60 126
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा - चीन - मालती दांडेकर

Description:

परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्याा, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा !मनोगत चीन हा आपल्या भारताच्या पूर्वेचा देश. या देशालाही भारताप्रमाणेच फार जुनी संस्कृती व प्राचीन वाङ्मय यांची परंपरा लाभलेली आहे. अर्थात प्राचीन लोककथाही तेथे खूप तऱ्हेतऱ्हेच्या वेगळेपणाने नटलेल्या आहेत. लोकांची समुद्राच्याशेजारी पुष्कळशी दाट लोकवस्ती, व मुख्य दैवत ड्रॅगन ऊर्फ प्रचंड जलसर्प हे असल्याने चिनी कथांतून ड्रॅगन्सचा उल्लेख अनेक वेळा महत्वपूर्णतेने येतो व जलराज्यासंबधित कथाही पुष्कळच आढळतात. या प्रांतातल्या कथा रूपांतरीत करण्याचे काम अनेक पाश्चा्त्य लेखकांनी केले. त्यांत लेस्ली बॉनेट यांचे ‘चायनीज फेअरी टेल्स, लेखक पिट्मन यांचे चायनीज फेअरी स्टोरीज्’ इ. पुस्तके आहेत. आणखीही इतरत्र खूप चिनी इंग्रजी परीकथांची पुस्तके आहेत. त्यातून या काही कथा निवडून घेतलेल्या आहेत.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)