Blog

प्रमोशन-Snehal Kshatriya

स्नेहलचे उत्तम लिखाण.... प्रमोशन–स्नेहल क्षत्रिय सध्या हा एकच शब्द महत्वाचा आहे. सध्या तरी बॉसवर इम्प्रेशन मारायलाच हवं काहीही करून. जीवाचं रान झालं तरी चालेल. साली ही ट्रेन का लेट आहे आज? इथे एकएक मिनिटांचं पडलेलं आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर नेहमीचं झालं आहे. ह्या भिकाऱ्याना दुसरीकडे भीक मागता येत नई का..ए चल निघ इथून. काय आहे? शाळा शिकायची सोडून भीका कसल्या मागत फिरता रे? रोजच हेच दृश्य पाहायला लागत इथे आणि शी: इथे मरणाची घाण आहे. ही बाई इथे काय फळं विकत बसली आहे? माश्या घोंगावतात..सगळीकडे थुंकून ठेवतात लोक साले अडाणी आहेत! ट्रेन आली ट्रेन आली. अरे थांब थांब...अरे साल्या धक्काबुक्की काय करतोस? थांब जरा..बापरे..हुश्श ! आलो एकदाचा डब्यात! ह्या सगळ्यांना इतकी मरमर करून चढायची काय गरज आहे? सगळेच्या सगळे एकमेकांच्या जीवावर उठले आहेत साले. विंडो सीट! पटकन चढलो म्हणून निदान हवा तरी..हवा जाऊद्या पण श्वास घेण्यापुरता ऑक्सिजन तरी मिळेल निदान. नशीब. “हॅलो! हा बोलतोय..इतक्यात निघालोय. पोहोचतो १५ मिनिटांत. काय सांगतोस? ती अंजली आणि बॉस ?? शीsss. आलोच...तू थांब. मागच्या महिन्यापासून बघतोय बॉसच आणि त्या अंजलीचं लफडं चाललेलं आहे. त्या हलकटने ती ज्युनिअर असून माझ्या अगोदर तिचं प्रमोशन करायचं ठरवलं? व्हॉट द फक. डोकं गरगरतंय आता!” सिनियर मॅनेजर सोबत सेक्स. तेही लेडीज टॉयलेटमध्ये. कुठल्या थराला जातील हे. प्रमोशन मिळवण्यासाठी देहाशी खेळ. ती अंजली होतीच तसली टुक्कार. प्रमोशनसाठी किती मेहनत घेतली मी पण हे फळ मिळालं? गुदमरतोय जीव खूप. सगळीकडे पॉलिटिक्स. ही लिफ्ट काय बंद पडली आहे? थँक गॉड! झाली चालू..नाहीतर दहाव्या मजल्यावर कोण पाय तोडत जाईल? इथल्या आरशात बघितलं की वेगळंच वाटतं. हा फोन काय वाजत असतो सारखा.. “हॅलो! अगं भरून टाक तू फी..जिथेतिथे काय तुला मीच हवा आहे? हो मला लक्षात आहे आदीच्या शाळेत आज पेरेंट्स मीटिंग आहे. हे बघ मला काम करू दे. नाहीतर यायला पुन्हा उशीर होईल. बाय!” एकट्या माणसाने काय काय करावं? फीवरून आठवलं..सकाळची ती भीक मागणारी पोरं..त्यांना शाळा, फी ही कटकट नसते. प्रमोशनसाठी त्यांना मरमर करावी लागत नाही. करावी लागतही असेल? जो जास्त भीक मागेल त्याला मिळत असेल का बरं काही? पण त्यांचा विचार मी का करू? मला माझ्या प्रमोशनचं पडलं आहे. घण्टा प्रमोशन! ती साली अंजली इतक्या सहज बाजी मारून गेली. त्या मागच्या वस्तीतल्या वेश्यापण खुशाल देहविक्री करतात. यांना दुसरे मार्ग सापडत नाही का? पण ह्या धंद्यात त्या स्वतः पडलेल्या कुठे आहेत? अंजलीसारख्या स्वतःहून शरीर कुणाच्या ताब्यात तर देत नाहीत त्या! मजबुरी नावाची चीज त्यांना ह्या गटारीत आणून टाकते. वासनेचे भुकेले त्यांचा जराही विचार न करता त्यांची छाती आणि योनी भोगतात. हा साला बॉस आणि ते कुत्रे एकाच जातीचे आहेत. असो! माझं प्रमोशन असंही गेलं आहे. ही मशीनची कॉफी नकोशी वाटते. कॅफेटेरियामधला हा एलसीडी साला..इथे येऊन जाऊन खून दरोडे..बलात्कार ..यांच्या बातम्या चाललेल्या असतात. जातीवाद, भ्रष्टाचार, आरोप, गुन्हे.. सुखी कोणीही नाही. सगळे कशात तरी फसलेले आहेत. एक अधिकार गाजवतो दुसरा सहन करत जातो. हे बाकीचे येऊनजाऊन ऑफिसमधलं गॉसिप करत वेफ़र्स खात बसतात इथे. बापरे! इतका उशीर झाला..ट्रेन जाणार फिक्स. गेली तर मरूदे. प्रमोशन असंही गेलं. त्यात ट्रेन गेली तर काय फरक पडतो? सरळ मरीन ड्राइव्हला जाऊन बसतो. लाटांचा आवाज बरा वाटतो ऐकायला. हे प्रेमीयुगुल किती छान प्रेम करतात एकमेकांवर. थोडंतरी बरं वाटत इथे. त्या लिफ्टमध्ये बसल्यावर तो आरसा साला एकटक पाहत असतो माझ्या चेहऱ्याकडे..भीतीच वाटते. का? त्या आरशात पाहिलं की माझ्यातलं काहीतरी हरवत चालल्याच सतत जाणवत राहतं. मी फळं घ्यायला हवी होती का सकाळी त्या बाईकडून? त्या भीक मागणाऱ्याना काही खायला दिलं असतं तर? त्या मागच्या वस्तीतल्या मुलींची काही मदत करता आली तर? त्या अंजलीसारख्या स्वतःहून शरीर कुणाच्या हवाली करत नाहीत. कष्ट करतात..नको ते सहन करतात. आदीच्या शाळेत पेरेंट्स मीटिंगला जाईन पुढच्या वेळी. निदान आता तरी त्या लिफ्टमधल्या आरश्याकडे पाहून मला माझीच लाज वाटणार नाही. माझ्यातल्या माणुसकीचं प्रमोशन तरी होईल. Read more....

अनोळखी ती-Nilesh Sarfale

तर असा शेवट...चार दिवसातली प्रेमकहाणी. अनोळखी ती - निलेश सारफळे चौथा दिवस :- आज सकाळीसकाळी मोंढ्यातल्या सिद्धी विनायकाचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. लवकर उठून आधी दर्शन करून आलो. चला आज अंजलीबाईना भेटण्याचा काही बहाणा शोधायला पाहिजे काय करावं आज कश्याच्या निमित्ताने तीझ्याशी बोलता येईल. देवबाप्पा खरचं पावले वाटतं नवसाला चटकन कल्पना सुचवली आज Bike घेऊन जायची नाही. चालत चालत जाऊ. अंगावर काटा येत होता. Bike शिवाय कसं फिरायचं चालणे कधी आपल्याला माहित नाही. रूमपासून नाक्यापर्यंत अर्धा कि.मी. नंतर Bus – Stop 1 कि.मी मग कॉलेज. कसं होणार? पण क्षणात अंजलीबाईंचा चेहरा नजरे समोर आला आणि तो प्रवास एक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज हो.......असं खुणावत होता. मग काय अंजलीबाईनंसाठी इतकं करू शकत होतो. आज तिला एकेरी शब्दात बोलत होतो....अंजली अंजली हे नावं येताच एक वेगळीच उर्जा अंगात संचारत होती. आज तिझं नावं प्रत्येक मिनिटाला तोंडात होतं पुढे काय होणार आहे मला ही माहित नाही पण हा बदल मी स्वीकारला बुद्धीशी कुठली ही तुलना न करता या भावनेत स्वःताल वाहताना बघून छान वाटतं होतं. कशीबशी दोन पायांची गाडी नाक्यावर चहाच्या टपरीपर्यंत आली. चला आधी चहा घेऊ, काका, “काय रे आज गाडी कुठे?” “काका थोडं प्रदूषण कमी करतोय.......!” तितक्यात अंजली आली आणि तिने ते ऐकलं माझं वाक्य आणि, “काका मी येतो घेतो नंतर चहा” म्हणत थेट घाईत तिच्या मागे निघालो. थोड्याश्या धापा टाकत तिझ्या बरोबरीला आलो “hi , Good Morning” “ह्म्म्म बरं मग खरंच प्रदूषण वाचवणार एका दिवसात? खरं काय कारण आहे?” माझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला ...? “नाही तसं काही नाही तुम्ही गैर समज करू नका?” “अरे मी कुठे काय म्हणतेय? Bike ला काय झालं? खरं ते विचारतेय. आणि खूप लवकर विचार करतोस रे तू. एक विचारू? कॉलेजला कोणत्या शाखेला आहेस?” “मी अहो मी डी.एडला आहे.” “अरे देवा Sorry Sir मी होणाऱ्या भावी शिक्षकांशी कशी उद्धटसारखं वागतेय ना? Sorry sir” “ए शांत हो, अगं तसं काही नाही आणि मी झालो नाही शिक्षक आणखी मग Sir वगैरे असं नको म्हणू Plez.....” “नाही आता मी सरचं म्हणणार आहे” “बरं ठीक आहे म्हण ok ठीक आहे” “आणखी एक बोलू? तू कस ही समजलास ना मला तरी चालेल पण हे बघ मला खरचं मन मोकळे पणाने बोलायची सवय आहे. त्यामुळे मी बोलते तुला स्पष्ट. मनात सतत विचार येत असतो या नाक्या पासून ते Bus – Stop पर्यंत चालत जाताना या गर्दीत खूप घाबरल्या सारखं होत रे. या प्रवासात कोणी तरी सोबत पाहिजे विश्वासाचं आपलं हक्काचं Bike वरून मुलींच्या मागे भर धाव फिरणारी ही टवाळकी मुलं नाही आवडत मला” अंजली किती सिंपल आहेस गं तू अनोळखी माणसाला सुद्धा आपलंस केलंस आणि जो विश्वास तू ठेवलास ना या गोष्टीवर मी तुला यासाठी कधी मित्र म्हणून तुला कधी काही मदत लागली तर सांग मी नेहमी तुझ्या सोबत असेन. तू घाबरणारी मुळीच नाहीस. You are Brave Girl ......! रोजचं क्लास साठी येणं-जाणं काय गम्मत आहे का? त्यांना या गोष्टीचा विचार असता तर असे वागले असते का ते? “चल बोलत बोलत आपण Bus – Stop पर्यंत आलो. मला तुझ्या कडून एक गोष्ट पाहिजे होती. तुझा मोबाईल नंबर मिळेल का?” “लगेच का?” आता मात्र माझ्याकडे उत्तर नव्हतं. “बरं ठीक आहे पण मला आताच तुझा पण नंबर माझ्या मोबाईल मध्ये पाहिजे....”. “हो चालेल ना ? घे ७७७........?” आणि ती Bus – Stop वर तिझ्या गाडीची वाट बघते. मला तर हा आनंद गगनात न मावणारा वाटत होता. वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे ती आता माझ्यात मला शोधत होती. तिचं मला बोलून मन मोकळ झालं खरं पण माझं मन मात्र वेडाबाई क्षणात घेऊन गेली. आजचं प्रेम झालं मला? या प्रेमाचं celebration इथेच परत चहाच्या कॅन्टीनकडे चहा घेता घेता त्या खिडकीतून तिला बघत होतो. चहा संपला परत घ्याच्या गाडीच्या उजव्या बाजूला थांबलो. तसचं तिने मला बघताचं खिडकीतून डोकावलं आणि हळुवार sir By म्हणत निघून गेली ............... या एस.टीच्या लालपरीला तोरणं बांधावं वाटलं... आज ....................! तिचा नंबर आज Ph मिळून, तरी हिंमत वाटत नव्हती मेसेज करायची. रोज मेसेज Type करायचो आणि परत Backspace .... सहज एके दिवशी Good Morning Have a Nice Day म्हणून मेसेज केला आणि उत्तर २४ तासाने आलं परत २४ तास वाट बघून त्याचं वेळाला तिला मेसेज केला. हे कोड्यातले मेसेज मला खूप त्रासदायक वाटतं होते कारण प्रेम त्या चार दिवसात तिझ्या पहिल्या भेटीत झालं मग फक्त तिचा होकार ऐकण्यासाठी मी तिला जीवाच्या आकांताने सांगण्याचा बोलण्याचा प्रयतन करत होतो. पण सगळं व्यर्थ वाटत होतं? पण खूप दिवसानी ती खूप बोलली माझ्याशी मेसेजवर खूप गप्पा झाल्या. आमच्या आवडीनिवडी आणि बरचं काही. मनातली निराशा संपून सर्व काही व्यवस्थीत चालू होत. आणि अचानक तिच्या क्लासला आणि माझ्या कॉलेजला सुट्ट्या लागणार असल्याचं समजलं. सर्व क्षणात थांबणार होतं ते रोज तिला पाहणं थांबणार होतं. या ८ दिवसात काय होईल काही समजत नव्हतं. आज शेवटचा दिवस आणि काही प्रेम कविता केलीली वही मी तिला देण्याचा विचार केला, त्यात एक अशी गोष्ट होती की ज्यात माझ्या मनातल्या सर्व गोष्टी तिच्या पर्यंत पोहचणार होत्या. मागचा पुढचा विचार न करता तिला ती गोष्ट दिली आणि तिचा निरोप घेऊन एकांताच्या शोधात मी निघालो ................. अखेर जीव घेणी प्रतीक्षा संपली आणि ती परत येताक्षणी तिने मला बघताचं “जिथे तू रमतोस जिथे तू Celebrate करतो तिथे घेऊन चल......” गोंधळलो थोडा पण वेळ न घालवता मी Bike शहराच्या बाहेर निसर्गाच्या कुशीत, डोंगररांगांच्या पायथ्याला असणाऱ्या धरणार गेलो आणि आम्ही दोघे तिथे थांबलो. मनातल आज शब्दात बोलूनचं टाकतो म्हणून, “अंजली इकडे ये या पाण्याच्या कडेला खूप मस्त वाटतं इथे बसू आपण ये” ती आली काय बोलावं आज सुचलं नाही filmy dialogue मी मारू शकत नव्हतो. म्हणून साध Simple बोललो. “अंजली तुला आठवतय ती आपली पहिली भेट अपघाताने आपण भेटलो ओळखीचे नसताना. आपण विचाराने एकत्र आलो आणि मी तर आज माझ्या जीवनाचा भाग तुला कायमचा बनवणार आहे. तुला आठवतय तू बोलली होतीस हा १ कि.मी चा प्रवास मला कोणासोबत तरी विश्वासाने करायचा आहे माझ्या आयुष्याच्या प्रवासाठी तू मला होकार देशील.....! आजवर या मनात कोणी घर करून गेलं नाही पण तू पहिली आणि शेवटची व्यक्ती राहशील माझ्या जीवनात आकाशातले तारे तर तोडून आणू शकत नाही कारण मी Practical विचार करतो म्हणून तुला सांगतो चंद्रतारे नाही पण तुझ्या पायावर माझं प्रत्येक सूख असेन तुझ्या सोबत म्हातारा होऊन काठी टेकेपर्यंतच्या प्रवासासाठी तू हवीस मला. खूप निरागस मुलीवर प्रेम केलंय मी फक्त तू हो म्हण, आयुष्यभर सुखात ठेवेन मी आज या क्षणी तुला देण्यासाठी माझ्या जवळ असं महागड Gift नाही. पण आता बोलता बोलता या पाण्याच्या कडेवर असणाऱ्या या गवताच्या पात्याची एक अंगठी केलीय तिचा स्वीकार कर आणि माझ्या आयुष्याच्या प्रवासाठी सज्ज हो ........ खरचं खूप प्रेम करतो तुझ्यावर मी.....!” म्हणत तिझ्या हातात ती हिरेजडीत प्रेमभावनेची प्रेमाची अंगठी घातली. आणि तिझ्याकडे बघत उभा राहिलो. “बस कर ना, आता मला रडवतो का तू?” म्हणत वेडाबाई चटकन मिठीत विरली, आणि एकचं म्हणाली, “कधी सोडून जाणार नाही ना मला? फक्त एक उत्तर पाहिजे. बाकी तू म्हणशील त्यात तुझ्यासोबत संसार करायला मी तयार आहे.” “वेडी आहेस का तू माझा श्वास आहेस तू तो सोडला तर जगेन का मी?” “ए गप आता काही बोलू नको मला काही नको तुझ्याकडून फक्त तू पाहिजेस. मग कधी नेतोस सासूबाईकडे माझ्या मला भेटायला?” तशी मला उचकी चालू झाली. आणि दोघे हसत हसत घरा कडे निघालो .... Read more....

श्वास–उत्तरा जोशी

एकेका तानेसह ओठात घट्ट रुतलेला दात - किती उत्कट लिहावे..... श्वास – उत्तरा जोशी मला माहितेय त्या बंद दाराआड उभी आहेस तू केवळ माझ्यासाठी... म्हणूनच आजच्या मैफिलीचा सूर काही औरच असेल बघ... यमन असेल किंवा मालकंस सगळ्यात फक्त तुच असशील... एकमेकांना प्रत्यक्षात दिसत नसलो ना जरी आपण तरी खर तर आधीच मिसळून गेलोय आपण एकमेकात त्या तालासुरांसारखेच.... वेगळं करण्यासाठी आधी वेगवेगळं ओळखून घ्यावं लागेल त्यांना .. पण आता ही साथ एवढी घट्ट झालीय की कोणता नेमका सूर वेगळा हेच कळत नाही.... असंख्य श्रोत्यांपलिकडे तुझं अस्तित्व जाणवतंय मला तीव्रतेने... एकेका सुरांनीशी तू घेतलेला श्वासही ... एकेका तानेसह ओठात घट्ट रुतलेला दात ... तुझं असणं मला जाणवू न देण्यासाठी केलेली धडपड... पण मला सांग आपलाच श्वास समजणार नाही का मला.... Read more....

मिठी–प्रसाद वाघ

जबरदस्त कथा...थरार.... मिठी – प्रसाद वाघ अरे काय डॉक साला तु गुंडच रे _ आता शांत हो नायतर गळा कापीन तुझा मग काय तोंडावर मास्क, हातात चाकूसुरी, बंद खोली काय म्हणे तर ऑपरेशन थिएटर, खुफीया अड्डाच आहे. त्यात हा तुझा दोस्त गुंगीचे औषध देणार. _ तो नामांकित भूलतज्ज्ञ आहे या शहरातला हो तर, खून तर नाही ना करणार माझा ? _ तु गप्प बस ना थोडावेळ एक अबला नारी आणि हे तोकडे कपडे _ ओय ते हौस म्हणून नाही, ऑपरेशन आहे तुझ आज म्हणजे मी म्हणल्यासारखे तु कापाकापी करणार _ तु काय कोंबडी आहेस का ? चुप्प आता एकदम ए डॉक जरा प्रेमाने... _ प्लिज यार, सिरियसली घे जरा. ए डॉक अरे ते कस दिसेल. भेंडी आख्खी दुनिया मरते बायकांची मांसल छाती बघायला. तुच एक हलकट मस्त केकसारखी रंगरंगोटी करतोय आणि आता कापशील. हॅपीबड्डे !! ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात त्याला आणि हो सिलीकॉन ब्रेस्ट वापर. सगळी दुनीया तशीही वरच्या आकारालाच भुलते. आता एकदम चुप्प हां, हाताची घडी तोंडावर बोट. नाहीतर ऑपरेशन गेले चुलीत अंगठे धरायला लावीन तुला. ए डॉक लव्ह यु रे.. ( आणि ॲनेस्थेशिया चढत जातो...) Read more....

अनोळखी ती-Nilesh Sarfale

आज पुढील भाग...भाग - २ अनोळखी ती - निलेश सारफळे पहिला दिवस : आज नाक्यावर ती त्याचं वेळेत आली, पण तीझी झपा- झपा पडणारी पावलं मात्र आज खूप हळुवार गमतीशीर चाल करत पुढे सरकत होती. हल्ली कानात हेडफोन दिसत होता. आणि चेहऱ्यावर स्कार्फ. पण माझे डोळे चटकन हेरायचे तिला खूप जुन्या ओळखी प्रमाणे गर्दीत पण ती सापडायची, ती समोरून जात होती आणि रोडच्या पलीकडून अंजली अंजली ......... थांब म्हणत एक मुलगी तिला आवाज देत होती. मी ते पाहिलं आणि म्हंटल हिला सांगाव ती आवाज देतेय पण कानात हेडफोन आणि हीचं असं दिमाखात चालनं वेगळच वाटत होतं. दिवसेन दिवस बदल दिसत होता तिच्यात, मनातले विचार बाजूला सारून चहा चा ग्लास बाजूला सारत तिझ्या कडे थोडं अंतर चालत जाऊन समोर येऊन थांबलो. मी काही बोलणार तेवढ्यात हातवारे करून मला धक्का देत मुलगी परत तिझ्या मार्गाने पुढे......? मला तर तिझं असं वागणं बघून तिथेच घाम फुटला .... यार भलाईचा जमानाच नाही राहिला. ती टवाळकी पोरं चालतात यांना आणी आमची बाजू समजून न घेता सरळ सरळ झीटकारत पुढे ? तिझां हात धरला आणि समोरून रोड ओलांडणाऱ्या मुलीकडे बघत हात दाखवत इशारा केला ...... तेंव्हा कुठे स्कार्फ वगैरे बाजूला सारत कानातले ‘कवच कुंडल’ अर्थात हेडफोन बाजूला केले. मैत्रिणीला मिठी मारत hi, hello करत चालू झालं त्याचं बोलणं म्हंटल चला आपण निघू परत कोणी बघितलं तर पोरीला छेडतो का ? हे असं कोणी म्हणायला नको एकंदरीत Seen तोच झाला होता. आता मी चहाच्या टपरी कडे वळालो चला परत चहा घेऊ सकाळी सकाळीच असा वेगळा अनुभव पहिल्यांदा आला जीवनात. काका परत एक होऊन जाऊ द्या चहा ....... माझी ऑर्डर निघाली आणि खुर्ची घेऊन रोडवर बसलो तिझ्या बद्दल विचार येत होता तिला Sorry म्हणायला पाहिजे होतं मी ? असं अनोळखी मुलीला कोणी थांबवत का कोणी ? माझंचं चुकलं ? आतला माणूस जागा झाला अरे ...... तू मदत केलीस ना ... तिझ्या मैत्रिणीला खरचं तीझ्याशी काही महत्वाचं काम असेन तर, आणि रोज नेहमी एकटी जाते ती आज कुठून तरी तिच्या ओळखीची एक व्यक्ती तिला भेटली कदाचित तू मदत केली नसती तर ती तशीच पुढे गेली असती. चला बाकी काही असो मी चहा घेतो नाही तर परत एक व्हायचां ? Read more....

काच-संजन मोरे

सप्ताहाची सुरुवात अशा कथेने व्हावी...संपूर्ण सप्ताह उत्तम जातो! काच-संजन मोरे अनवाणी पाय असतात सोबतीला. चप्पल नसतेच. असते पायताण किंवा वहाण मोठ्यांसाठी. चिगूर पोरं बिनचपलाचीच मोठी होतात. टाचेत घुसते बाटलीची फुटकी काच, किंवा काचेची फुटकी बाटली. काढून उपसून फेकताना, कळ काळजापर्यंत, काळजातल्या आई पर्यंत जाते, तेंव्हा कुठे सुरू होते टाचेतल्या रक्ताची भळभळ. निबारढक टाचेत रक्तवाहिन्या नसताना-सुद्धा कुठून येत असेल हा रक्ताचा भळभळता पान्हा. किंवा पान्ह्याचा कान्हा. हरएक लेकरू आईसाठी कान्हाच की ? कान्हा वळखंत असेल का देवकीला, की यशोदेचाच कान्हा फक्त ? मग देवकीच्या पान्ह्याचं काय ? की तोच रक्त बनून ….? रक्ताची ही भळभळ … टाच उंचावत, एका पायावर नाचत, उड्या मारत इकडे तिकडे पान्हावलेल्या डोळ्यांनी शोधावी लागते आई. या उड्या उडीत रक्ताचे ठीपके रूपायासारखे गडद सांडत जातात. स्वप्नात वेचलेल्या रूपायांसारखे मुबलक. गणवेशाच्या चड्डीच्या फाटक्या खिशा नसतेच ती. शर्टाच्या खिशात पेन्सीलीचा तुकडा अन एक खोड रबर, खोडकर. दफ्तराच्या पिशवीत पाटी पुसायचा स्पंज, रडक्या, गळक्या पेनाचे डोळे पुसायचे निळे मिट्ट, रक्ताच्या डागासाठी नसलेले फडके. आई नसते कशातच…….. काच टाचेत घुसते, पंजा फाटवते, तळव्याला फक्त टोचते. हे काचशास्त्र ! “कवळं रगात, माती भर …” कुठूनतरी आई सादावते. मातीत आई असते. घोळून घोळून हाताच्या तळव्यात मऊमऊ माती उरली की रक्ताच्या उफाळ्यात भरायची, बांध घालायचा. बंदीस्ती करायची. उंबऱ्यातनं लेकरू मागं फिरावं तसं रक्त मग मागं फिरतं, परत चुकारवानी उंबऱ्यातून डोकं बाहेर काढतं. आईचा शोध चालू असतो, लेकराचे डोळे तपासत असतात रस्त्याच्या दोन्ही कडा, एखादं चिंधूक, आंधूक, रक्त थांबवणारं ! टाचेतून माती भळभळते. पण घरंही जवळ येत असतात. दिवसा आईला घर नसतंच, आईचे पाय वावरात तुरीच्या टोकदार धसकटात नाचत असतात, अनवाणी. आईला तरी कुठे असते चप्पल ? तीही शोधत असते आई, भळभळत्या तळव्यावर चिरगूट बांधत. तळव्यात धसकटं घुसतात हे त्या धसकटाचं शास्त्र! किंवा त्या शास्त्राचं हे धसकाट …. “ये पोरा...हिकडं यी …. बघू काय लागलंय ?...... बाय्यो...किती रगात गेलंय …. ही माती कशाला टाकलीय ? धनुर्वात होवून मरशील की …. थांब मी राकेल सोडती … मंग धडपं बांधती ….. रस्त्यावरच्या घरातली आई. आई धडपं होवून बिलगती.संध्याकाळी घरातली आई धडप्यावरून अलगद हात फिरवती. “ आये...त्या माऊलीला लेकरू का गं दिलं नसंन देवानं ? “ आजही तोच प्रश्न भेडसावत असतो त्याला. आठवणींच्या काचा तुडवताना ……. Read more....

अनोळखी ती! - Nilesh Sarfale

ही कथा दररोज एक भाग अशी पुढील ४ दिवस येईल....निलेश औरंगाबादच्या कार्यशाळेतील लेखक....स्वागत आहे तुझे. अनोळखी ती! – निलेश सारफळे प्रस्तावना :- अनोळखी ती? या नवीन प्रश्नाने मला थोडा हुरूप आला. एक सणसणीत विचार मनात आला कोणी अनोळखी व्यक्ती जर का, माझ्या जीवनात आली तर तिला मी माझ्याकडे कसा आकर्षित करणार ? याचा काही विचार? असं काय करता यईल कि तिला मी आवडेल ? माझा शांत वाटणारा स्वभाव आणि आजवर या गोष्टीत मी कधी अडकलो नाही मग या रिकाम्या डोक्यात कल्पना येणार तरी कशी ? स्वतःलाच हिणवत मी विचार करत होतो. पेन दाताने चावून आता पार भुगा होण्याच्या परिस्थितीत होता पण काही सुचत नव्हत ? थोडं निलेशरावांच्या माझा जवळचा मित्र आदर्शाकडे वळालो तो आता इथे असता तर त्याने हा विचार आधी केला असता कोण्या मुलीला विचारण्या आधी किंव्हा तिला आकर्षित म्हणा अथवा तिला मिळवण्यासाठी , १. प्रामाणिकपणा २. विश्वास ३. निस्वार्थीपणे मदत करणारं असं स्वतःच व्यक्तिमत्व असावं. ४. मी पणा बाजूला ठेऊन इतरांसाठी काही करण्यासाठी तत्पर राहणारा. या सर्व गोष्टी पुढ्यात ठेऊन त्याने गोष्टीची सुरवात केली असती. म्हणून मी आता या गोष्टीचा विचार करून कुठे तरी काही तरी ताळमेळ बसवून काही लिहिण्याचा प्रयतन करावा म्हणून आतापर्यंत दातांचा मार खाणारी लेखणी लिहण्यासाठी सज्ज झाली. १०:३० ला नेहमी प्रमाणे शहरात दाखलं. नाक्यावरच्या चहा वाल्याकडे आपला रोजचा कॉलेज ला जाण्या आधीचा चहा, मग पुढे चहाच्या वेळी एक मुलगी नेहमी डोळ्यासमोरून Bus- Stop कडे चालत जायची. नाक्यावरून Bus- Stop चं अंतर जेमतेम १ कि.मी. आणि माझं college वाटेतचं असायचं माझा चहा संपे पर्यंत ती पार अर्ध्या रस्त्यात जायची ती त्या चहाच्या टपरी पासून निघाली कि तिझ्या मागे चार – दोन पोरं लगेच बेफाम वेगात तिझ्या जवळून जायची ते नेहमीचं असायचं, कधी कधी वाटायचं या तरुणी खूप कष्टाने इथे शहरात येतात शिकण्यासाठी बाहेरगावा वरून.. आणि ही चार- दोन डोकी कशी विचित्र स्वभावाची असतील ना ? त्या कष्टाचं त्या रोजच्या जाण्या येण्याच्या प्रवासाची त्या दगदगीच्या त्रासाची काय किंमत कळणार यांना ? खूप दिवसापासून तिला बघायचो तिला. तिझ्या आणि माझ्या वेळेच्या गणितात कधी चुका व्हायच्या नाहीत न चुकता ती दिसायची आणि ते दृश्य रोज मला दिसायचं. जाता येता का कोणास ठाऊक पण एक कटाक्ष ठरलेला असायचा. त्या एका वळणावरून ती एका ठिकाणी आणि मी एका ठिकाणी कधी योग आला तर मी जायचो Bus- Stop वर चहा घेण्यासाठी. तिथे ती कधी कधी दिसायची. या Bus- Stop च्या गर्दीत कोणी कुणा साठी तर कोणी कश्यासाठी जमायचे मी मात्र फक्त चहा साठी तिथे हजेरी लावायचो. कारण इथला आणि नाक्यावरचा चहा आमच्या शहरात प्रसिद्ध आहे. चार दिवस भासले नवे वाटले हवे हवे ........! Read more....

प्रेम-अनामिका

निर्वसनी, निरभ्र होत जातं माझं मन आणि उरतो लखलख पारा प्रेमाचा! प्रेम - अनामिका तुझ्या इच्छेखातर निर्वसनी, निरभ्र होत जातं माझं मन आणि उरतो लखलख पारा प्रेमाचा ...घे ना ओंजळीत ...हे एव्हढंच तर मागतोस तू,हो ना ? नग्न त्वचेवर उमलतात काटे,लाह्या फुटाव्यात तसे तडतड,आणि तू तुझ्या संपूर्ण स्नेहार्द्रतेने ओथंबलेला, स्निग्धसा बरसू लागतोस एकमेकांवर उधळलेले क्षण टपटपतात फुलांसारखे, गंध कल्लोळ माजतो गात्री आणि रिमझिमतात सरी, अंतरबाह्य लाटांवर उठतात लाटा ,असोशिनी सावरून धरतोस तू ,एक अनिवारशी थरथर मिटून जातात सीमासाऱ्या,उरतो असीम आनंद डोळे मिटून मी झेलत राहते फक्त सुख पेशींपेशीत झिरपणारं, आत्मरत, आत्मनत, आत्ममग्न आत्मस्पर्शी ---उन्मन प्रेम दुसरं काय असतं ? Read more....

वास्तव-कल्पि जोशी

उत्तर नसलेले प्रश्न...... वास्तव – कल्पि श्याम जोशी वास्तव हेच आहे..म्रुत्यु विसरायला लावणारी भुक ताटभर जेवायला लावते भलेही आवंढे गिळत का होईना ...जेवावं लागतच मनाच्या यातना लपवाव्या लागतात आरशात भकास चेहरा बघायचं भान येतच घरातला अंधार असह्य झाला की अंगणातल्या बागेची हाक कानात ऐकायला येतेच हळुहळु तु लावलेले गुलाबाचे ताटवे..प्रफुल्लित फुलुन येतात सांगतात तुझ्याच आठवणी आठवणिंचा खच पडतो प्राजक्ताच्या पायथ्याशी....... सकाळी अशा कितीतरी निघून जातात रात्री अशा कितीतरी रडुन घेतात पण एखादी जखम काळानुसार ठणकत राहते आतल्याआत.........बोचत राहते मनात एक प्रश्न येतो नेमका तूच का दिसलास त्याला ताटातूट सहन नाही होत पण सहन करायची ...........का का? ?? Read more....

आस-Rashmi Madankar

शेतकऱ्याचे एकच भांडवल असते...आस ......आशा....! आस – रश्मी पद्वाड मदनकर दुसरा वरीस उजाडला, यंदाच्या पारी दगा देणार न्हाई, कारल्याचा वेल लगलगून भरून येईन अन मागच्या वक्ताचं समद गाऱ्हाणं धुतला जाईन .. म्हणून मुक्तानं आस सोडली नोहोती .. गेल्या वक्ताले सोयाबीन कहाडला अन् बजार झाल्यावर माहेराहून धनधान धाडला, तवा माह्या बाबानं शेतातल्या माळावरच्या कारल्याच्या जराश्याक बियाबी धाडल्या व्हत्या. पुरा ऐवज कपाटात कोंबून ठेवताले कारल्याच्या बियावरून 'भिक्कार माहेर' म्हनूनस्यान वाकडं तोंड दाखवू दाखवू सासूबाईन मले केवढाला दुषना लावला होता. मामंजींनंत बाप्पा, सप्पा बिया देल्त्या टाकून पडवीतल्या कोपऱ्यात....जाता जाता पच्च्चकन! पिचकारी मारली तंबाकूची टमरेटवर, आन खाकरत निंगून गेलते चकाट्या हाकाले ... तिच्या डोळ्यात भस्सकन पानीच आलन ... पहासाठी व्हतच कोण ? गडी तं गेल्ता सहरात..नोकरीपाण्याचा बंदोबस्त कराले. अर्ध्या रातचाले तिनं जाऊन बिया वेचल्यान अन पदराले गाठ बांधून ठेवून देल्त्या. समदी रात्र इचाराचाच भूत सवार रायला तिच्या डोस्क्यावर. गावचा हिरवाकंच मळा, कारल्याचा चौफेर साजरा मांडव, घराचं मोकड-ढाकळं आंगण आन बिनमायच्या लेकीचा सुखाचा संसार पाहाची मरमर करणाऱ्या बाबाची लडिवाड, मायाडू कुशी आठवूनशान लगीत रडाले आलं तिले. उशी ओली होत राहाली रात्रभर. सकायची कामं पटकानी आटपून.. मामंजींच्या तब्बेतीले चांगली र्हातील असं समजावून, मुक्तानं माडीवर नेऊन पदरातल्या बिया भरल्या डोळ्यानंच पेरल्या व्हत्या. पैला पैला कोंब फुटला तवा मुक्ताच्या आनंदाले पारावर उरला नोहता, खतपाणी घालू घालू खूप मनाभावानं वेल पोसलान तिनं, थो वेलबी बहरून खोवलेल्या खुंट्यावरून जास्वदांच्या झाडाचा सहारा घेत कपडे वाळवाच्या तारेवर मांडवागत पसरू पाहे. लुसलुशीत नाजूक तरारल्या वेलीवर इवले इवले पिवळट साजरे फुलंबी दिसू लागली. आता उगवन ते माहेराच्या गोडव्याचे कारले साऱ्यायले भाजी करून खाऊ घालाची अन समद्याची तडतडणारी तोंड यका घावात बंद कराची, मुक्तानं स्वप्नातले मोनोरे बांधूनशान ठोवले होते ... पण का झालं कोणजाणे सासरच्या कडू शब्दांईनं घायाड झालेल्या बेच्चार्या माहेरच्या बिया रूसल्यान का काजाने? गेल्या सालात दोन चार बारके कारले उगवले आन तोडण्यालायक होण्याआत पिवळेलाल होऊन वाळूनबी गेलथे ...पानायलेबी गळती लागली. वेल फळत न्हाई म्हनूनस्यान साऱ्यायच्या डोळ्यात खुपू लागला व्हता. येता जाता सासूबाई नीरे टोमने मारे, राहू राहू माहेराच्या नावानं कल्ला करें .याच्या त्याच्यावरून गाऱ्हाणी बोलून चवताडून सोडे... मामंजी तर तोंड फुगवून बसले व्हते. त्यायले तिच्या हातचं गोडधोडबी ग्वाड लागना झाला , सदानकदा तोंडावर बाराच वाजले र्हाये. मुक्ताची मोठी घुसमट होये मंग, पण त्या ना उगवलेल्या कारल्यापायी वेलीले किती परेशानी सहानं पडतेत याचं दुःख कसं का जाने मुक्ताच्या जिव्हारी लगीत लागून र्हाये ... कसबसं वरीस निंघाला .. वेल वाळून निथळूनबी गेला. वर्षभर मुक्ताचा नशीबबी फळफळला न्हाई. पावसाचा जोर जरासक कमी झाला तसा यंदाच्या बरसलेबी वापस वेल हिरवळून आला. मुक्ताच्या आशेचा दिवा वापस उजडू लागला. पण, या सालालेबी घुमून घात केलाच तिच्यावाल्या नशिबानं, तिनं लावलेली कार्ल्याईची आस फुलता फुलता काऊनतं गळूनच पडायले लागले . सासूबाईंच्या तोंडचा पट्टा आजूकच फाश्ट धावू लागला...माहेरच्या माणसाइची आब्रू त बाप्पा अता वेसीपातूर येऊन पोचली ...बापाच्या नावाची इज्जत चिंध्यावानी टरटर फाडायले कोणालेच कई नई वाटे. मुक्ताले हे सहन झालाच नाही...तिच्या अंदरच अंदर कोंडल्या हुंद्क्याचा अन दाबल्या संतापाचा उद्रेक व्हाल लागला. यक डाव असाच तिचा डोका सरकला आन ते भरभर माडीवर गेली, ऐसपैस पसरलेला वेल सरंसरं वढून काहाडू लागली. वोढला, तोडला, उपडला. वरपला ... खुंटीवरून, जास्वदांवरून, मांडवातून वरबाडून वरबाडुन काहाढला, मुक्त करून टाकला ... शवटची वेदना. वेलीच्या निरंतर दुःखाचा अंत झाला व्हता. न उगवणाऱ्या कारल्याच्या दुषणातून वेलीले कायमची मुक्ती मिळाली व्हती ..... मुक्ता नावाले तिनं वाईस खरंर्रर्रर्र करून दावला. पन मंग तिची सोताची यंदाच्या बरसलेबी न उजवलेली कूस तितकी नशीबवान काहून नोहोती त कामालुम? ...वेलीचं आनं तिचं नसीब देवादिकान यकाच लेखणीनं लिवलं व्हतं का काजाने ? .. रोज रोजच्या वांझोट्या दुषणातून मुक्त कराले तिच्या उदरात मुक्ता अजून जन्मालेे याची होती ... पुढच्या वक्ताची आशा तिनं या वक्तालेबी सोडली नोहोती ... Read more....