250 500
Download Bookhungama App

दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी -

Description:

‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ या अद्भुत ग्रंथातील पुढील एक गोष्ट विद्यार्थीवर्गासाठी मुद्दाम निराळी काढून प्रसिद्ध करीत आहोत. मूळ ग्रंथ फार विस्तृत व विविध रसांनी परिपूर्ण असल्यामुळे तरूण विद्यार्थ्यांना चटकदार, मनोरंजक व बोधप्रद वाटेल अशी ही गोष्ट मुद्दाम निवडून काढली आहे. ऑडिओबुक स्वरूपात ... प्रस्तावना ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ या अद्भुत ग्रंथातील पुढील एक गोष्ट विद्यार्थीवर्गासाठी मुद्दाम निराळी काढून प्रसिद्ध करीत आहोत. मूळ ग्रंथ फार विस्तृत व विविध रसांनी परिपूर्ण असल्यामुळे तरूण विद्यार्थ्यांना चटकदार, मनोरंजक व बोधप्रद वाटेल अशी ही गोष्ट मुद्दाम निवडून काढली आहे. सिंदबादने निरनिराळ्या देशांत ज्या सफरी केल्या व व्यापारांत हजारो रूपये कमावले त्या सफरींचा हा वृतांत कल्पित व अद्भुत असला तरी त्यांत निरनिराळ्या देशांची जी माहिती आली आहे ती तरूण वाचकांना अनेक दृष्टींनी उद्बोधक व स्फूर्तीदायक वाटल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजी वाङ्मयांत रॉबिन्सन क्रूसो व गलिव्हर्स ट्रॅव्हल्स वगैरे पुस्तकें वाचून जशी तिकडील वाचकांच्या मनांत प्रवासाची स्फूर्ति उद्भवली तसाच सुपरिणाम ह्या सिंदबादच्या सफरी वाचून आपल्याकडील तरूणांच्या बाबतीत व्हावा व देशोदेशी प्रवास करून त्यांना नवीन ज्ञान संपादन करण्याची प्रेरणा व्हावी अशी आम्ही आशा करितो. आपल्याकडे पंचतंत्र, हितोपदेश, कथासरितासागर इत्यादि नीतिकथांचे संग्रह आहेत. पण त्यांत अरबी भाषेतील गोष्टीप्रमाणे अद्भुत रस नाहीत. आणि तरूण विद्यार्थ्यांना तर चमत्कारिक व अद्भुत गोष्टी वाचण्याची मनापासून गोडी असते. सिंदबादच्या वृतांतात कल्पनाही करता न येणाऱ्या अद्भुत गोष्टी आहेत, शिवाय त्यांपासून तरूण वाचकांना बोध, मनोरंजन व स्फूर्ति यांचाही लाभ होणार असल्यामुळे शालेय अधिकारी व शाळा खाते यांच्याकडून सिंदबादच्या सफरींचे योग्य चीज केले जाईल अशी आशा आहे. प्रकाशक


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि