60 124
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा – ब्रिटन - मालती दांडेकर

Description:

परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्या , चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा !मनोगत बालमित्रांनो,लोककथा म्हणजे काय हे तुम्हाला आता नीट माहीत झालेले आहेच! तुम्ही लहानपणी आपल्या वडिलधार्या मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. पशुपक्ष्यांच्या, चातुर्याच्या, गमतीच्या आणि शौर्यकराक्रमाच्या, त्या सगळ्या लोककथाच. यांतलाच एक मुख्य भाग परीकथांचा, म्हणजे अद्भुतरम्य कथांचा असे. खरे ना ? परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्यां, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा ! या दूरदूरच्या देशांतल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी तसेच तेथली भौगोलिक रचना, पीकपाणी-सारे कसे निराळेच ! या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व कथांइतक्याच त्याही तुम्हाला खात्रीने आवडतील. ब्रिटिश बेटे म्हटले की त्यात इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड या तिन्ही प्रांतांचा समावेश होतो. या सर्व देशांतल्या परीकथा सुंदर व रंजक आहेत. काही इंग्लिश परीकथा तर अतिशय बालप्रिय झाल्या असून त्यांचे अनेक भाषांत रुपांतर झालेले आहे. उदा. जादूचा घेवड्याचा वेल (जॅक अँड द बीनस्टॉक) व ‘अंगठ्या’ (टॉमथंब) इत्यादी गोष्टी पाहाव्या. या पुस्तकात इंग्लंड व आयर्लंड या देशाच्या जरा वेगळ्या पण झकास परीकथा दिलेल्या आहेत.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)