60 120
Download Bookhungama App

एकाच सर्कशीत अनेक रिंगणे - भा.रा.भागवत

Description:

हार्टेन्झ कॅलिशर या लेखिकेच्या कथांचे भा. रा. भागवत यांनी केलेले अनुवादन.प्रास्ताविक अमेरिकेच्या अग्रगण्य नवकथाकारांत मिस् हॉर्टेन्झ कॅलिशर या लेखिकेने गेल्या पंधरा वर्षांतील आपल्या ललित लेखनाने स्वतःचे असे एक स्थान मिळविले आहे. सर्वसामान्य परिस्थितीशी एखाद्या असामान्य अवस्थेचा असलेला विरोध त्या फार ठळकपणे रंगवतात. अतृप्त मनाची ओढ त्यांच्या सर्व कथांमधून उत्कटपणे उमटलेली असते. त्यांची एक नायिका कम्युनिस्ट पक्षात शिरते ती कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर केवळ स्वतःचा एकाकीपणा घालण्यासाठी. उलट न्यूयॉर्कसारख्या गजबजलेल्या शहरात राहणारी त्यांची दुसरी नायिका जनसंपर्कापासून अंग चोरून दूर राहते आणि स्वतःच्या वैधव्यप्राप्त एकाकीपणातच समाधान मानते. सर्वसामान्य जीवनापासून बुद्ध्या अलिप्त ठेवलेला त्यांचा ‘पोकळ पोरगा’ शून्यतेला वैतागून घर सोडून जातो; तर मिनॉ घराण्यातली त्यांची मिसेस् फे आपल्या पिढीजात गुणाचा उपयोग करून स्वतःचे ढासळत चाललेले जीवन सावरू पाहते. त्यांच्या कथासृष्टीतील सर्वच पात्रे कुठल्यातरी अस्वस्थ, अतृप्त, अशांत अवस्थेविरुद्ध धडपड करीत असतात. त्या धडपडीमुळेच की काय लेखनशैलीला एक प्रकारचा कापरेपणा, बोजडपणा आल्यासारखा वाटतो. असे असले तरी कथेचे समग्र स्वरूप एकदा लक्षात आले की अंतर्मनाचे व्यापार रंगवण्यात लेखिका समर्थ ठरली आहे याबद्दल शंका वाटत नाही.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि