60 114
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा-नॉर्वे - मालती दांडेकर

Description:

नार्वे हा देश युरोपच्या उत्तरेला असून तेथल्या लोकांना ‘नॉर्स’ अस म्हणतात. या देशालाही प्राचीन संस्कृती व वाङ्मय यांचा भरताप्रमाणेच वारसा मिळालेला आहे. नॉर्स लोकांच्या दैवतकथा ‘ट्यूटॉनिक कहाण्या’ नावाने फार गाजलेल्या आहेत व त्यातल्या ‘ओडक्षन’ नायकावर महाकाव्य रचले गेले आहे. येथल्या परीकथा विविध व विपुल आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये नमूद करण्याजोगी आहेत. उदा. येथे उत्तरवार्यांचे नित्य थैमान चालते. म्हणूनच की काय, या परीकथांत उत्तरवारा हा एक प्रबल शक्तीचा, सर्वसंचारी व अनेक सिद्धी असलेला देव मानला गेला आहे. उदा. या संग्रहातली ‘सूर्याच्या पूर्वेला चंद्राच्या पश्चिेमेला’ ही कथा पहावी. नॉर्स लोककथांचे प्रसिद्ध संकलक व थोर लेखक सर जॉर्ज वेब् दासेन्ट हे होते. त्यांनी ‘पॉप्युलर टेल्स फ्रॉम नार्स’ हे या संकलनाचे सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या कथा जादूच्या, यक्षपर्यांॉच्या असून अतिशय रंजक आहेत.मनोगत लहानपणी आपल्या वडिलधार्याा मंडलळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. पशुपक्ष्यांच्या चातुर्याच्या,गमतीच्या आणि शौर्यपराक्रमाच्या. त्या सगळ्या लोककथाच. यांतलाच एक मुख्य भाग परीकथांचा, म्हणजे जादुगारांच्या रम्य कथांचा असे. खरे ना ? परीकथा म्हणजे जादुगारांच्या यक्षपर्या्, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यांत शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात. इतकेच नव्हे तर त्यातून नीतीबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या प्रथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातींतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशाच्या परीकथा ! या दूरदूरच्या देशांतल्या भौगोलिक रचना, पीकपाणी- सारे कसे निराळेच! या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व त्या कथांइतक्याच याही तुम्हाला खात्रीने आवडतील. नार्वे हा देश युरोपच्या उत्तरेला असून तेथल्या लोकांना ‘नॉर्स’ अस म्हणतात. या देशालाही प्राचीन संस्कृती व वाङ्मय यांचा भरताप्रमाणेच वारसा मिळालेला आहे. नॉर्स लोकांच्या दैवतकथा ‘ट्यूटॉनिक कहाण्या’ नावाने फार गाजलेल्या आहेत व त्यातल्या ‘ओडक्षन’ नायकावर महाकाव्य रचले गेले आहे. येथल्या परीकथा विविध व विपुल आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये नमूद करण्याजोगी आहेत. उदा. येथे उत्तरवार्या्चे नित्य थैमान चालते. म्हणूनच की काय, या परीकथांत उत्तरवारा हा एक प्रबल शक्तीचा, सर्वसंचारी व अनेक सिद्धी असलेला देव मानला गेला आहे. उदा. या संग्रहातली ‘सूर्याच्या पूर्वेला चंद्राच्या पश्चिामेला’ ही कथा पहावी. नॉर्स लोककथांचे प्रसिद्ध संकलक व थोर लेखक सर जॉर्ज वेब् दासेन्ट हे होते. त्यांनी ‘पॉप्युलर टेल्स फ्रॉम नार्स’ हे या संकलनाचे सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या कथा जादूच्या, यक्षपर्यांेच्या असून अतिशय रंजक आहेत.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)