10.00 30.00
Download Bookhungama App

FC रोड : मस्तीची पाठशाळा ऑगस्ट 2018 - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा जयंत पोंक्षे लिखित लेख "चित्रपटांची वारी... कार्लोव्ही व्हॅरी !!!" आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'मुक्ती'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...मित्रहो

सस्नेह नमस्कार

जुलै महिन्यातील धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी उसंत घेतली असली तरी तुमच्याकडून आम्हाला येणाऱ्या साहित्याची संतत धार चालूच आहे. ती तशीच सुरु राहू द्या.

FC Road म्हणजे मस्तीची असली तरी आमच्या बुकहंगामासाठीपाठशालाच आहे. या पाठशाळेतीलगुणवंतपुढे आमच्यानुक्कडवर दाखल व्हावेत असा आमचा प्रयत्न असतो. ‘नुक्कड’, ‘मिशी’, आणिएक पान कवितेचेया बुकहंगामाच्याप्रयोगशाळाआहेत. या प्रयोगशाळेत अनेक प्रयोगाअंती सिद्ध झालेले हे गुणवंत खऱ्या अर्थाने  ‘लेखक’  होतात जेव्हा त्यांचे पुस्तक बुकहुंगामा आणि Amazon च्या वेबसाईटवर झळकते. या प्रक्रियेत तुम्हा नवोदितांना विक्रम भागवत यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखक/नाटककाराकडून मार्गदर्शन लाभते.

हे सर्व आज आवर्जून लिहिण्याचे कारण की FC Road वर लिखाण करणाऱ्या सर्व नवोदितांना कळावे की FC Road ही फक्त त्यांच्यासाठी सुरुवात आहे. तेव्हा त्यांनी केवळफेसबुकीलिखाणावर किंवा त्यावर येणाऱ्यालाईक्सच्या संख्येवर समाधानी न राहाता आपल्या लिखाणाकडे अधिक गंभीरतेने पाहावे आणि लिहावे. अगदी विनोदी लिखाण करीत असाल तरीही.

याच उद्देशाने गेल्या काही महिन्यांपासून आम्ही FC Road च्या अंकात आमच्याचनुक्कड’, ‘मिशी’, आणिएक पान कवितेचेया व्यासपीठावरील; त्या महिन्यातील सर्वोत्तम लिखाण प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. जेणे करून FC Road वरील नवोदितांना पुढील पायरी गाठण्यासाठी किती पल्ला गाठायचा आहे हे कळावे.

असो, या अंकात चेक रिपब्लिक मधील कार्लोव्ही व्हेरी येथे झालेल्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल एक विशेष लेख जरूर वाचा. तर यावेळचीबुकहंगामा शिफारसआहे अभिजित थिटे यांचे पुस्तकमुक्ती.’ आपपल्यानुक्कडच्या कट्ट्यावर’, ‘मिशीतल्या मिशीत’, आणिकवितेचे पानया नेहमीच्या सदरांबरोबर कथा, लघुकथा, ललितबंध असे बरेच काही.

तर जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की पाठवा.

आणि हो, आपले साहित्य पाठवीत राहाच.....

 

- संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि