60 124
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा - डेन्मार्क - मालती दांडेकर

Description:

डेनमार्क हा छोटासा देश युरोपात जर्मनीच्या उत्तरेस व नॉर्वे स्वीडनच्या दक्षिणेस आहे. देश लहान असला तरी काय झाले ? येथल्या परीकथा मोठ्याच रंजक व आकर्षक आहेत. जादुगार, ड्रॅगन, सैतान हेही या कथात सद्गुणी नायिका व साहसी नायकांइतकेच महत्त्वाचे घटक कल्पिलेले आढळून येतात. डेन्मार्कला समुद्रतिन्ही दिशांनी बिलगलेला असल्याने त्याचेही वेगळे पण सुंदर वर्णन यात जागोजाग येणे स्वाभाविकच.मनोगत लोककथा म्हणजे काय हे तुम्हाला आता नीट माहीत झालेले आहेच. तुम्ही लहानपणी आपल्या वडिलधार्याह मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. पशुपक्ष्यांच्या, चातुर्याच्या, गमतीच्या आणि शौर्यपराक्रमाच्या. त्या सगळ्या लोककथाच. यातलाच एक मुख्य भाग परीकथांचा, म्हणजे अद्भुत रम्यकथांचा असे. खरे ना? परीकथा म्हणजे जादुगारांच्या, यक्षपर्याा, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात. इतकेच नव्हे तर त्यातून नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा ! या दूरदूरच्या देशांतल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी तसेच तेथली भौगोलिक रचना, पीकपाणी - सारे कसे निराळेच ! या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व त्या कथांइतक्याच याही तुम्हाला खात्रीने आवडतील. डेनमार्क हा छोटासा देश युरोपात जर्मनीच्या उत्तरेस व नॉर्वे स्वीडनच्या दक्षिणेस आहे. देश लहान असला तरी काय झाले ? येथल्या परीकथा मोठ्याच रंजक व आकर्षक आहेत. जादुगार, ड्रॅगन, सैतान हेही या कथात सद्गुणी नायिका व साहसी नायकांइतकेच महत्त्वाचे घटक कल्पिलेले आढळून येतात. डेन्मार्कला समुद्रतिन्ही दिशांनी बिलगलेला असल्याने त्याचेही वेगळे पण सुंदर वर्णन यात जागोजाग येणे स्वाभाविकच. डेनमार्कच्या परीकथांची दोन संकलने सुरेख आहेत. एक इंग हॅक यांचे व दुसरे स्वेन्ट ग्रंडलविक यांचे, दोन्ही पुस्तकांचे नाव ‘डॅनिश फेअरी टेल्स’ असेच आहे.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)