Id SKU Name Cover Mp3
Ekach Pyala Samiksha Parva


60.00 116.00
Download Bookhungama App

एकच प्याला : समीक्षा पर्व - डॉ. विनायक गंधे

Description:

एकच प्यालाने भारतीय जीवनधारणा, श्रद्धा, संकेत यांचे प्रत्ययकारी दर्शन घडविले. त्यामुळे तत्कालीन मराठी वाङ्मयाचेच केवळ नव्हे, तर मराठी जीवनाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रातिनिधिक नाटक हेएकच प्यालाचे वैशिष्ट्य आहे.गडकऱ्यांच्या नाट्यकृतीतएकच प्यालाला विशेष स्थान आहे. नाटककार म्हणून गडकऱ्यांची क्षमता काय होती, याची कल्पना या नाटकावरून येते. मराठी नाट्यसृष्टीत ज्या महत्त्वपूर्ण शोकांतिका आहेत त्यांतएकच प्यालाअग्रस्थानी आहे. भारतीय जीवनधारणांना प्राधान्य देऊन गडकऱ्यांनी ही शोकांतिका लिहिली, त्यामुळे या शोकांतिकेला विवक्षित रूप आले. ही बहुकेंद्री नाट्यकृती तिच्या अर्थबहुल रूपामुळे विविध दृष्टिकोण व्यक्त करणारी ठरली आहे. एक समस्याप्रधान नाटक, शेक्सपिअरच्या पद्धतीची शोकांतिका, भारतीय जीवनमूल्यांचा आविष्कार, हिंदू स्त्रीच्या सत्त्वपरीक्षेची कहाणी असे विविध दृष्टिकोण या नाटकात व्यक्त झाले आहेत. गडकरीपूर्व काळात अशा प्रकारची शोकांतिका लिहिली गेली नाही. तसेच मराठी रंगभूमीवर अशी दीर्घकाळ प्रभाव गाजविणारी शोकांतिका लौकर अवतीर्ण झाली नाही. ‘नटसम्राटसारखी प्रभावी शोकांतिकाएकच प्यालानंतर पन्नास वर्षांनी रंगभूमीवर आली. प्रयोगक्षमता आणि वाङ्मयीन गुणवत्ता या दोन्ही गुणांनीएकच प्यालामराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण ठरले. आपल्या अंगभूत सामर्थ्याने आजही ते आवाहनक्षम ठरले आहे. ‘एकच प्यालाने भारतीय जीवनधारणा, श्रद्धा, संकेत यांचे प्रत्ययकारी दर्शन घडविले. त्यामुळे तत्कालीन मराठी वाङ्मयाचेच केवळ नव्हे, तर मराठी जीवनाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रातिनिधिक नाटक हेएकच प्यालाचे वैशिष्ट्य आहे.

एकच प्यालाचा निर्माता दुर्दैवी ठरला. आपल्या नाटकाचे यश गडकऱ्यांना पाहाता आले नाही. पण नाटक विलक्षण भाग्यवान ठरले. गेल्या पंचाहत्तर वर्षात या नाटकावर खूप विचारविमर्श झाला. या नाटकाची समीक्षा त्याच्या निर्मितिवर्षापासून आजतागायत सुरू आहे व यापुढेही ती चालू राहील. भिन्न अभिरुचीच्या आणि प्रवृत्तीच्या समीक्षकांनी या नाटकाबद्दल आवर्जून लिहिले आहे. ‘एकच प्यालाच्या समीक्षा व्यवहारात सामान्य रसिकांपासून विचक्षण समीक्षकांपर्यंत सर्वांचा सहभाग आहे. ‘एकच प्यालाच्या समीक्षेत केवळ विविधताच नाही, तर कमालीची मताभिन्नता आहे. या नाट्यकृतीतील विविध घटकांबद्दल अभ्यासकांनी परस्परविरुद्ध मते नोंदविली आहेत. ‘एकच प्यालाचा समीक्षाव्यवहार मोठा गुंतागुंतीचा आणि गोंधळात टाकणारा आहे. एका अभ्यासकाला या नाटकातील जो घटक महत्त्वपूर्ण वाटतो तो दुसऱ्या अभ्यासकाला अत्यंत गौण वाटतो. या नाट्यसमीक्षेतील परस्परविरोधी चित्रे अन्य साहित्यकृतींच्या समीक्षेत सहसा आढळणार नाहीत. या नाटकाचे श्रेष्ठत्व अभ्यासकांना वेगवेगळ्या गोष्टीत दिसते त्याप्रमाणे या नाटकाच्या लोकप्रियतेची त्यांची मीमांसाही वेगवेगळ्या प्रकारची आहे. ‘एकच प्यालासमीक्षकांना व अभ्यासकांना सतत विचारप्रवृत्त करीत आले आहे.

एकच प्यालाच्या समीक्षेने मराठी नाट्यसमीक्षा सतत जागृत राहिली. गेल्या पंचाहत्तर वर्षात या नाटकाच्या समीक्षेने अनेक वळणे घेतली. या समीक्षेचा समग्र आलेख पाहिल्यास त्यातून मराठी मनाच्या वृत्ती- प्रवृत्तींचे दर्शन घडते. या नाटकाच्या समीक्षेतून जे विचारमंथन झाले त्यातून केवळ मराठी नाट्यसमीक्षेचा आलेख उभा राहातो असे नव्हे, तर त्यातून आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणाही प्रकट होतात. ‘एकच प्यालासारख्या महत्त्वपूर्ण कलाकृतीचा विचार केवळ साहित्यसमीक्षेपुरता मर्यादित राहात नाही. तो सामाजिक- सांस्कृतिक अंगांना स्पर्श करतो. त्यातून संस्कृतीतील विचारधारा आणि मूल्ये यांचे मंथन होते. ‘एकच प्यालाने या विचारमंथनाला गती दिली म्हणून अशा कलाकृतीचा आणि तिच्या समीक्षेचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

एकच प्यालाजेवढे विवाद्य तेवढेच लोकप्रियही ठरले. या नाटकाबद्दल किंवा त्याच्या उपांगांबद्दल कितीही मतभिन्नता असली तरी एक समर्थ आणि प्रभावी नाटक हे त्याचे स्वरूप कोणालाच नाकारता आले नाही.

 

एकच प्यालाजसे मराठी भाषेचे उर्जस्वल रूप प्रकट करते, तसे मराठी संस्कृतीच्या अंगोपांगांचे दर्शन घडविते. म्हणून अशा कलाकृतीचा अभ्यास केवळ साहित्याच्याच नव्हे, तर संस्कृतीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरतो.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि