Id SKU Name Cover Mp3
Duniya Rangbirangee


60.00 116.00
Download Bookhungama App

दुनिया रंगबिरंगी (प्रवासवर्णने) - सौ. ज्योती दाते

Description:

हे सर्व लेख मी मूलतः स्वान्तसुखाय लिहिलेले आहेत. कारण आपण जे एकदा पाहिले व अनुभवले ते विस्मरणाच्या खोल दरीत हरवण्याआधी कागदावर उतरवले तर तोच आनंद आपण स्वतः पुनः पुन्हा  घेऊ शकतो व इतरांनाही देऊ शकतो. असे प्रवास करण्याची ज्यांना संधी मिळत नाही त्यांना या लेखांमधून थोडा तरी प्रवासानंद मिळवता यावा व ज्यांनी केलेले आहेत त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा हा हेतू या लेखनामागे आहे.

- ज्योती दातेप्रस्तावना

आधुनिक जीवनात ऐहिक सुख खूप मिळते. परंतु त्यातून तयार होणारी जीवनशैली मात्र अनेक प्रकारच्या दडपणातून साकारत असते. त्यातून वर्षातील १५-२० दिवस सुटका करून घेण्याची रीतही त्याच आधुनिक जीवनशैलीने योजली आहे. त्या रीतीचे नाव पर्यटन! आज अनेक प्रगत उत्पादक राष्ट्रांमध्ये पर्यटनाला संपत्ती निर्माण संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाते आणि ओघानेच अशा देशात सुंदर रस्ते, हॉटेल्स, प्रत्यक्ष पर्यटन स्थळे तेथील सुखसोयी पर्यटकांना आंतरिक समाधानही देत असतात.

पर्यटनातून लाभणारे आंतरिक समाधान शब्दरूपात मांडता येणे ही एक खास अशी कला असते. ‘सुंदर तेचि वेचावे, अधिक सुंदर करूनी मांडावे, स्व-इतरांसाठीहे कुठल्याही कलेच्या संदर्भातील ब्रीदवाक्य पर्यटन विषयक लिखाणालाही लागू पडते याचा प्रत्यय मला आला तो श्रीमती ज्योती दाते यांच्यादुनिया रंगबिरंगीया पुस्तकाची प्रकाशनपूर्व मुद्रणप्रत वाचताना. स्वतःच्या सौंदर्यदृष्टीला भावलेला स्थान तपशील नेमकेपणाने मांडणे आणि तो वाचणाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी उद्युक्त करणे असे दुहेरी उद्दिष्ट्य पूर्ण होताना श्रीमती ज्योती दाते यांच्या प्रवासवर्णनात स्पष्टच जाणवते.

या पुस्तकात एकूण २६ प्रकरणे आहेत. प्रस्तावनेत त्या सर्वच प्रकरणांचा उल्लेख करणे शक्य होणार नाही, परंतु ती सर्वच प्रकरणे त्या स्थळी पोहोचणाऱ्यांना उत्तम मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास वाटतो. शिवाय ज्योती दाते यांच्या लिखाणाचा आनंदही प्रवाशांच्या सोबतीला असेल तर दुधात योग्य त्या प्रमाणातील साखरच!

या दृष्टीने मला विशेष भावलेली प्रकरणे आहेत,  अलास्का क्रूझ- एक मज्जाच मज्जा,’ ‘यात्रा पवित्र भूमीची - जॉर्डन व इस्त्रायलची,’ ‘तुर्कस्थान १, , ३ व तुर्कस्थानचा महानायक-अतातुर्क,’ ‘नैरोबी केनियाच्या जंगलातील अदभुत् क्षण,’ ‘राजेशाही रशिया,’ ‘ब्राइस कॅनियनया सर्व प्रकरणात ज्योती दाते यांच्या तर्कबुद्धीला लाभलेली त्यांच्या सृजन बुद्धीची साथ प्रकर्षाने जाणवते आणि म्हणूनच त्यांच्या प्रवासवर्णनांना एक उच्च अभिजात दर्जा प्राप्त झालेला आढळतो.

ईशान्य भारत-एक धगधगणारी समस्याहे या पुस्तकातील प्रकरण ज्योती दाते यांच्या राष्ट्रीय सकारात्मक संवेदनशीलतेची ओळख करून देणारे आहे. राष्ट्रीय स्वरूपाच्या भारतीय आस्था-व्यथांचे या प्रकरणातील त्यांचे शब्दचित्रण अत्यंत प्रभावी झालेले आहे. त्यांचे या प्रकरणीचे सर्वच निष्कर्ष अतिशय योग्य आहेत. सदर लेखात झालेला ले. . रमेश कुलकर्णी व श्रीमती मीना कुलकर्णी या मित्रद्वयांचा उल्लेख मला खूप स्पर्शून गेला.

 

या पुस्तकाला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा...

- रवी परांजपे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि