60.00 116.00
Download Bookhungama App

डोहतळ - सी. एल. कुलकर्णी

Description:

समज आली की संकोच येतो. निरागसतेचा विस्फोट होतो. व्यक्ताला सीमा येतात अव्यक्त मुक्तच रहातं. कोंडलेली वाफ आणि विचारांचा गुदमर सारखेच असतात. त्यांना मुक्त करण्यासाठी शब्द सहाय्यक ठरतात. अविष्कार आकार घेतात आणि कविता प्रसवतात. मुळं मातीत रहातात खोल खोल जातात आणि तर्कअर्कांची फुले होतात. गोंडस सुगंधी - सालस.मनोगत

आकाशातले रंग आणि ऋतुंचे फुलोरे हे नेहमीच एकमेकांना पूरक असतात. शामल मेघावळींच्या पार्श्वभूमीवर पोपटहिरवे डोंगर उठूनच दिसतात. हिरव्या देठ पानांच्या फांदीवरचे लाल किरमिजी बाळतुरे गोंडस आणि लोभस असतात.

त्यांचे ते येतात फळतात, फुलतात, मोहरतात, गळतात एक सहज निसर्ग प्रक्रिया म्हणून.

पण पहाणारा पहात असतो. आस्वाद घेत असतो. गाभारे सजवत असतो कळत नकळत.

माणसाच्या मनातही ही प्रक्रिया अखंड चालू असते श्वासांसारखी, आपापल्या स्वभावदृष्ट्या लेवून, कधी व्यक्त कधी अव्यक्त.

समज आली की संकोच येतो. निरागसतेचा विस्फोट होतो. व्यक्ताला सीमा येतात अव्यक्त मुक्तच रहातं. कोंडलेली वाफ आणि विचारांचा गुदमर सारखेच असतात. त्यांना मुक्त करण्यासाठी शब्द सहाय्यक ठरतात. अविष्कार आकार घेतात आणि कविता प्रसवतात. मुळं मातीत रहातात खोल खोल जातात आणि तर्कअर्कांची फुले होतात. गोंडस सुगंधी - सालस.

 

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि