60.00 116.00
Download Bookhungama App

दूरदूरच्या वाटा - वि. ग. कानिटकर

Description:

झांबिया (उत्तर ऱ्होडेशिया) व झिंम्बाब्वे (दक्षिण ऱ्होडेशिया) या देशांची प्रवासवर्णने आणि अजून बऱ्याच देशांची प्रवासवर्णने वाचा आता इ-बुक स्वरुपात.प्रास्ताविक

हा माझ्या प्रवासलेखांचा पहिलाच संग्रह. मला प्रवासाचा विपुल योग आला व त्या त्या वेळी प्रवासाची टिपणेही करीत गेलो. परंतु प्रवास संपल्यावर स्वस्थपणे प्रवासलेख लिहायचे ते प्रत्येकवेळी लिहिले गेले नाहीत. इतर प्रकारच्या लेखनातील व्यग्रता, काही आळस व लिहू केव्हातरी या भ्रामक समजुतीने असे झाले. मात्र काहीवेळा जे पाहिले, अनुभवले, त्याचा तगादा इतका होता की काही प्रवासलेख वेळच्यावेळी लिहून झाले. त्यांचाच हा संग्रह.

शोध-पत्रकारिता ही आता अलीकडे खूपच वाखाणली जात आहे. ध्वनिफितीचा सुलभ वापर अशा पत्रकारितेला मोठा उपकारक ठरला आहे. परंतु पंचवीस वर्षांपूर्वीमाणूससाप्ताहिकाने, तामिळनाडूतील बदलते राजकीय चित्र अभ्यासण्यासाठी श्री. . जोशी, विद्याधर पुंडलिक व मी अशा तिघांना पाठवले व त्या निमित्ताने आम्ही तिघांनी अशा प्रकारचे प्रवासलेखन केले. आमचे तिघांचे ते पहिलेचदक्षिणायनहोते. त्या सर्व लेखांचा संग्रह वेळीच निघता तर बरे झाले असते. पण तो योग नव्हता. या लेखनातील माझे तीन लेख या संग्रहात आहेत.

इंग्लंड-अमेरिकेचा प्रवास झाला तेव्हा या दोन्ही देशातील प्रवास-वर्णनांची अनेक पुस्तके भराभर लिहिली जात होती.

वाचकांच्या दृष्टीने या प्रवास-वर्णनातील नाविन्य संपले होते. म्हणून मला हे देश साकल्यरूपाने जसे भेटले त्याचे दोनच लेख मी लिहिले. प्रवासाच्या अनेक तऱ्हा असतात. प्रवासी कंपन्यांमार्फत अनेकजण प्रवास करतात. असे प्रवास मीही केले. यापैकीनेपाळप्रवासाची हकिकत विस्तृतपणे लिहून झाली.

झांबिया (उत्तर ऱ्होडेशिया) व झिंम्बाब्वे (दक्षिण ऱ्होडेशिया) या देशांचा प्रवास मात्र मी कटाक्षाने व तपशीलाने लिहिला. कारण या प्रदेशातील एकही प्रवासवर्णन अद्याप मराठीत काय पण इंग्रजीतही माझ्या वाचनात आलेले नव्हते. माझे लेखन हेच पहिले असावे. ‘अरण्यहा या संग्रहातील लेख वगळता बाकी पूर्व आफ्रिकेतील प्रवासवर्णनाचे माझे लेख या संग्रहातच प्रथम प्रकाशित होत आहेत. 

माणूस’, ‘किर्लोस्कर,’ वाङ्मयशोभा’, ‘निशादया नियतकालिकांच्या संपादकांनी दिवाळी अंकांतून हे प्रवासलेखन करायला मला उद्युक्त करून उपकृत केले आहे. नाहीतर इतर अनेक दूरदूरच्या वाटा तुडवूनही त्या जशा शब्दबद्ध झाल्याच नाहीत तसेच या प्रवासांचेही झाले असते. या सर्व नियतकालिकांच्या संपादकांचा मी आभारी आहे.

-   आणि पुस्तकरूपाने हा संग्रह निघत आहे, याचे सारे श्रेयविमल प्रकाशनचे श्री. विनोद सरपोतदार यांचे आहे.

पुस्तकाची कल्पना त्यांचीच. त्यांनी जर मनावर घेतले नसते तर हे पुस्तकाचे काम इतक्या थोड्या अवधीत, इतक्या चांगल्या प्रकारे झाले नसते हे आभारपूर्वक नमूद करायला हवेच.

 

वि. . कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि