Id SKU Name Cover Mp3
ढमी


60 140
Download Bookhungama App

ढमी - विजया यादव

Description:

ढमी नावाच्या दैनंदिनीशी लेखिकेचा मुक्त संवाद

It's a dialogue with a diary called Dhami.प्रकाशकाचे मनोगत  

परभणीची विजया यादव...एक दिवस सृजन ची जी “न लिहिलेली पत्रे” हि चळवळ आहे..तिथे आली. मला सुरुवातीला वाटले अनेक हौशी लेखक असतात..त्यातलीच हि एक असेल.  काही दिवसांनी उत्साह थंडावेल आणि मग दिसेनाशी होईल. पण माझ्या अनेक गैरसमजांपैकी हा एक होता आणि ह्याचा मला खप आनंद होतो आहे.  अफाट वाचन, वाचलेले पचवायची ताकद, अत्यंत मित भाषी पण एकदा का लेखणी हातात घेतली कि एक वेगळीच जाणवणारी विजया यादव तुमच्या सामोर सादर करताना सृजन ड्रीम्स ला खूप आनंद होत आहे. ढमी हे तिच्या डायरीचे नाव आहे. एरवी अत्यंत कमी बोलणारी  विजया डायरीशी मात्र मनमुराद संवाद साधते. विषयाचे बंधन नाही....एक निशब्द श्रोता आपण अत्यंत विश्वासू...तुम्हाला सुद्धा मान्य होईल....डायरी एवढा विश्वासू मित्र दुसरा असतच नाही. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमा पासून ढमीशी संवाद सुरु होतो...आणि मग विजया जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करते आणि तसे करता करता काही अप्रतिम भाष्य सुद्धा करते...उदाहरण द्यायचे झाले तर...हे वाचा... ""माणसाला रहायला जागा जास्त लागत नाही. प्रेम असले तर सारे पुरते....पूर्वी दोन रूमचा संसार नि दुसऱ्याच्या घराशी जोडणारी एक सामाईक भिंत हुंदक्याचा आवाज जरी गेला शेजारी कि शेजारच्या नागुरे काकू हजर ......का काय झालं हो कशाला रडता ? सगळं काही समजून उमजून घ्यायच्या ! ना जातीच्या ना पातीच्या. आणखी एक गोष्ट कळली “जात, धर्म माणसाचे फक्त आचरणाचे वेगळे मार्ग”. आतला माणूस तेवढा खरा !” विजया फूड टेक्नोलॉजी ह्या विषयातील तज्ञ आहे. पुस्तकांशी तिचे अतूट नाते आहे. सृजन ला तिच्या कडून खूप अपेक्षा आहेत. तिचे लिखाण तुम्हाला  निश्चित आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे.    

- सृजन


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि