60 116
Download Bookhungama App

चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे - भा.रा.भागवत

Description:

ज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहसवीराची साहस नवी कथामनोगत बालमित्रांनो ! कुविख्यात ‘ डोडो सर्कस ’ आणि तिचा अस्त झाल्यावर खूप नावाजलेली ‘ दि ग्रेट गोगो सर्कस ’ या सर्कशींची नावे तुम्ही ऐकलेली असतीलच. ‘डोडो सर्कशी ’ला ते नाव मिळण्याचे कारण पृथ्वीवरून नामशेष झालेला ‘डोडो ’ नावाचा दुर्मिळ पक्षी त्यांच्याकडे होता... (असं म्हणे ! एक दिवस ठोठो झाले आणि डोडोची पिसे उडून जाऊन तो एक रानकोंबडा असल्याचे उघडकीस आले !) ‘गोगो सर्कशी ’त असला काही बनावट प्रकार नव्हता. पण त्या संस्थेकडे कलाकार चिंकू चिंपाझी आणि इतर हुशार पशू-पक्षी खूप होते. अल्पावधीतच ‘गोगो ’ने चिकार कीर्ती मिळवली. एक दिवस पुण्याला मुक्काम असताना चिंकूला बदनाम करण्याचा घाट घालून दोन डोडोवाले सर्कशीच्या तंबूत घुसले. एकाने चिंकूला चोरून काहीतरी ‘औषध ’ पाजले. चिंकू झिंगला अन् सर्कशीच्या तंबूत वेडे चाळे करू लागला. अखेर तो तंबूबाहेर पळाला; एका बसमध्ये त्याने उडी टाकली. गंमत अशी की, हा ‘मॅटिनी शो ’ बघायला तुमचा लाडका मित्र बनेश ऊर्फ फास्टर फेणे अन् त्याची तशीच तुडतुडी मामेबहीण माली ही दोघे आलेली होती. त्यांनी धमाल धावाधाव करून चिंकूचा पाठलाग केला. डोडोवाल्यांनीही तसेच केले. शेवटी या डबल पाठलागाचा परिणाम असा झाला की, डोडोवाल्या डाकूंनी चिंकूला पकडून एका चहाच्या खोक्यात घातले अन् ते त्याला आगगाडीतून पुण्याला नेणार, तोच... फास्टर फेणेने चिंकूचे खोके हस्तगत करून त्याला टॅक्सीत घालून गोगो सर्कशीकडे चालवले. फास्टर फेणे नि माली भलती खुषीत होती. कारण ‘गोगो ’च्या दिलदार मालकांनी लावलेले ३००० रुपयांचे बक्षीस त्यांना आता मिळणार होते ! हा विस्मयजनक किस्सा पूर्वी तुम्ही अनेकांनी वाचला असेल. फलश्रुतीचा आनंद फास्टर फेणेला होता. मलाही वाटले- की फास्टर फेणेला नि मालीला बक्षीस नक्कीच मिळाले असणार आणि फास्टर फेणेच्या बहादुरीची एक कादंबरी आपण संपवली आहे असा खुषीत येऊन मी तिथेच मला पूर्णविराम दिला. कादंबरीला चिंकू चिंपाझी आणि फास्टर फेणे असे नाव देऊन पुस्तक छापून टाकले. पण... ‘दैव देते नि कर्म नेते ’ म्हणतात तसे झाले. एक कादंबरी संपली आणि दुसरी सुरू झाली. चिंकू पुन्हा हातचा निसटला... डोडोवाल्यांनी त्याला पळवले ! आणि मग जे पाठलागाचे नवे पर्व सुरू झाले ते फास्टर फेणेच्या पूर्वीच्या सर्व पराक्रमांवर कडी करणारे होते. ते सारे चित्तथरारक प्रसंग आता फास्टर फेणेच्या या नव्या कादंबरीत वाचा ! -भा. रा. भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि