Blog

पडदा – निरंजन भाटे

प्रतिभा काय लिहून घेईल लेखकाच्या हातातून...हा लिहिता हात...खूप महत्वाचा असतो..निरंजन तो जप. सलाम तुला. पडदा – निरंजन भाटे हाडामांसाला खिळलेलं कडू गोड आयुष्य होतं, अपेक्षा होत्या, त्यामुळे अपेक्षाभंगाचं दारूण दु:ख होतं तहाना होत्या, भुका होत्या, आयुष्यभर पुरणाऱ्या आणि छळणाऱ्या चुका होत्या सुखद नव्हत्या सगळ्या, पण जिवंतपणाच्या जाणीवा होत्याथोडक्यात म्हणजे सगळे थोडे सुखी आणि बरेच दु:खी होते. एक दिवस तिथे एक जादूगार आला, त्याच्याकडे होते काही लहान काही मोठे तरल स्फटिकाचे पडदे.... “या या.....” तो म्हणाला, “जादू बघायला या...”, “काळ्याश्या या चकचकीत पडद्याला फक्त बोट लाऊन बघा....” सगळे घाबरले, आणि गांगरले त्या पडद्यांना बघून, एक जण हळू हळू पुढे झाला.... एका पडद्याला त्याने बोट लावले फक्त....अचानक पडदा झुळझुळीत प्रकाशमान झाला...बघता बघता तो पडद्याच्या आतमध्ये गेला... पडद्याच्या मागे होती सुंदर मनमोहक दुनिया...त्याला आता हवं तसं रूप घेता येऊ लागलं...तो मग एक स्वप्नातला राजकुमार झाला, देखणा आणि राजबिंडा..पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन तो दौडू लागला...दौडता दौडता त्याच्या पांढऱ्या घोड्याला पंख आले....तो उडू लागला... दऱ्यापर्वतांवरून... “थांब... थांब....” जादूगार ओरडला...” हवेत कुठेही फक्त बोट लाव.... हा पडदा आहे सर्वव्यापी...” त्याने हवेत बोट लावलं... आणि तो पडद्याबाहेर आला...पडदा पुन्हा पूर्वीसारखा झाला... काळा चकचकीत... पण तरल स्फटिकस्पर्शी... “कोणकोणाला हवे आहेत पडदे?” ... “ज्याचे त्याचे स्वत:चे......” जादूगार म्हणाला..... “स्वत:चा पडदा घ्या... आणि पाहिजे तेंव्हा पाहिजे तसं पडद्याच्या आतबाहेर करा..... तुमची मर्जी.....” जादूगाराच्या डोळ्यात आता विलक्षण चमक होती......! “मला हवा... मला हवा....” सगळे एका सुरात ओरडले...! “मिळतील सर्वांनाच.... पण त्याची किंमत मोजावी लागेल.... पडद्याबाहेर राहाल तेवढे तुमचे श्वास माझे.....” तुमच्या श्वासांवर चालणार आहे माझा पडद्यांचा कारखाना....” जादूगाराने आपल्या निळ्याशार डोळ्यांनी सर्वांवर एक थंडगार नजर फिरवली...... “माझ्याकडचे तुमचे गहाण असलेले श्वास संपत आले, की पडदा पुन्हा हळू हळू अंधारत जाईल... मग तुम्ही पुन्हा बाहेर येऊन तुमचे श्वास मला द्यायचे..... मग पडदा पुन्हा प्रकाशमान होईल.....” “चालेल.... चालेल आम्हाला......!” सगळे ओरडले पुन्हा..... एका सुरात.......! आपापल्या श्वासांच्या बदल्यात सर्वांनी आपले स्वत:चे पडदे मिळवले जादूगाराकडून... आणि आपापल्या पडद्यात जाऊन सगळे सुखी झाले कायमचे... कारण पडद्याच्या आत बरोबर चूक असं काही नव्हतंच... जरी काही चुकलंच तर पुन्हा सुरवातीपासून सगळं सुरु करता येत होतं...पडद्याबाहेर मग उरला................ फक्त जादूगार आणि त्याचा पडद्यांचा कारखाना.... पडदे थोडे थोडे अंधारू लागले, की सगळे पडद्याबाहेर येतात... श्वासांची किंमत जादूगाराला चुकवण्यासाठी... पण आता पडद्यांबाहेरची हवा खूप खूप विषारी झालीय आता... फार काळ पडद्याबाहेर राहू शकत नाही कोणी... कशीबशी आपल्या श्वासांची किंमत चुकवून सगळे जातात आपापल्या पडद्यात...हो... आणि कुणी कुणी जादूगाराच्या पडद्यांच्या कारखान्यात कामही करतात. त्यांनाही जादूगाराने दिलेत त्यांचे विशेष पडदे..... जमेल तेवढा वेळ विषारी हवेत तेही काम करतात आणि पुन्हा जातात आपापल्या........! Read more....

चाकोरी - विनया पिंपळे

विनया पिंपळे ह्या दिवसेंदिवस समृद्ध होत जात आहेत. त्यांच्या कक्षा अंतर्मुख होऊन बहिर्गामी होत आहेत...ही कथा त्याचे उत्तम उदाहरण. चाकोरी - विनया पिंपळे ओट्यापाशी उभं राहून भांडी घासत असताना नेहमीप्रमाणे विचारांची तंद्री लागलेली असते. त्याच तंद्रीत एकेक भांडं नळाच्या धारेखाली आतूनबाहेरून स्वच्छ होत भांड्याच्या टोपल्यात आपसूक पडत असतं. हातानाही सवय होत जाते. डोकं नं लावताही ते आपसूक नेमून दिलेलं काम करत राहतात... आणि डोक्यात विचार कोणते?… तर असेच. म्हणजे जनरली बायकांच्या डोक्यात असतात ते. उदाहरणार्थ-'उद्या पोरीला डब्यात काय द्यायचंय?'- हा विचार येताच लगेच शाळेने दिलेली मेनूलिस्ट पाहिली जाते. फ्राईड राईसचा मेनू पाहून जरा निश्वास सोडला जातो. ड्रेस, बूट, मोजे, स्कुलबॅग, रुमाल, टाय सगळं एका ठिकाणी जमवून ठेवलंय का ते आठवलं जातं. ही आठवणही सवयीनेच ठेवली जाते. इतक्यात 'हं... पण आयकार्ड?…ते कुठाय?' असं छुटूकपिटुक काही आठवलं की…हातातलं अर्धवट धुतलेलं भांडं ठेवून आयकार्ड किंवा आठवलेल्या वस्तूची शोधमोहिम हातात घेऊन...मोहीम फत्ते केली जाते की पुन्हा सरावल्या हातानी भांडी नळाखालून आंघोळ करत टोपल्यात पडत जातात. पुन्हा डोक्यातलं चक्र सुरू...! इतक्यात नळाखाली धरलेल्या सुरीच्या पात्यावरून अलगद बोट फिरतं... हा आपल्या तंद्रीचा प्रताप असं म्हणत तिखटामिठाच्या डब्यातली चिमूटभर हळद बोटावर दाबली जाते. कधीतरी सगळी भांडी धुवून होतात. बाईच्या शरीरावरच्या जखमाही सोशिक असतात बहुदा. म्हणूनच सगळं काम आटपेपर्यंत त्या काही बोलत नाहीत. आताही फक्त चिमुटभर हळदीच्या सांत्वनावर बोटाची जखम गप्प बसते. एकदाची कामं आटोपली की बिछान्याला पाठ टेकवताना हळदुलं बोट अचानक ठणकू लागतं. सकाळी भाजी फोडणी देताना हातावर थोडंस तेल उडून बसलेला चटकाही तेव्हाच दिसतो. 'मी आहे' असं म्हणू लागतो. त्याचीही जळजळ थोडीफार जाणवू लागते. मग वाटतं इतका वेळ का नाही जाणवलं आपल्याला काही?… आपण पुन्हा विचार करू लागतो. विचार करता करता डोळे जड होऊ लागतात. अर्धवट झोप अन् अर्धवट जाग अशी धेडगुजरी अवस्था असते. त्याच सुषुप्तीच्या अवकाशात सकाळी पेपरात वाचलेल्या बातम्यांची ठळक अक्षरं डोळ्यासमोर नाचतात. *विवाहितेचा जळून मृत्यू* . जळून असेल की जाळून? बरं जळून असेल तर असं कोणतं कारण असेल की तिला जळणं जास्त सोयीस्कर वाटलं? किंवा जाळलं असेल तर त्याचंही काय कारण असावं?… हुंडा?… की संशय?… की अजून काही?… कारण काही असो. बाई मात्र जळाली एवढे खरे. जळालेल्या बाईची बातमी आठवल्यानं अर्धवट झोपेची उडी आपल्याला थेट अंगणवाडीतल्या छोट्याश्या बालीजवळ नेऊन पोचवते. बाली फक्त चार वर्षांची आहे! आठवडाभर आधीच तिची आई मेलीय. जळून. आईबापाचं कडाक्याचं भांडण झालं. तिनं तिरिमिरीत अंगावर घासलेट ओतून घेतलं आणि त्यानं संतापून पेटवून दिलं...हा ऐकलेला सगळा घटनाक्रम दृश्य स्वरूपात डोळ्यासमोर सरकत जातो. ह्या दृश्यातलं त्याचं क्रौर्य अर्धवट झोपेच्या डोळ्यांना सहन होत नाही. डोळे खाडकन् उघडले जातात. कशा कोण जाणे पण तिच्या अंगाचा कोळसा होतानाच्या सगळ्या वेदना आपल्यापर्यंत पोचत असल्यासारख्या वाटत राहतात. तिच्या अंगाची होणारी आग आपल्या हातावरच्या इवल्या चटक्याच्या वेड्यावाकड्या आकारात जमा झाल्यासारखी वाटते. त्या जखमेला कितीने गुणावं म्हणजे तिचं दुःख आपल्याला कळेल?… नाही मोजता येत. कसं सहन केलं असेल तिनं?…शिवाय पोरं पोरकी होतील म्हणून नवऱ्याचं नावही ओठावर येऊ दिलं नाही.. 'असोच…फार विचार करायचा नाही.' असं स्वतःला सांगत, समजावत आपण आपल्या जखमांवर इलाज करतो. 'उद्या काही महत्वाची कामं हातावेगळी करायला हवीत' असं म्हणत आपण 'वेगळ्या' कामांची लिस्ट डोळ्यासमोर आणून आपलं लक्ष दुसरीकडे गुंतवतो... त्यात गुंतताना येणारी गुंगी अनावर होत जाते. मग कधीतरी गाढ झोप लागते. सकाळी पाचच्या ठोक्याला जाग येते. सरावाने रोजची कामं केली जातात. आपण आपल्या चक्रात अडकू लागतो. वेगवेगळ्या व्यवधानांची तंद्री पुन्हा आपल्यावर आरूढ होत जाते... आणि छापील असल्यासारखे सगळे दिवस त्याचत्याच चाकोरीतून जात राहतात Read more....

काजळ-Tanuja Chatufale

पकडू नये कुणालाच...कधी...एखाद्या व्यक्तीला पकडणे....म्हणजे तिला लहान करून टाकणे आहे. तिचा अवकाश बंदिस्त करणे आहे. काजळ - सौ.तनुजा कुलकर्णी चाटुफळे किती घाई रे तुला माझी प्रत्येक भावना शब्दांत पकडायची . किती रंगांच्या भावनांनी माझं मन भरून गेलंय तुला माहितीये?......असतीलही इंद्रधनुष्यात सात रंग पण माझ्या भावनांचे रंग बघ ना.......... हे काय मोजतोयस तू? माझ्या भावनांचे रंग? वेडा होशील, हजारो लाखो रंगांच्या,लाख मोलाच्या माझ्या भावना,माझं मन भरून उरल्यात त्या, डोळ्यांतून भरून वाहतायत त्या... तुझा मात्र वेडा हट्ट, त्या शब्दबद्ध करण्याचा. तू तुझा पुरुषार्थ मिरवलास जगभर, म्हणून तुला माझं प्रेम सुद्धा मिरवायचय जगभर या शब्दात बांधून............ पण शब्दांमधून जातील त्या याच्या त्याच्या तोंडी आणि होतील जखमी........ माझं प्रेम, भावना बेरंग होऊन जाईल सगळं. म्हणूनच म्हणते, नको ना बांधून ठेऊ त्यांना शब्दशृंखलात. तूच फक्त वाच माझ्या डोळ्यांतून आणि साठवत रहा तुझ्या रिकाम्या डोळ्यांत. जन्मभरासाठी आठवणींचं काजळ बनून रहातील त्या. सौ.तनुजा कुलकर्णी चाटुफळे Read more....

सेक्स बॉय-Babarao Musale

बाबाराव एक रसायन आहे...मी प्रेमात आहे ह्या तरुणाच्या! सेक्स बॉय – बाबाराव मुसळे नेहमीपेक्षा कॉलेजमधून बाहेर पडायला अन्वीला फक्त दोन मिनिटे उशीर झाला. तेवढ्यानेच इंटरसिटी निघून जाईल की काय, अशी भीती तिला वाटली. त्यात मोरभवन सिग्नलवर तीनेक मिनिटे रिक्षा अडली. पाच मिनिटे. तिची चिंता वाढली. ती स्टेशनसमोर उतरली न इंटरसिटी चालू झाल्याचा आवाज आला. बापरे, ही मिस झाली तर नंतर मग सिकंदराबाद, साडे सहाला. म्हणजे घरी पोचायला सरळ साडेआठ. रिक्षावाल्याच्या हातात पैसे कोंबून ती अक्षरशः धावली. नशीब! लास्ट बट वन बोगीत चढता आलं. ही जनरल बोगी. तिचा आयुष्यातला पहिला प्रवास. एरवी खुर्चीयानचा तिचा पास असतो. तसा दोन्ही बोगीत फारसा फरक नाही. फक्त मनाचे समाधान. ते परवडतेही. तसं काहीच परवडत नाही. नेटसेट करून तासिका तत्वावर आर. टी.सी. मध्ये जॉब. त्याचा मेहनताना साडेसात हजार. ओफ्फ्! ! शिक्षण पद्धती? एका कोचिंग क्लासमध्ये दहा हजार. एवढ्यात महिना ढकलायचा. घरच्यांना ताप कमी. तीन तासांपासून सूला जायचा फिल. कॉलेजात घाईत जमलं नाही. किती वेळ कंट्रोल करणार? रेल्वेचे लॅट्रिन. ओह! नरकापेक्षा बदत्तर! स्साला, नेहमी कंट्रोल कंट्रोल! किडन्या फेल व्हायच्या. चलो, हिंमत करेंगे. ती सूला आली. नाक गच्च दाबून, डोळे मिटून सू केली. उभी राहिली तर समोर पेनने घोटून लिहिलेला मजकूर. कॉल फ़ोर रफ अॅन्ड टफ सेक्स बॉय. अन् खाली मोबाईल नंबर. तिनं वाचला. कपाळाला आठ्या पाडत बाहेर आली. आतून हलली. मनात निर्णय केला, एकदा कॉल करायचाच. पण कधी? कुठे बोलवायचं? रविवार. त्याला कॉल. कुठे, कधी, कसं यायचं? पक्क झालं. तो आला. हॉलमध्ये बसलेल्या मावशीने जिन्याकडे बोट दाखवून 1st रूम म्हटलं. तो उत्साहात. आज पहिल्यांदा पाखरू जाळ्यात पडलं. रव्या नेहमीच असलं करतो. आपल्याला त्याचाच गुरुमंत्र. थॅन्क्स रव्या!! रूम नंबर एक. दार लोटून तो आत आला. आत कोणीच नाही. त्याने दारावर टक टक केले. 'दार आतून बंद कर. तू तुझे कपडे उतरव. दोन मिनिटात मी आले. ' सर्वांगातून उकळ्या. पण पहिला अनुभव. मनात भीती. कपडे काढून तो निकर, बनियनवर. बेड. स्वच्छ. आतल्या रूममधून घिमे स्वर - पिया पिया, कितना तडपायेगा. अरे, मी आलो. तूच ये लवकर. तो अधीर. आणि ती आतल्या दारात येऊन उभी. 'सिस्स्स्sssss ' तो ओरडला. समोर अन्वी. 'नो सिस्. ओन्ली रफ अॅन्ड टफ सेक्स. ' आणि तो धराशयी तिच्या पायावर. आतल्या दरवाजात येऊन उभी राहत अन्वीची फ्रेन्ड रिया हाफ नेकेड, रफ अॅन्ड टफ सेक्सी बॉय एकाएकी लुळा, पांगळा झालेला पाहत मनात हसत असलेली. Read more....

कहानी - अंजली कारंजकर

बहार आहे हे लेखन.....कहाणीला एक व्यक्तित्व देऊन टाकले आहे.... कहानी - अंजली कारंजकर सदियोसे सून रहे है हम इन्हे नदी के पास तालाब के इर्दगीर्द समंदर के किनारे पर कई छोटी छोटी कहानियाँ अनगिनत है कहानियाँ इन कहानियोमे जुडी कितनी और कहानियाँ कविता में प्रार्थना में अवकाश में अंधेरे में छुपी होती है एक कहानी इन्हे सुनो तो जन्म लेती है और एक कहानी कही दूर जाके छोड आओ तो भी पीछे ही खडी मिलती है कहानी कहानी मुसलमान होती है कहानी इसाई होती है कहानी पाक होती है कभी वो नापाक होती है इन्हे नापने का कोई यंत्र नही होता इनकी उगने का कोई मौसम नही होता इनमें जो जो बसा है वो वो उसिका हो जाता है तुम्हे कभी मिली या नही भी मिली कभी छुके निकल जाये तो इसे जाने न देना इसे हमारी नही हमे इनकी जरुरत है तुम खत्म हो सकते हो कहानी खत्म नही होती लिखित या अलिखित उन्हे सोंप देना कही नाजूक हातोमे Read more....

व्यस्त-Janhavi Patil

एखादा लेखक एका टप्प्यावर पोचला की त्याची दृष्टी खूप विस्तारते...आणि एक वेगळे लेखन त्याच्या हातून होते. जान्हवी...तू त्या टप्प्यावर आता पोचली आहेस असा संशय घ्यायला जागा आहे. व्यस्त – जान्हवी पाटील फ्लायओव्हरखालुन वळसा घालून स्टेशनच्या दिशेने वळलेली बीएमसीची ऑन ड्युटी गाडी आणि तिला येतांना पाहून, एकमेकांना मारलेल्या हाकांसोबत, स्टेशनपासून सुरू होणाऱ्या एकेरी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या शहाळंवाला, मध्येच एखादा अगरबत्तीवाला, एखाद्या मोकळ्या चौकोनी तुकड्यात पथारीवर मोजे, रुमाल, की-चेन सारखं चिल्लर समान टाकून उभा असलेला एकदा कुणी, केळीवाला, इडलीडोसा, सँडविचवाला, उपमा, वडे, सामोसे, पुरी- भाजी, शिरा-पुरी, खिचडसोबत, छास लस्सीच्या हातगाड्या, टेबलं, ठेले, फटाफट बंद होत गेले. पत्र्याची, लाकडाची टेबलं, सिलेंडर, मोठाल्या तेलाने भरलेल्या कढया आणि स्टोव्ह, पीठं, भाज्या, चटण्या, सांबार भरलेले डबे, भांडीकुंडी.. डोक्यावर टाकून, आसपासच्या बिल्डिंग मधल्या अरुंद गल्ल्यांमध्ये अदृश्य करायची घाई आणि 'गाडी येऊन सामान उचलुन गेली तर काय' ची भीती त्या एकेरी रस्त्यावर पसरत गेली. चलो चलो म्हणत पांगवलेले गिऱ्हाईक आणि त्यांचे हिशोब, बाद मैं देना च्या बोलीवर संपले. थोडंच अगोदर गाडीतल्या माणसांनी उतरून हाताशी लागेल ते समान उचलायला घेतलेलं पाहून घाईघाईत गोंधळून गेलेल्या त्याच्या हातातून निसटलेल्या कढईतुन कढत तेल चssर्रssर्र आवाज करत जमिनीत जिरत गेलं.. तेलाचा उरलेला ओहोळ पुढे पुढे वाट काढत गेला. त्याची मातीत पडलेल्या वड्यांसोबत डोळ्यांत जिरत थिजत जाणारी हतबल वेदना अन हासडलेल्या शिवीसोबत आलेली कुणावरही न काढता येणारी चीड... ...आणि... ...ते वडे पाहुन कुठुनश्या कोपऱ्यातुन धावत फाटके कपडे, विस्कटलेल्या झिपऱ्या उडवत आलेल्या त्या चिमुरड्या पोरीच्या नजरेतला आनंद... घाईघाईनं दोन्हीं हातांच्या ओंजळीत मावतील तितक्या वड्यांना लागलेली माती झटकून, वडे पोटाशी कवटाळून पळताना खुशीनं तिचे चमकणारे डोळे...यांचे गणित उगाच व्यस्त होत गेले.. Read more....

ऐलतीर पैलतीर - Umesh Patwardhan

हे एक चांगले रूपक उमेशने उभे केले आहे. तो सतत प्रयोग करीत असतो...नवी वाट शोधत असतो.... ऐलतीर पैलतीर - उमेश पटवर्धन मी होतोच ऐलतीरावर. पैलतीरावरच्या लोकांना पाहत. बऱ्याचदा वाटायचं किती भाग्यवान आहेत पैलतीरावरचे सशक्त लोक. ऐलतीरावरून पैलतीर गाठलेले. कित्येक तर पैलतीरावरच जन्माला आलेले.. पैलतीरावरचे काही सशक्त, भाग्यवान लोक पैलतीरावरच्या दुबळ्या अभागी लोकांकडे कणवेने पहायचे. कधी कोरडेपणाने तर कधी डोळ्यात खोटे.. खरे अश्रू आणून. मग मीही पैलतीरावर जाण्याचा निश्चय केला आणि प्रवाहात उडी घेतली. काय काय नव्हतं त्या प्रवाहात? वंशभेद, जातीभेद, स्पर्धा, नकार, उपेक्षा.. सर्व सर्व.. आज पैलतीरावर पोचल्यावर हायसं वाटतं आहे. आपण या जीवघेण्या प्रवाहात कसे टिकलो याचे आश्चर्य वाटत आहे. पण अखेर पैलतीरावर पोचलो याचे समाधान आहेच. आता मी ऐलतीरावरच्या दुबळ्या आणि अशक्त लोकांना पाहतो.. मीही आता त्यांच्याकडे बघून कधी खरे, कधी खोटे अश्रू ढाळायला चालू केलं आहे.. - उमेश पटवर्धन Read more....

कापडाची भिंत-Varsha Chobe

नुक्कड म्हणजे काय? ह्याचे उत्तर आहे ही कथा....वर्षा चोबे...जियो! कापडाची भिंत - वर्षा चोबे दंवभरली पहाट उगवली अन् मी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडले हीच एक वेळ माझी माझ्यासाठी. रोजच्याच वाटेवर ओळखीच्या खुणांमधे नवं काहीतरी शोधत माझी नजर जागृत,चौकस.मेनरोडवर जरासं दूर जाताच रस्त्याच्या कडेला एक भटकं कुटुंब गाठोड्यांवर कलंडून झोपी गेलेलं.सहजच कुतुहल चाळवलं. कोण असतील? रस्ता मात्र निश्चिंत अशा आस-यांची त्याला माहेरसयच! दुसऱ्या दिवशी पासून सवयीनं माझी चौकस नजर येता-जाता त्यांच्या संसारावर फिरत होती.'हे विश्वचि माझे घर; या संकल्पनेनं काठ्या आणि मोठं प्लॅस्टीक यांच्या साह्याने तुंबलेल्या नालीच्या काठावर झुग्गी उभारुन कापडाच्या आरपार भिंतींच्या आत ते गुरगुटून झोपलेले. माझ्याच मनात सरपटणारं जनावर आणि इतरही दोन पायांची हिडीस जनावरं येऊन गेली.लगेच स्वतःला सावरुन मी पुढे गेले.एखाद्या अनोळखी गोष्टीशी सुध्दा असं कसं नातं जुळतं ना! बरेच दिवस वेगवेगळ्या प्रहरी न्याहाळणं सुरु होतं परतताना जाग दिसायची.मळकी विटकी घागराचोली घातलेल्या दोन स्त्रिया. पैकी एक काटक उंच बांध्याची वृध्दा चेहऱ्यावर गोंदण पायात चांदीचं कडं पिंगट पांढ-या केसांचा छोटासा बुचडा, डोक्यावरुन ओढणी घेतलेली पहाडी आवाजाची ती जरा खमकीच वाटली. दुसरी काळी सावळी मध्यम बांध्याची.गोंदणा व्यतिरिक्त विनालंकृत साध्या वेणीतली ती गरीब गाय डोक्यावरची ओढणी सतत सांभाळणारी.दोन पुरूषांपैकी एक मळक्या धोतर अंगरख्यावर जीर्ण शीर्ण फाटकं कांबळं पांघरलेला पाठीतून वाकलेला वृध्द वारंवार खोकल्याच्या उबळीनं ग्रासलेला तरी बिडीचा धूर छातीत कोंडणारा, मनात येईल तेव्हा बसल्या बसून झाडू लावणारा.दुसरा तरुण संसाराचा भार तोलणारा खालून काठ कुरतडलेली पँट त्यावर रंग ओळखू न येणारी टिशर्ट घातलेला.चार पोरं, मोठी नऊ वर्षांची तिच्या खालील तीन भावंड. एवढंच कमी म्हणुन की काय,एका छोट्या बेवारस कुत्र्याच्या पिलाला पोरांनी आपल्यात सामावून घेतलेला. ऋतू कातडीवर झेलणारी ती फाटक्या अधू-या कपड्यातली नात नातू मंडळी कधी शेकोटीभोवती दादीसोबत तर कधी खोक्यातल्या मातारानीला हात जोडताना दिसत.त्यांच्याशी संवाद साधावा अशी उर्मी येई..पण....! एक दिवस मनावरची ही पण; झुल उतरवून मी गेले गुबगुबीत टेडी,मंकी बरेच प्रकार मांडलेले तसेच झाडावरच्या दो-यांना टांगलेले होते. या गुबगुबीत सुंदर निर्जीव खेळण्यांमागची ती बारकी मळकी पोरं दगड माती घेऊ झुग्गीमागच्या नालीतील घाण उचकणा-या डुकरांना हुसकून लावत माती गोटे कच-याशी मनसोक्त खेळत होती मी कुशन्स घेतल्या आणि तिच्याशी थोडाफार संवाद साधला.मीणाचं कुटुंब म्हणजे राजस्थानातून पोट हाती घेऊन आलेले फिरस्ती लोक. काही भेटीतच माझी भीड चेपली कलत्या दुपारी मी पोरांसाठी खाऊ घेऊन जाऊ लागले.उघड्यावरच्या चुलीवर दिवस बुडण्याआधीचा तिचा भाजी भाकरी किंवा भाताचा रांधा सोबतच तिच्या संसाराचाही मोडजोड रांधा माझ्याजवळ उलगडू लागला. मीणा ऐसी स्थिती में चार बच्चे? तिला माझा हिशेबी प्रश्न, क्या करते दिदी हमारी सास माणे खौलता दूध उणके सामणे किसीकी एक णा चलै है,और मरद को बार-बार कैसे णा बोल सकै है बताओ? इस वास्ते जैसी माताराणी की मर्जी; कापडाच्या आरपार भिंती पुढे आल्या. यापुढे ती हळूहळू उमजत गेली. मीणाला न्हाणं आलं आणि झुग्गीतल्या रमेसशी खुल्या मांडवात लग्न झालं फक्त झुग्गी आणि कापडाच्या आरपार भिंतीचे संदर्भ बदलले बाकी फिरस्ती कायम.तळपायाच्या भोव-यागत नशीब जिथे नेईल तिथे जायचं.ना भविष्याची चिंता ना कुठलं रडगाणं ना कसली तक्रार देशातील कुठल्याच घटनांशी किंवा सरकारी योजना नियमांशी नोंदीशी दुरान्वयेही संबंध नाही.आला दिवस हातावर पोसायचा उपास-तापास ठरवून करायचे नाहीत इतकंच. झुग्गीतच जन्माला आलेली पोरं जी परिस्थितीशी झगडून जगू शकत होती ती जगली कमजोर होती ती मातारानीकडे परतली. साधा हिशोब. आओ दिदी, बहोत दिनो बाद आए माझ्याशी बोलताना मीणाचा डोक्यावरचा पल्लू खांद्यावर आला तशी दूर बसलेली सासू कडक नजरेनं बघत तरतर सुनेजवळ आली एक जोरदार शिवी हासडत तिच्या कानशीलावर पाची बोटं खडकवली अन् निघून गेली. तिनं पल्लू ठिक करत काही शब्द गिळले. त्यामागची पार्श्वभूमी तिने पुर्वी सांगितली होती,दुकानात एकटी बसली असताना पुरुषांच्या नजरा शरीरावरुन फिरतात मुद्दाम खालची खेळणी मागतील वाकून काढायला गेलं की डोकावणा-या छातीकडे टक लावून बघतील आपसात अश्लील बोलतील. उसदिन ऐसेही हुवा,तो सास और मरदने तू ही रांड है साली बोलके लकडी से भौत मारा पीटा, उसदिनसे चोलीका बडा गला पिन लगाके छोटा की हुं तिच्या गाल आणि कानावर चांगलेच वळ उठले होते. पण तिच्या संवेदना? उघड्यावरच्या या जळीत सत्याने मनावर ओरखडा उमटवला. मीणानं पाण्याच्या हंड्यात तळात गेलेलं पाणी काढलं आणि एक घोट घेतला मीणा पिने का पानी कहांसे लाती हो? क्या बताए दिदी वो सामणेवाला दुकानदार साला भौत परेसान करता है बडी मुश्कीलसे मिठी मिठी बाते करके एक हंडी पानी भरने देता है फिर नहानाधोना? ती कसंनुसं हसली माह में एखादबार पानी मिल जाय तब रातमें छुपकेसे नहा लेते है..." अंधार ब-याचदा तिच्या मदतीला असा धावून येत असावा पहाटे कुठेतरी आडोशात शौचास जातानाही... स्वच्छ शहर मोहीमेच्या छातीवर हा प्रश्न अनुत्तरीतच नाही का? मीणाशी झालेल्या मैत्रीने बराच पैल गाठला होता एकट्यात ती बरीच मोकळी होत असे.रोज उत्साहाने दुकानात बसणारी मीणा मलूल चेह-यानी बसलेली दिसली क्या हुवा मीणा? तबियत ठीक नही? तिनेसुस्कारा सोडला हां ऐसेही, बहोत पेट दरद देता है कई दिनसे सफेत पानीवाली तकलीफ है दिदी तो डॉक्टर के पास क्यों नही जाती? हुं, सबके पेट पालने है दिदी डाक्तर कहासे करेंगे ऐसेही झाडपत्ती ले लेते है बोलता बोलता तिच्या ‘त्या’; चार दिवसातल्या आणि ब-याच न सांगता येणाऱ्या तक्रारी कळल्या. स्त्री आरोग्याची जनजागरण मोहीम अश्या अनेक मीणांच्या जाणीवांना कधी शिक्षित आणि समृध्द करणार ? अशिक्षित मीणा तिचा रोखीचा व्यवहार चोखपणे सांभाळत होती. त्यातलेच काही कलदार पदराशी बांधून बचतही करत होती.तिच्या कुटुंबासोबतच अशी कितीतरी कुटुंब पोटार्थी म्हणुन शहरात विखूरले होते.सा-यांचेच जगणे हातावर. अशात मी सहजसाध्य कॅशलेस व्यवहार करताना पदराशी कलदार जमवणा-या डिजीटलचा अर्थही न कळणा-या अशा अनेक मीणा नजरेसमोर तरळत राहतात. एक दिवस पोरं अशी उकीरडा उचकत खेळताना मी तिला जवळच्या म्युनिसिपालीटीच्या शाळेचा सल्ला दिला,ती रस्त्यावर तंबाखू थुंकत म्हणाली हां दिदी हम तो सकूल का मुं भी नई देखे ,पहली बार कपडा ‘गीला’ होने लगा (पहली माहवारी) और शादी होगई. बच्चोंको पढाने वास्ते मै ये पासवाले सकूल लेके गई थी दो चार दिन बैठे किताबे भी मिला लेकीन ‘अभी आने की जरुरत नई’ बोलके सकूलवालोने वापस भेज दिए, ‘भौत कोसीस कीया लेकीन....!’ तिनं मिळालेली पुस्तकं माझ्या पुढ्यात टाकली त्यातली नेमकी ‘सुगी’; कविता कागदावरच फडफडत राहिली. हक्काच्या बालशिक्षणाची पताका इथे फडकणारच नाही का? हा प्रश्न झुग्गीभोवती घोंगावत राहिला. मी आणखी गुरफटत गेले आणि संवादाची विण घट्ट होत राहिली. ‘क्यूं मीणा कल बहोत जल्दी दुकान बंद कर दी थी?’ तिनं पदर तोंडात धरुन डोळे मिचकावले ‘अरे दिदी कल जल्दीसे माल कटा मस्त धंदा हुवा,सासससूर बच्चोके साथ गाववालोको मिलने चले गए,तो हमारे मरदने कहीसे दारु लाया था बस, खा पी के दोनो लुढक गए’ आल्या क्षणाला उद्याचं भविष्य नसतंच.तिच्या आयुष्यातला पडद्याच्या भिंतीतला हा मोकळेपणानं भोगलेला कितवा क्षण असेल? ती खोळीत मॅक्रम भरण्यात व्यस्त झाली मी निघाले. मानवी मनाला अलिप्त राहता येतं? मी चारआठ दिवसांनी गावाहून परतल्यावर मॉर्निंगवॉकला गेले.अधीर उत्सुकतेनं नजर ओळखीच्या खुणा टिपायला भिरभिरली. झुग्गी उठली होती. हे स्विकारायला मन तयार नव्हतं.परतीचा ठावठीकाणा नसलेले ते कुणाचा अन् का म्हणुन निरोप घेतील! झुग्गीच्या आधाराला असलेल्या काठ्या तशाच रोवलेल्या. त्यावर जीर्णशीर्ण कांबळं टांगलेलं, चुलीचे गारेगार दगड आज मौन शांत,मातारानीच्या रिकाम्या खोक्यात फक्त उदबत्तीची राख विखूरलेली,वा-यासह जागा सोडलेले मॅक्रम दोरे फरच्या चिंध्या सर्वांना तिच्या सर्वांगपीडेचा घुसमटलेला वास.... नालीवरच्या दगडावर बिभत्स वळवळणा-या अळ्या आणि किड्यांनी वेढलेला तिचा सृजनाची ग्वाही देणारा दर महिन्याचा डागदार ‘गीला कपडा’ तिच्या अनारोग्याची साक्ष देत उघडा-वाघडा पडलेला... वर्षा विद्याधर चोबे चंद्रपूर 9403977266 Read more....

नाळ – अरुंधती चितळे

किती सुंदर कथा आहे ही...अरुंधती चितळे...खूप भावली. नाळ – अरुंधती चितळे माझ्या आईशी माझी नाळ रुढार्थान कधीच तुटली होती. पण सर्वाथान मात्र तीनेच ती तोडली होती. मी मन्सूरशी लग्न करायच ठरवल आणि आमच्यातला ताण वाढत गेला. लग्नानंतर तो तुटलाच इतका की समोरुन गेले तरी मी अनोळखी. मग रियाचा जन्म झाला. जाता येता आईच्या डोळ्यात ओळखीचे भाव दिसु लागले. कधीतरी नकळत ती रियाच्या बोबड्या बोलांना बळी पडली आणि कधीच कोणी दूर गेल नव्हत इतके सगळे जवळ आले. मन्सूरही अचानक खूप चांगला झाला. आटपाट नगरात सर्वत्र सुख शांती नांदु लागली. मला मात्र पराच्या सात गाद्यांखालून तो नाळेचा तुटलेला तुकडा अजून टोचतोच आहे. माझ्या एका निर्णयाने माझे पूर्ण अस्तित्वच विसरणाऱ्या माझ्या आईपासून मी तुटले ती तुटलेच. आजीच्या रुपातला तिचा पुर्नजन्म माझ्या अस्तित्वामुळेच तर जन्माला आला होता. त्या कोरड्या कडक नाळेभोवती आता रेशमाच्या लडी गुंडाळल्या गेल्या होत्या. वरुन कितीही सुंदर दिसत असल्या तरी नाळ आत कडक टोचरीच उरली होती. नाळेतून मला जीवनरस देणारी माझी आई माझ्यासाठी संपली तरी आजीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली होती. Read more....

सोन्यासारखा...-Rashmi Madankar

फक्त सूक्ष्म निरीक्षणातून अशी कथा जन्मू शकते...शाब्बास रश्मी . सोन्यासारखा जीव!! – रश्मी पदवाड मदनकर भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना, .पाणी पाणी जीव होतांना काळवंडलेली-कृश पारो... कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कणकण शोधणारी.... हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.— Read more....