10 30
Download Bookhungama App

FC रोड : मस्तीची पाठशाळा - एप्रिल २०१८ - विविध लेखक

Description:

FC रोड : मस्तीची पाठशाळा - एप्रिल २०१८ या इ-मासिकाचा या महिन्याचा विषय आहे : ‘एल्गार’ ! संपादकीय

मित्रांनो आणि मैत्रिणींनो !

नमस्कार,

एप्रिल महिन्याचा अंक तुमच्या मोबाईल मध्ये देताना आनंद होत आहे. बाहेर उन्हाने एल्गार पुकारला आहे आणि इथे आम्ही.  

बंडाची बीजं प्रत्येक मनुष्यात असतातच. त्याला जसं विचारांचं, प्रेरणांचं खत-पाणी मिळतं त्या प्रमाणे ती उगवून येतात. विधायक किंवा विघातक परिणाम करतात. कधी कधी आजूबाजूच्या प्रवृत्ती इतक्या प्रखर असतात की ही बीजं गर्भातच मारली जातात. मनुष्याचे विचार मारण्याचे प्रयत्न कसोशीने केले जातात. पण सर्वच काळ समान नसतो. एक ठिणगी पडते आणि एल्गार होतो. अन्यायी, अमानवी वृत्तींविरुद्ध निकराचा लढा दिला जातो.

सामाजिक पातळीवर जसा हा लढा लढला जातो तसा कौटुंबिक पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर आणि जगण्याच्या अनेक टप्प्यांवर एल्गार पुकारावा लागतो.

या महिन्याच्या अंकाचं हेच विशेष आहे. FC road या चळवळीमुळे गेल्या दीड वर्षात तरुण मित्र-मैत्रिणी लिहिते झाले. व्यक्त होण्याकडे गांभीर्याने बघू लागले. आतापर्यंत इथे लिहिणाऱ्यांनी काहीसे लालित्य असणारे विषय हाताळले आपण वाचकांनी ते वाचलेत. त्याला प्रतिसाद दिलात. वाचक आणि लेखकांच्या मिळालेल्या साथीमुळेच FC road नवनवीन प्रयोग करू पहातो आहे.

या महिन्याचा विषय काहीसा गंभीरतेकडे झुकणारा असा आहे. आणि अपेक्षेप्रमाणे सर्व लिहिणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी वैविध्यपूर्ण आणि समतोल लेखन केले आहे त्यामुळे कुटुंबात होणाऱ्या एल्गारा पासून ते कविवर्य सुरेश भट यांच्या ओळीची याद करून देणाऱ्या एल्गारा पर्यंत; तर चिमुरड्या शाळकरी मुलीपासून ते दोन मुलांच्या आई पर्यंत असे एल्गाराचे वेगवेगळे पैलू, कथा, कविता आणि लेखांमधून तुम्हाला वाचता येतील.

अंकासाठी हाच विषय निवडण्यामागचा उद्देश तरी नेमका काय होता हे नमूद करायचे झाल्यास या अंकात ज्यांचा लेख समाविष्ट आहे त्या अजय निंबाळकर यांच्या लेखाचा आधार घेऊन म्हणेन की,

भेद विसरुनी सारे परिवर्तनाची ज्योत पेटवणारा एल्गार करायचा आहे. हा आणि इतकाच उद्देश.

विषय जाहीर केल्यानंतर चौफेर लिखाण पाठवून सर्वांनी आपला सहभाग नोंदवला त्यांचे धन्यवाद.

अंक वाचा. प्रतिक्रिया जरूर कळवा. आमचा इ-मेल आयडी आहे. fcroademagazine@gmail.com

- अक्षय


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि