30 50
Download Bookhungama App

ध्येयनिष्ठा - श्री. ह. अ. भावे

Description:

यश मिळविणे म्हणजे तुमच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते जगाला देण्याचा प्रकार असतो. भारतीय तत्त्वज्ञानातील नियती आणि पूर्वजन्मातील पाप-पुण्य या कल्पनांनी माणूस फार दुबळा झाला आहे. सर्व काही नशिबावर अवलंबून आहे. कार्याची धडपड करुन काही उपयोग नाही अशी त्याची मनोवृत्ती बनलेली असते. यालाच कुपमंडुकवृत्ती म्हणतात. वाईट परिस्थितीचा व दारिद्र्याचा तो जणू स्वीकारच करतो. निश्चिपत ध्येयाअभावी त्याला निर्णय घेता येत नाही आणि धरसोड वृत्ती बळावते. अर्थात काही ध्येये ‘एका आयुष्यात’ गाठणे अशक्यच असते. पण ध्येयप्राप्तीसाठी झगडत राहण्यातच खरे सुख असते. ध्येयनिष्ठा नसेल तर अनेक गुण अंगात असलेला तरुणसुद्धा बाजुला पडतो. ध्येयनिष्ठ खेड्यातील तरुणाचे शहरात हाल होतात. त्याला यश मिळवायची घाई होते. त्यामुळे ध्येयहीन तरुणांची मोठी फौज शहरात दिसते. तरुणांनी ध्येयासाठी जगायला हवे.या विषयी सखोल मार्गदर्शन या पुस्तकात आहे .प्रस्तावना ज्याला स्वत:चा विकास करावयाचा आहे त्याने स्वत:कडे गुणरूपी संपत्ती जमवली पाहिजे. इतरांच्या कुबड्या उपयोगी पडणार नाहीत. द्रव्यरुपी संपत्ती क्षणभंगूर असते. ‘धनिक पुत्राजवळ हे द्रवरुपी भांडवल असते’ परंतु; निदान महाराष्ट्रात तरी हे धनिक पुत्र कारखाने बंद पाडून दाखवितात. त्यांच्याकडे द्रव्यरुपी भांडवल असते पण चारित्र्य नसते. चारित्र्यरुपी संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ भांडवल असते, पण बहुतेक धनिक पुत्र मद्यपी तरी बनतात किंवा त्यांना निर्णय तरी घेता येत नाही. यश मिळविणे म्हणजे तुमच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते जगाला देण्याचा प्रकार असतो. भारतीय तत्त्वज्ञानातील नियती आणि पूर्वजन्मातील पाप-पुण्य या कल्पनांनी माणूस फार दुबळा झाला आहे. सर्व काही नशिबावर अवलंबून आहे. कार्याची धडपड करुन काही उपयोग नाही अशी त्याची मनोवृत्ती बनलेली असते. यालाच कुपमंडुकवृत्ती म्हणतात. वाईट परिस्थितीचा व दारिद्र्याचा तो जणू स्वीकारच करतो. निश्चिेत ध्येयाअभावी त्याला निर्णय घेता येत नाही आणि धरसोड वृत्ती बळावते. अर्थात काही ध्येये ‘एका आयुष्यात’ गाठणे अशक्यच असते. पण ध्येयप्राप्तीसाठी झगडत राहण्यातच खरे सुख असते. ध्येयनिष्ठा नसेल तर अनेक गुण अंगात असलेला तरुणसुद्धा बाजुला पडतो. ध्येयनिष्ठ खेड्यातील तरुणाचे शहरात हाल होतात. त्याला यश मिळवायची घाई होते. त्यामुळे ध्येयहीन तरुणांची मोठी फौज शहरात दिसते. तरुणांनी ध्येयासाठी जगायला हवे. जे महान नेते असतात ते ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार होतात. भगतसिंगासारखे ध्येयनिष्ठ तर ध्येयासाठी प्राणही देतात. ज्याकडे ध्येयनिष्ठा नसेल त्याला अपयश येते. चिकाटी आणि पोलादी वृत्ती ध्येयनिष्ठेमुळेच अंगी बाणते. चिकाटी आणि पोलादी इच्छाशक्ती या गुणांचीच जगात प्रशंसा होते. ध्येय साध्य करण्यास कोणताच तात्पुरता उपाय नसतो. ध्येयाचा पाठलाग एकाग्र चित्ताने करावा लागतो. ध्येयनिष्ठा हा काही जन्मजात गुण नाही. तो ‘प्रयत्नानेच’ मिळवावा लागतो.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)