50 70
Download Bookhungama App

फास्टर फेणेचा कंपू - लीलावती भागवत

Description:

फा.फे. च्या एका पाठोपाठ एक अशा वीस पुस्तकांतून तुम्हाला त्याच्याबरोबर हिंडवलं. भागवतांच्या आठवणी म्हणून तुम्हाला या फास्टर फेणेच्या कंपूबद्दल आणि त्यांच्याबद्दल इतरही काही महत्त्वाचं सांगावं असं ‘दै. सकाळ’चे संपादक श्री. अनंत दीक्षित यांना वाटलं ‘सकाळ’मधले सर्व लेखांचं एक पुस्तकच छापायचं ठरवलं. तेच हे छोटं पुस्तक.प्रकाशकाचे मनोगत मुलांनो, तुमचे आवडते लेखक भा. रा. भागवत यांनी तुम्हाला एक जानी दोस्त दिला- फास्टर फेणे! या फा. फे. च्या एका पाठोपाठ एक अशा वीस पुस्तकांतून तुम्हाला त्याच्याबरोबर हिंडवलं. भागवतांच्या आठवणी म्हणून तुम्हाला या फास्टर फेणेच्या कंपूबद्दल आणि त्यांच्याबद्दल इतरही काही महत्त्वाचं सांगावं असं ‘दै. सकाळ’चे संपादक श्री. अनंत दीक्षित यांना वाटलं. त्यांनी लीलावती भागवत यांना तसं सुचवलं. त्यांनी ‘हो’ म्हटलं आणि मग सुटीच्या पानात रोज एक असे एकूण सतरा लेख तुम्हाला फास्टर फेणेच्या कंपूबद्दल वाचायला मिळाले. आणखी एक लेख ‘सुपर ज्यूनिअर टाइम्स’ यात नंतर आला. पुष्कळशा मुलांनी ‘सकाळ’मधले सगळे लेख वाचले. तसं कळवलं देखील. पण सगळ्याच मुलांना ते क्रमश: किंवा सगळे वाचायला मिळाले असं नाही. तेव्हा त्या सर्व लेखांचं एक पुस्तकच छापायचं ठरवलं. तेच हे छोटं पुस्तकं. फा. फे. च्या वीस पुस्तकांचा संच घेणाऱ्याला हे पुस्तक भेटीदाखल देणार आहोत आम्ही. धडपड्या फास्टर फेणेला थोडी विश्रांती द्यावी असं वाटून भागवतांनी तुम्हाला दुसरा एक हीरो दिला. थोडा मोठ्या वयाचा बिपिन बुकलवार. विनू आणि मोना या दोन मुलांना घेऊन यानंही साहसं केली. ‘घड्याळाचे गुपित’, ‘मुंबईला चक्कर’, ‘दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा’, ‘अक्काचं अजब इच्छासत्र’ या त्यांच्या साहसाच्या चार कादंबऱ्या. हा बिपिन धाडसी होताच; पण पुस्तकवेडाही होता. जुनी दुर्मिळ पुस्तकं वाचून काढायची हा त्याचा छंद, पण नुसतं स्वतः वाचून त्याचं समाधान होईना. कारण तो होता गोष्टीवेल्हाळ. मग विनू-मोना मागे लागयची आणि त्यांना आणि त्यांच्या मित्रमंडळींना बिपिन त्या वाचलेल्या गोष्टी खुलवून सांगायचा- “बिपिन बुकलवार सांगतो आहे.” या सगळ्या रंगतदार गोष्टींची पुस्तकं आहेत : ‘अक्काचे अजब इच्छासत्र’, ‘दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा’, ‘मुंबईला चक्कर’, ‘साखरसोंड्या’, ‘थँक्यू मि. शार्क’, ‘जुनाट भावळीची भन्नाट कथा’, ‘दर्याई डाकू सार्की’, ‘डाकू बनला डिटेक्टिव्ह’ इ. फास्टर फेणेची पुस्तकं नव्याने पुन्हा आणि बिपिनची ही पुस्तकं तुमच्या भेटीला लवकरच येत आहेत. भागवतांची इतर काही छोटी, मोठी चटकदार गोष्टींची पुस्तकं पण आहेत. त्यात ‘मायापूरचे रंगेल राक्षस’, ‘जंगल बुकातील दंगल आणि त्या दंगलीतील दोन पोरगे’. हा सगळा पुस्तकांचा खजिना तुम्हाला तुमच्या सगळ्या सुट्ट्यांमधून वाचायला पुरणार नाही एवढा मोठा आहे. तेव्हा या आता तो लुटायला! - सौ. सविता जोशी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि