60 116
Download Bookhungama App

दुखरी नस - मयुरेश वाटावे

Description:

‘दुखरी नस’ हा गोव्यातील पत्रकार मयुरेश वाटवे यांच्या ‘गोमन्तक’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या विनोदी लेखांचा संग्रह आहे. ‘Dukhari Nas’ is a compilation of satirical articles written by Mayuresh watve a Journalist from Goa. These articles were published in ‘Gomantak’ and ‘Lokmat’ leading Marathi news papers from Goa state.प्रस्तावना इंग्रजी दैनिकांमध्ये ‘मिडल’ नावाचे हलकेफुलके आणि दैनंदिन घडामोडींवर हसतखेळत भाष्य करणारे सदर असते. त्यात गंभीर विषय हाताळले जात नाहीत अन् वैचारिकतेशीही सलगी असत नाही. गोव्यातील ‘गोमन्तक’ दैनिकाच्या रविवारच्या आवृत्तीत सलग काही वर्षे अशाच हलक्याफुलक्या विषयांची दखल घेत मयुरेश वाटवे या तरुण, होतकरू पत्रकाराने ‘दुखरी नस’ नेमकी पकडली. वाटवे यांची शैली कधी उपरोधिक असते तर कधी चिंतनाची गंभीर किनार तिला असते. मात्र उपदेश, संदेश, लोकशिक्षण वा प्रबोधनाचा आव ते आणत नाहीत अन् त्यातच त्यांच्या लिखाणाचे मर्म आहे. ‘दुखरी नस’ ची शब्दसंख्या थोडी अधिक असली तरी त्यांना विषयाचे वावडे नाही अन् बंधनही. पत्रकाराची लेखणी सर्वसंचारी असावी लागते अन् निरीक्षणशक्ती तरल. वाटवे यांच्यापाशी हे गुण आहेत विनोदाला अतिशयोक्तीचा आधार घ्यावाच लागतो ‘मला खेळायचं आहे’ या लेखात त्याचा चांगलाच प्रत्यय येतो. ते म्हणतात ‘साल २०२३. पण ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी आपण फिट असल्याचं सचिननं जाहीर केलं आहे.’ ५०० कसोटी, १२ हजार धावा आणि वय वर्षे ५० असे अफलातून ‘कॉम्बिनेशन’ करताना मयुरेशची कल्पनाशक्ती स्वैर विहार करते. विशेष म्हणजे माही धोनीच्या मुलाच्या नेतृत्वाखालील संघात तेंडुलकर खेळतो आहे, ती कल्पना तर केवळ भन्नाटच नसून उत्तुंग षटकार ठरावी. लेखनाचे निम्मे यश शिर्षकांमध्ये असते. वाटव्यांना ती नसही गवसलेली आहे. ब्रेकिंग न्यूज, सच का सामना. जंगल जंगल बात चली है, मटका बंद झाल्यानंतर आमचे स्वातंत्र्य ‘दीन’, संगीत ‘रत्न’, अॅट सोर्स, ‘काँक्रिट’ भावना ही काही उदाहरणे. - सुरेश वाळवे, माजी संपादक, ‘नवप्रभा’, पणजी


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि