60 140
Download Bookhungama App

दुभंग - स्नेहल क्षत्रिय

Description:

दुभंग' ही बुक हंगामाच्या 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक वरील एक सुंदर अशी पत्रमालिका आहे.प्रस्तावना समीर, त्या घटनेला आता बरेच दिवस उलटून गेले आहेत. माझी तब्येत आता ठीक आहे. ठीक म्हणजे, शारीरिक इजा झाल्या होत्या की नाही ते तर नीटसं आठवतही नाहीये पण मानसिक इजा बऱ्या होतील की नाही माहीत नाही. ज्या आजाराने मला पूर्णतः ग्रासलं होतं त्यातून तू मला ज्या कौशल्याने बाहेर काढलं आहेस ते खरंच दुसरं कुणी करू शकलं असतं की नाही शंकाच आहे. तू आणि डॉ. हेमंतने जे कमालीचे प्रयत्न केले आहेत त्याचं मोल मी कधीच शब्दात मांडू शकणार नाही. तुझं जग खूप वेगळं आहे समीर. समुद्र हे तुझं जग आणि जहाज म्हणजे तुझे एक अनोखे घर. आता नेव्ही मध्ये आहेस म्हणून असंच म्हणायला लागेल कारण तुला तुझं हे जग खूप प्रिय आहे आणि त्याचा तुला अभिमान आहे हे मला तुझ्याबाबतीत आदराने सांगावसं वाटतं. तू आज माणूस म्हणून जो काही आहेस ना त्याचं सुद्धा फार कौतुक वाटतं मला. खरंच कुणी इतकं चांगलं कसं असू शकतं रे? कारण माझ्या भोवती जी माणसं आहेत ना ती फक्त हाडामासाची आहेत, त्यांना मन नावाचा कप्पा नाहीये. असो, खरं तर तू असा व्यक्ती आहेस ज्याच्यामुळे आज सुंदर आयुष्य पुन्हा माझ्या वाट्याला आलं आहे. तू येण्या आधी मी काय आयुष्य जगत होते ते नुसतं आठवलं तरी अंगावर काटा उभा राहतो आणि पुन्हा माझ्यासोबत तेच घडणार नाही ना असे प्रश्न मनात कल्लोळ माजवतात. म्हणून हे सगळं तुझ्याशी बोलावं असं वाटतं कारण मला फक्त तूच समजून घेऊ शकतोस. मला बरे करण्यात तुझा महत्त्वपूर्ण वाटा आहेत म्हणूनच तुझ्याशी खूप काही बोलायचंय. एकशील न माझं सगळं?


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि