60 120
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा –तुर्कस्तान - मालती दांडेकर

Description:

परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्याा, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा !तुर्कस्थान हा आशियातलाच, अरबस्थानापलीकडे असलेला एक देश; येथे मुस्लीम धर्म व संस्कृति आहे. म्हणूनच की काय, ‘अरबी भाषेतील सुरस गोष्टी ऊर्फ अरेबियन नाइट्स’ या फार प्रसिद्ध ग्रंथातल्या लोककथांचे येथल्या लोककथा परीकथांत फार साम्य दिसते. उदा. या पुस्तकातील ‘सोनेरी केसांची मुले’ ही कथा, अरबी कथा ‘तीन बहिणीची गोष्ट’ या कथेसारखीच दिसेल. या तुर्की कथांचे मूळ संकलन बेनॅक तेझेल नावाचे एक तेथेच राहणारे गृहस्थ होते त्यांनी केले इस्तंबूल इथे राहणार्याे वृद्ध तुर्की मंडळींकडूनही त्यांनी कथा मिळवल्या होत्या. त्या त्यांनी प्रसिद्ध केल्या व त्या पुस्तकावरून, मार्जोरी केन्ट यांनी ‘फेअरी टेल्स फ्रॉम टर्की’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. या शिवाय ‘एलिनोर बॉकेट’ यांनीही ‘टर्कीश फेअरी टेल्स’ नावाचे तुर्की कथांचे पुस्तक प्रसिद्ध केले. अशा या निवडक कथा. कथा अद्भुत चढाव सलीम, अवघा पंधरा वर्षांचा. बाप म्हातारा, आजारी आणि कर्जबाजारी. त्याने छप्पनदा सलीमला शाळेत घालायचा यत्न केला. पण छे, सलीम शाळेत गेला नाही ! रस्त्यात पोरं जमवून पळापळी, खेळ दंगा करायचा एवढचं शिकला. बापाने खूप सांगितलं, ‘आता कामा-धंद्याला लाग पोरा. मी काय, पिकलं पान, आज आहे उद्या नाही. पोटाला मिळवायला हवं तुला. नोकरी धर कुठेतरी.’ सलीम म्हणे-‘मी लहानसा. नोकरी नाही जमणार बाबा.’ एक दिवस म्हातारा मेला व सावकारानी त्याचं घर कर्जापोटी घेतलं अन् सलीमला दिलं हाकलून. तो पोर आता खराच पोरका झाला, पोट भरायला नोकरी करायलाच हवी, हे त्याला आता कुठे समजलं व वाट फुटेल तिकडे चालू लागला बिचारा. जुन्या वहाणा, फाटके-तुटके कपडे अन् वडिलांची एक दमास्कसहून आणलेली कट्यार, यापेक्षा त्याच्याजवळ काही नव्हतंच आणखी. दोन दिवस चालून-चालून दमला अगदी व एका शहराला पोचला. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. भरदुपारची वेळ. दर घरी जाऊन त्याने ‘थोडं अन्न देता का?’ म्हणून विचारलं, पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही, उलट उघडी दारं फटाफट बंद झाली ! जवळ एक नाणे नाही, जेवायला, खायला तर हवे दोन-तीन दिवसांनी तरी एकदा. काय करावे? एका घराच्या खिडकीशी तो उभा राहिला. पायही दुखतच होते. तोवर आतून त्याला कुणा म्हातार्या बाईचे बोलणे ऐकू आले. ‘टिपू, मोत्या, मनिमाऊ, पिवळ्या, काळ्या, चला सगळे जेवायला.’ काय गंमत ! ही हाक ऐकताच बागेत धुमाकूळ घालीत असलेली बरीच मांजरे घरात पळाली. ‘जेवायला सगळे या’ हाक होती ! आपणही ह्या सगळ्यांत मिसळून जावे झाले.’ सलीम मनात म्हणाला व मांजरांपाठोपाठ आत गेला. म्हातारी खेकसली-‘ए ! तू रे कोण? कशाला आलास?’ तो म्हणाला, तुम्ही ‘सगळे जेवायला या’ म्हणालात ना? मलाही भूक लागलीय फार म्हणून आलो. दोन दिवसात जेवण नाही मिळालं मला.’ म्हातारी हसली तिनं त्याला जेवायला दिलं, मग म्हणाली, ‘पोरा, तुझी हकीकत ऐकली मी. तू माझ्याजवळ राहा, माझा नोकर म्हणून. काम फारसं नाही पडणार. जेवाखायला देईन.’ बघ, राहतोस? पगारही देऊ थोडा-कसं?’ सलीमला तरी काय हवं होतं दुसरं? तो तेथे राहिला. सलीमची नोकरी सुरू झाली. काम फारसं नव्हतं हे खरं, पण जे होते ते फारच चमत्कारिक! म्हातारीची सहा केसाळ इराणी मांजरं होती पाळलेली, त्यांची सेवाशुश्रुषा हेच त्याचं काम. ती मांजरं मुलानातवंडासारखी तिची लाडकी. रोज सकाळी त्यांचे केस त्याला ब्रशने साफ करावे लागत. त्यांना सकाळी दुधाचा नास्ता द्यायचा. दुपारभर म्हातारी झोपेस्तोवर मांजरांची देखरेख. दोन्ही वेळा मांजरांचं खाणंपिणं नीट करायचं. रात्री मांजरं खोलीत, त्यांना छोट्या गाद्या घालून झोपू द्यायचं. मग कुठे तो झोपायला जायला मोकळा. पण खायला-प्यायला तर भरपूर मिळे ! फार झालं. (अपूर्ण)


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)