60 140

बॉम्बे बिट्स - भाग्यश्री भोसेकर बीडकर

Description:

बॉंम्बे बिट्स हे माझं प्रकाशित होत असलेलं पहिलंच पुस्तक.'बॉंम्बे बिट्स'  हे नाव याकरता कारण मुंबई या शहराकडे नेहमीच ऊर्जेचा स्रोत म्हणून पाहिल जातं,चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला सामावून घेणार मुंबई शहर,अनेक संस्कृतीचं मिश्रण असणारं, कायम प्रगतीच्या दिशेने धावणार हे शहर म्हणून हे शीर्षक.जस जशी पुस्तकातली कथा विस्तारत जाईल तस तसा या शीर्षकाचा अर्थही उलगडत जाईल.पुस्तकात घडणाऱ्या कथेत पात्रांची स्वगत आपणा सर्वांना वाचायला मिळतील.बऱ्याचदा हा स्वसंवाद खूप महत्त्वाचा असतो , बाहेरच्या जगासोबत शेअर करता करता आपण स्वतःसोबत व्यक्त होणं विसरून जातो.स्वतःच स्वतःला भेटता यावं म्हणून हा अट्टाहास.थोडंस मनातलं बॉंम्बे बिट्स हे माझं प्रकाशित होत असलेलं पहिलंच पुस्तक.'बॉंम्बे बिट्स'  हे नाव याकरता कारण मुंबई या शहराकडे नेहमीच ऊर्जेचा स्रोत म्हणून पाहिल जातं,चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला सामावून घेणार मुंबई शहर,अनेक संस्कृतीचं मिश्रण असणारं, कायम प्रगतीच्या दिशेने धावणार हे शहर म्हणून हे शीर्षक.जस जशी पुस्तकातली कथा विस्तारत जाईल तस तसा या शीर्षकाचा अर्थही उलगडत जाईल.पुस्तकात घडणाऱ्या कथेत पात्रांची स्वगत आपणा सर्वांना वाचायला मिळतील.बऱ्याचदा हा स्वसंवाद खूप महत्त्वाचा असतो , बाहेरच्या जगासोबत शेअर करता करता आपण स्वतःसोबत व्यक्त होणं विसरून जातो.स्वतःच स्वतःला भेटता यावं म्हणून हा अट्टाहास. बॉंम्बे बिट्सची जन्मकथाही थोडक्यात सांगते.डिसेंम्बर 2015 मध्ये मी पहिल्यांदा  विक्रम भागवत यांना चेहरेपुस्तकाच्या अर्थात फेसबुकच्या आभासी जगात भेटले ,आम्ही बोललो त्यावेळी मला पूसटशीही कल्पना नवहती कि हीच मैत्री पुढे मला माझ्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाणार आहे.त्याच झालं असं की फेसबुकवर मी कुठेतरी 'न लिहिलेली पत्रे' नावाचं पेज पाहिलं ज्याचे सर्वेसर्वा विक्रम भागवत आहेत.मी त्या पेजवर लिहिण्याची इच्छा व्यक्त केली त्याला  विक्रम भागवतांनी अर्थात प्रोत्साहन दिलं.मग लघुकथा, पत्रमालिका असं लिहीत लिहीत माझा प्रवास सुरु झाला तोवर मी जे काही लिहायचे ते माझ्यापुरतं सीमित असायचं पण नलिपमुळे सार्वजनिकपणे लिहिण्याचीे संधी मिळाली. पुढे नलिप वर माझी दुसरी पत्रमालिका (बॉंम्बे बिट्स) सुरु असताना विक्रम भागवतांनी याच पत्रमालिकेच पुस्तक करायला आवडेल का अस विचारलं आणि मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाउल टाकलं. तोवर विक्रम भागवताना सर म्हणण्यापासून ते विक्रम अशी एकेरी नावाने हाक मारण्यापर्यंतचा प्रवास आमच्या मैत्रीने केला होता. त्यामुळे मनापासून आभार मानते विक्रमचे इतक्या सुंदर मैत्रीसाठी, मला लिहिण्याची संधी देण्यासाठी. सृजन प्रकाशनाचे आभार माझं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी. या पुस्तकाला साजेसं असं कव्हर डिझाइन करून देणारे सोहम सबनीस आणि त्यांची टीम यांना विसरून चालणार नाही. त्यांचेही मनःपूर्वक ऋण व्यक्त करते.पुस्तकासाठी ज्या सगळ्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागले आहेत त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मला मनोमन खात्री वाटते की पुस्तकाच्या शेवटी आपण काहीतरी चांगलं वाचल्याचं समाधान वाचकांना मिळेल.पुस्तकातली पात्रं,पुस्तकात उलगडणारी कथा या सगळ्यांशी तुम्ही कुठे ना कुठे तरी कनेक्ट व्हाल अशी आशा करून थांबते - भाग्यश्री भोसेकर-बीडकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि