधारी शिकारी आणि हरीण इतकच काय ते वाटायचं. पणसावजहा शब्द तेवढ्यापुरताच मर्यादित नक्कीच नाहीये. त्याचा आवाका खूप मोठा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक सगळ्याच प्रकारची जाळी पसरलेली असतात आणि अडकणारा त्यात अगदी अलगद अडकतो. तुम्ही - आम्ही कोणीही कधीहीसावजबनू शकतो. आपल्या आजूबाजूला नेहमीच विविध स्वभावाची लोकं वावरत असतात. त्या लोकांमध्येच तर कोणीशिकारीअसतं तर कोणीतरीसावजअसतं.

आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींविषयी कोणी कधी आवाज उठवतं तर कोणीतरी निमुटपणे हा सारा अन्याय सहन करतं. पण या साऱ्या वाईट प्रवृत्तींविषयी आपण जेवढे सजग राहू तेवढं जास्त चांगलं. चला तर मग आपण सारे मिळूनसावजहोण्यापासून वाचूया आणि वाचवूया.

तेव्हा मित्रांनो अंक वाचून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि हो नेहमीची सूचना जर तुम्हाला या अंकासाठी लिहायचं असेल तर https://www.facebook.com/groups/FCroadMastichiPathshalaEmagazine/?ref=bookmarks  या फेसबुक ग्रुपला जॉईन व्हा. या ग्रुपवर अंकाविषयी सर्व माहिती पोस्ट होते आणि दर महिन्याचा विषयदेखील इथेच जाहीर होतो. त्यानंतर तुम्ही तुमचं लिखाण आम्हाला मेल करू शकता fcroademagazine@gmail.com या मेल आयडीवर...

 - संपादक

 

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि