60 134
Download Bookhungama App

चल उडुनी पाखरा - लीलावती भागवत

Description:

लीलावती भागवत यांच्या बालदोस्तांसाठी 'भिंगरी' आणि अजून बऱ्याच कथा.आज भिंगरीला सकाळपासून मुळीच चैन पडत नव्हतं. भिंगरीचं खरं नाव तसं म्हटलं तर आईनं मोठ्या हौसेने वसुधा ठेवलं होतं. पण तिला चालता यायला लागल्यापासून तिनं अशी काही भिरभिरायला सुरुवात केली की, “हिच्या पायाला जशी भिंगरीच आहे लावलेली” असं एक दिवस आई म्हणाली. आणि मग आजी, बाबा, मधू सगळे तिला भिंगरी म्हणायला लागले. तेच नाव शाळेत पडलं. तर, अशी ही भिरभिरणारी भिंगरी गेले काही दिवस तापामुळं अंथरुणात पडून होती. अजून ताप पूर्णपणे निघाला नव्हता आणि आणखी ‘दहा-बारा दिवस तिला शाळेत पाठवू नका’ असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. भिंगरीला घरात नुसतं बसून बसून कंटाळा आला होता. काही तरी करावं असं सारखं वाटत होतं. पण करणार काय? तिला बाहेर मैदानात जाऊन खेळता येत नव्हतं, डोंगरावर फिरायला जाता येत नव्हतं, नदीवर पोहायला जाणं तर शक्यच नव्हतं. कारण नुकताच तर तिचा ताप निघाला होता. मग तिला पाण्यात डुंबायला कोण जाऊ देणार? पण मग करायचं काय? तिला पुन्हा एकदा खूप कंटाळा आला. ती नुसती पडून राहिली होती अंथरुणावर. एवढ्यात डॉक्टर आले. भिंगरी आज डॉक्टरांच्यावरही खूप रागावली होती. का रागावणार नाही? त्यांनी तिला सांगितलं होतं, “तू आठ दिवसांत फिरायला जाशील” आणि आता पंधरा दिवस ती झोपून राहिली तरी म्हणे- “आणखी आठ दिवस शाळेत जाऊ नकोस.” म्हणून डॉक्टर आले तरी ती आज हसलीच नाही त्यांच्याकडे पाहून. डॉक्टर आले त्यांनी तिला हळूच थोपटून विचारलं, “काय भिंगराबाई, कशी काय तब्येत?” पण भिंगरी कशाला उत्तर देते? ती रागावली होती ना त्यांच्यावर! ती मुळीच बोलली नाही. तिनं पांघरूण डोक्यावरून ओढून घेतलं आणि स्वस्थ झोपून राहिली. त्याबरोबर डॉक्टर म्हणाले, “असं तोंडावरून पांघरूण घेतलं की घाम येतो, मग ते पांघरूण काढलं की त्यावर वारा बसतो, मग पुन्हा ताप येतो, मग पुन्हा पंधरा दिवस घरात झोपून राहावं लागतं-” एवढं ऐकलं मात्र, लगेच भिंगरीनं तोंडावरचं पांघरूण दूर भिरकावलं आणि म्हणाली,


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि