60 116
Download Bookhungama App

दूरस्थ ग्रेस - श्रीनिवास हवालदार

Description:

‘दूरस्थ ग्रेस’ ही ‘इंदूर’ येथील श्रीनिवास हवालदार यांनी फेसबुक वरील ‘न लिहिलेली पत्रे – unwritten letters’ या पेज वर प्रकाशित केलेली पत्र मालिका. ग्रेसांच्या कवितांचा मागोवा घेत असताना या पत्रांमधून हवालदार यांनी ग्रेस यांच्या निर्मितीमधील अर्थगर्भितता उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘Durastha Gres’ is a compilation of series of letters published on Facebook page named ‘न लिहिलेली पत्रे - Unwritten Letters’ written by Shriniwas Havaldar. In these letters Mr. Havaldar has explored deep rooted meaning of ‘Grace’ poems.प्रकाशकाचे मनोगत १९९८-९९ च्या दरम्यान दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर लता मंगेशकर यांनी गायलेले ‘भय इथले संपत नाही... हे गीत श्रीनिवास हवालदार यांनी ऐकले. सुमती क्षेत्रभाडे यांच्या कादंबरीवर आधारित ‘महाश्वेता’या मालिकेचे हे शीर्षक गीत होते. गाण्याच्या शेवटी ग्रेस यांचा उल्लेख होता. हे गाणे एकूण श्रीनिवास हवालदार आणि त्यांच्या पत्नी दोघेही भारावून गेले. एवढे की त्यांनी, कवी ग्रेस कोण याचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांनी इंटरनेट द्वारे ग्रेस यांच्या बद्दल बरीच माहिती मिळवली. ही माहिती मिळवत असताना ग्रेस यांच्या कवितांना मिळालेल्या ‘दुर्बोध’ या विशेषणाच्या कुतूहलाने हवालदार यांना ग्रेस सारखा प्रतिभावंत कवी नेहमीसाठी दुर्बोधच राहणार का? असा प्रश्न पडला. या प्रश्नांचे उत्तर शोधात असताना हवालदार यांनी ग्रेस यांच्या कवितांचा झपाटल्या अभ्यास केला. ग्रेसांच्या कवितांमधील अर्थ उलगडून रसाळ भाषेत त्यांचे रसग्रहण केले आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील वाचकांसाठी ते खुले केले. श्रीनिवास हवालदार ह्यांच्ये “ग्रेसच्या कविता – धुक्यातून प्रकाशाकडे” हे पुस्तक कॉन्टिनेनटल प्रकाशन पुणे ह्यांनी प्रकाशित केले आहे. फेसबुकवरील ‘न लिहिलेली पत्रे – unwritten letters’ या पेजच्या माध्यमातून हवालदार यांनी लिहिलेल्या ‘दूरस्थ ग्रेस’ या पत्र मालिकेला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ही पत्रमालिका ‘दूरस्थ ग्रेस’ या नावाने ई बुक स्वरुपात प्रकाशित करण्यात येत आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि