Bhutbangala

गूढ – Deepa Sukhthankar Gaytonde

आज पुन्हा एकदा गुरुवार थरार........१ गूढ – दीपा सुखठणकर गायतोंडे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर अग्निहोत्रीरामपुरला जायला खूप उत्सुक होते. तिथे खोदकाम करत असताना काहीलोकांना प्राचीन वस्तूसापडलेल्या. एका संपूर्ण शहराचा शोध लागू शकतो असा सरांचा अदमास होता. त्यांच्या टीममध्ये रेश्मा आणि अतुलचाही समावेश करण्यात आलेला. अग्निहोत्री सरांचा राईटहँड होताअतुल.रेशमाचीमात्रप्रत्यक्ष साईटवर काम करायचीही पहिलीच वेळ होती. अग्निहोत्री सरांची टीम त्यांची साधने घेऊन रामपुरला पोचली. छोटसंचंपण मस्त गावं होतं ते. गावकर्यांनी त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं. गावच्या सरपंचांनी त्यांची खूप उत्तम प्रकारेव्यवस्था केली होती. अग्निहोत्री सरांना तर कधी एकदा साईटवर जातो असं झालेलं. तेवढ्यात एक काटकुळा मोठ्या डोळ्यांचा एक माणूसपुढे आला. म्हणाला, साहेब मी दिनू. माझ्या शेतात विहीर खोदायचं काम चालू होतं. पण तिथे आम्हाला काही वस्तू सापडल्या. माझ्या शेतात मिळाल्या म्हणून माझे नातलग सांगत होते की माझा त्यांच्यावर हक्क आहे पण सरपंचांनी सांगितलं की या वस्तू साध्यासुध्या दिसत नाहीत. यावर सरकारचा हक्क आहे आणि इथे जर संशोधन झालं तर चांगलंचं आहे. आपलं गावही त्यामुळे प्रकाशझोतात येईल. चला मी दाखवतो तुम्हालाती जागा. सगळेजण दिनूच्या पाठोपाठ चालायला लागले. शेतात बर्यापैकी खोदकाम झालेलं होत. दिनूने तिथे सापडलेल्या वस्तूही दिल्या.काहीतांब्याची भांडी, मृत्तीकापात्रांचे तुकडे, काही तांब्याची हत्यारं एक दगड ज्यावर शिलालेख कोरलेला होता. त्या वस्तू बघूनसगळ्यांच्या अंगातउत्साह संचरला. अग्निहोत्री सरांची टीम रात्रदिवसझपाटल्यासारखीकाम करत होती.उत्खनन करताना खरंच हजारो वर्षापूर्वीच्या शहराचे भग्नअवशेष सापडत होते. काही मुर्त्या सापडल्या. एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडाही होता. त्या नाण्यांवर संस्कृत भाषेत काही लिहिलं होत नाण्याच्या एका बाजूला राणीचा छाप होता खाली तिलोत्तमा असं लिहिलेलं होत. दुसर्या बाजूला कालीमातेचा मुखवटा होता.एक सिंहासनही त्यांना सापडलं. अतुल त्यासिंहासनाची पहाणी करत होता. मदतीलारेश्मा होतीच. अचानक अतुल बेशुद्ध पडला. रेशमाची तारांबळ उडाली. तिने त्याच्या चेहर्यावर पाणी मारलं पण तिला स्वत: लाच भोवळ आली. दोघांनाही हुशारी आलीतेव्हा दोघही एकमेकांच्या बाहुपाशात होते. रेश्माच्या अंगावर शहारा आला.पण जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलंत्यांची शरीरं वेगळीचहोती. अतुलने राजासारखा पेहराव केला होता आणि रेशमाच्या अंगावरही उंची वस्त्र होती. भव्यदिव्य अशा राजवाड्यात ते उभे होते. आजूबाजूलाकोलाहल चालू होता. तेवढ्यात काही सैनिक त्यांच्यासमोर आले आणि अतुल रेश्मावर त्यांनी भाले उगारलेपण त्याचवेळीएक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी स्त्री तिथे आलीतिने सैनिकांना थांबवले. ती स्त्री संस्कृत भाषेत बोलत होती. ती म्हणाली सोडा त्यांना. ते दोघे पळून गेलेत. हे वेगळेच कोणी आहेत. सैनिक पाठी झालेआणि ती स्त्री अतुल, रेशमाच्या समोरआली. ते दोघे बावचळले होते. काय होतय ते त्यांना कळत नव्हते. पण अतुलच्या लक्षात आलं, उत्ख्नन करताना सापडलेल्या नाण्यावर ज्या राणीचा छाप होता तिच्याशी ह्या स्त्रीचा चेहरा बर्यापैकी मिळताजुळता होता. तीस्त्री म्हणाली ,”घाबरू नकात तुम्ही सुरक्षित आहात. मी तिलोत्तमा. या कनक राज्याचीराणी.तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळतील. आत्ता चला माझ्याबरोबर. अतुल आणि रेश्माला घेऊनतिलोत्तमातिच्या राजवाड्यात गेली दोघांची तिने उत्तम बडदास्त ठेवली. पण आपण इथे का आणिकसे आलो हे प्रश्न त्यांना भेडसावत होते. अतुल रेश्माला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. संध्याकाळी तिलोत्तमा परत त्यांच्या दालनात आली आणि म्हणालीतुम्हाला माझी कर्मकहाणी पहिल्यापासून सांगते. हे राज्य माझ्या पिताश्रींचे आदित्यराय यांचे होते. मी एकुलती एक कन्या असल्यामुळे माझं स्वयंवर ‘पण’ ठेऊन करण्यात आलेलं. आणि माझं लग्न पुरुरवा यांच्याशी झालं. आमच्या लग्नानंतर काहीच दिवसांनी माझ्या वडिलांचे निधन झाले आणि माझे पती पुरुरवा गादीवर बसले. आम्ही दोघं मिळून राज्य चालवत होतो. पुरुरवा काही दिवसांसाठी दुसर्या राज्यातराजकीय बातचीत करायला गेले होते. ते गेले त्याचं रात्री मला स्वप्न पडले की मी एका पिंजर्यात कैद आहे. तो पिंजरा अधांतरी लटकत होता.आणि पिंजर्याच्या खाली मोठ्या मोठ्या घुशी स्वैरपणे हुंदडत होत्या. मला खूप जोरात भूक आणि तहान लागली होती पण माझ्या शरीरात साधं उठून उभं रहायची पण ताकद नव्हतीआणि मला एकदम जाग आली.मी घामाने चिब ओली झाले होते.नंतर नंतर तर मला दिवसा पण अशी स्वप्न पडू लागली. पूर्ण दिवस मी गुंगीतच असायचे. नेहमी त्या स्वप्नात मलाएक जख्ख म्हातारा माणूस माझ्यासाठी जेवण घेऊन आलेला दिसायचा. जेवण म्हणजे काय नुसती सुकलेली पुरोद्शा. मी अधाशासारखी त्यावर झपटायचे पण ते खाणे पण मला खूप अवघड वाटायचे. कारण तेवढे त्राण माझ्या अंगात नसायचे. माझ्या हातातील अर्ध्यापेक्षा जास्त पुरोद्शा खाली पडायची आणि घुशी ताबडतोब ते तुकडे पळवायची. एकदा तर एका घुशीने माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मी स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला पण त्या झटापटीत माझ्या पायाच्या बोटाला जखम झाली आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा मला जाग आली तेव्हा तशीच जखम माझ्या पायाच्या बोटाला झालेली होती. राजवैद्यांना माझ्या आजाराचं निदानच होत नव्हत. माझी खास दासी लतिका हिला माझे हाल बघवत नव्हते. शेवटी ती कोणाच्यातरी ओळखीने गुरुदेवांकडे गेली. गुरुदेव एकदाच मला बघायला आले. त्यांनी मला अभिमंत्रित भस्मलावले आणि भस्माची पुडी माझ्या उशाखाली ठेवली. त्यानंतर लतिकाला आणि तिच्या पतींनाश्रवण यांना त्यांनी स्वत:कडे बोलवून काही होमहवन करून घेतले. नंतर ते राज्याबाहेर असलेल्या जंगलामध्ये गेले त्यांचा वाटाड्या एक बाहुली होती. मजलदरमजल करत ते एका गुहेत गेले. पाठोपाठ लतिका आणि श्रवणतिथे गेले. तिथे त्यांना एक पिंजरा दिसला ज्याच्यात एक मरणप्राय शरीर होते. त्या पिजर्यांसमोर तो जख्ख म्हातारा उभा होता.गुरुदेवांनी त्या म्हातार्याला मला या सगळ्यातून सोडवायचे आवाहन केले पण तो मानला नाही. त्याने गुरुदेवावर हल्ला चढवला. पण गुरुदेवांपुढे त्याचं काही चाललं नाही.अभिमंत्रितभस्माचा मारा केल्यावर त्याला तिथून पळून जावे लागले. श्रवण यांच्या मदतीने ते मरायला टेकलेले शरीर गुरुदेवांनी बाहेर काढले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून गुरुदेवांनी काही मंत्र म्हटले. त्या शरीरातून एक प्राणज्योत बाहेर निघाली आणि गुहेतून बाहेर येऊन आकाशामध्ये लुप्त झाली. माझी त्या शरीरापासून सुटका झाली. काही दिवस बरे गेले परंतु एकदा रात्रीचीमला जाग आली आणि बघते तर काय पुरुरवा जागेवर नाहीत. मी त्यांना काही विचारलं नाही फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरवात केली. एका रात्री मी त्यांचा पाठलाग केला. ते वेशांतर करून निघालेले. राज्याच्या वेशीवर असलेल्या मोजक्या घरांपैकी एका घरात ते गेले. मीही लपतछपत त्या घराच्या पाठच्या बाजूला गेले. एका अर्धवट उघड्या खिडकीतून मी जे दृश्य पाहिले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे पती पुरुरवा एका स्त्रीबरोबर प्रणयराधना करत होते. मी तिथून जड अंतकरणाने परतले. पुरुरवा परतल्यावर मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी प्रथम सारवासारव करायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांना खरी गोष्ट उघड करावीच लागली. ती स्त्री त्यांची लग्नापूर्वीपासूनची प्रेयसी उर्वशी होती.फक्त राज्य मिळावे या हेतूने त्यांनी माझ्याबरोबर लग्न केले होते. मी पुरुरावांना उर्वशीला विसरून जा नाहीतर परीणाम वाईट होतील असं सुनावलं. माझ्यासमोर त्यांनी तसं कबूल केलं असलं तरीही ते उर्वशीला भेटतच होते हे मला माझ्या गुप्तहेरांकडून कळले. गुप्तहेरांनी मला आणखिन जी माहिती दिली ती तर धक्कादायक होती. पुरुरवा आणि उर्वशी यांनी अमावास्येच्या रात्री नदीवर जाऊन अंघोळ केली आणि तसेच ओलेत्या अंगाने स्मशानात गेले. तिथे एक चिता धडधडत होती. तिच्यासमोर एक अघोरी साधू बसलेला होता. त्या चितेसमोर हे दोघे बसले. त्या दोघांना त्या साधूने दोराने एकत्र बांधले,त्या अघोरी साधूच्या हातात मानवी कवटी होती त्यात जे रक्त होते त्याचे शिंतोडे त्याने त्या दोघांवर काही मंत्रोच्चार करून उडवले. त्यानंतरचित्रविचित्र हातवारे करून तो साधू त्या चितेभोवती प्रदक्षिणा घालत होता आणि मोठ्याने अर्थहीन शब्दांचा उच्चार करत होता. चिता शांत झाल्यावर त्याचं भस्म त्याने पुरुरवा आणि उर्वशी यांच्या कपाळाला लावले. आता माझ्या लक्षात आले की त्या दोघांनी मिळून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला पण मी त्यातून थोडक्यात बचावले. मी राजसत्ता परत माझ्या हातात घेतली आणि त्या दोघांना कैद करण्याची आज्ञा माझ्या माणसांना दिली. पण ते दोघं आमच्या हातावर तुरी देऊन निसटले. आता तुम्ही ज्या शरीरात आहात ती पुरुरवा आणि उर्वशी यांची आहेत. त्यांना असं वाटत की अशाप्रकारे ते निसटू शकतील. पण हा त्यांचा गैरसमज आहे. तुम्ही निश्चिंत रहा. मी तुम्हाला तुमच्या काळात आणि तुमच्या स्वत:च्या शरीरात परत जायला मदत करेन. चला माझ्याबरोबर. त्या दोघांना घेऊन राजवाड्याच्या एका भिंतीपाशी आली. त्यावरगूढ चित्र चितारलेलं होत. त्या चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अतुल करू लागला तेवढ्यात तिलोत्तमाने त्या चित्राच्या मध्यभागी जो पंजा चितारला होतात्यावर स्वत:चा तळहात ठेवला. ते चित्र सरकलं आणि समोर एक जिना दिसू लागला. पायर्या उतरल्यावर एक पायवाट दिसत होती. दोन्ही बाजूने पलिते लावलेले होते. अतुल आणि रेश्मा तिलोत्तमेच्या मागे जात होते. रेश्माला वाटलं कोणीतरी आपल्या मागून येत’ आहे. तिने मागे वळून पाहिलं. दोन लाकडी बाहुल्या अधांतरी तरंगत त्यांच्या पाठून येत होत्या. त्यांना बघून रेश्मा घाबरली. तिलोत्तमाने सांगितलं घाबरू नकोसत्या इथल्या रखवालदार आहेत. मी तुमच्याबरोबर असल्यामुळे त्या तुम्हाला इजा पोहोचवणार नाहीत. बराच वेळ चालल्यानंतरप्रकाशाची तिरीप दिसू लागली. एक भव्यदिव्य मंडप तिथे होता. तिथे अनेक खांब होते. प्रत्येक खांबावर एक एक मुखवटा होता. काही मुखवटेप्राण्यांचे होते तर काही गूढ प्रकारचे भीतीदायक मुखवटे होते.समोर कालीमातेचीखूप उंचमूर्ती होती. तिचीजीभ बाहेरकाढलेली होती. हातात वेगवेगळी आयुधे होती. एका हातात राक्षसाचे मुंडके होते आणि तिच्या गळ्यात नरमुंडकी होती.कालीमातेचे अक्राळविक्राळ रूप पाहून रेश्माला दरदरून घाम फुटला. तिनेअतुलचा हात घट्ट पकडून ठेवला. कालीमातेसमोरहोम पेटवलेला होता. होमामधील अग्नीच्या ज्वाळा धगधगत होत्या.अग्नीची धग जाणवत होती. होमासमोर एक शुभ्र कपडे परिधान केलेली तेज:पुंज व्यक्ती बसलेली होती.तिलोत्तमेने त्यांना नमस्कार केला. मग अतुल आणि रेश्मानेही त्यांना नमस्कार केला. तिलोत्तमेने ओळख करून दिली.हे आहेत गुरु पुष्कराज. आज मी तुमच्यासमोर जिवंत उभी आहेते यांच्यामुळे नाहीतर माझा शेवट कधीच होणार असता. `गुरुजींनी मंद स्मित करून दोघांना होमाच्या समोर बसावयास सांगितले. मगासच्या त्या दोन बाहुल्याही दोघांच्या दोन बाजूला बसल्या.गुरुजींनी सांगितले मी तुम्हाला तुमच्या जगात जाण्यासाठी मदत करेन पण त्यात तुमचीही तेवढीच जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी. आहे ना तुमची तयारी? दोघांनी होकार दिला. पुढे गुरुजी म्हणाले. आपण दोन दिवस हा विधी करणार आहोत. गुरुजींनी सगळेजण बसलेले त्याभोवती दर्भाने रिंगण घातले आणि म्हणाले यामुळेतुमचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण होईल.त्यानंतर काही मंत्र म्हणून गुरुजींनी आहुती द्यायला सुरवात केली. अग्नीच्या ज्वालांमध्ये भयानक चेहरे दिसत होते. जणू काही ते आहुती घ्यायलाचं आले होते.बर्याच वेळाने गुरुजी म्हणाले आजचा आपला विधी पूर्ण झाला. पुढचा विधी आपण उद्या पूर्ण करू.त्यांनी दोघांच्याही दंडाला तावीज बांधले आणि म्हणाले काहीही झालं तरी हे तावीज सोडू नकात. हे तुमचं रक्षण करतील. महालात परतल्यावर तिलोत्तमेने त्यांची रजा घेतली. रात्र खूप झाली आहे. तुम्ही विश्रांती घ्या, ती म्हणाली.राणीसाहेब आमची एक इच्छा कृपया पूर्ण कराल का? आम्हाला तुमच्या या कनकनगरीचा फेरफटका मारायचा आहे. नाही म्हणू नका. आमच्या अभ्यासात याचा खूप उपयोग होईल. राणीने संमती दिली. दुसर्या दिवशी अतुल आणि रेश्मानी एका सेवकाबरोबर शहराचा फेरफटका मारला.दोघांनी वेषांतर केले होते. अतुल घोड्यावर स्वार झालेला होता आणि रेश्मासाठी खास मेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आखीव रेखीव शहर होते ते. लोकांचीसुबत्ता दिसून येत होती.इतक्या सुंदर कोठ्या, बगीचे बघून अतुलला खूप आश्र्चर्य वाटले. तेव्हा वास्तूशास्त्र एवढं प्रगत होत तर.तो मनात म्हणाला. पण त्याला सारखं असं वाटत होतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे.ते बाजारात एका दुकानासमोर उभे असताना दुकानाचा वरचा भाग पडला अतुलने चपळाई दाखवली नसती तर त्याचा कपाळमोक्षच होणार असता. थोडं पुढे गेल्यावरअचानक अतुलचा घोडा जागच्या जागेवर थबकला. काही करता तो पुढेच जाईना. जणू काही समोर त्याला काहीतरी दिसत होत. मग अचानक घोडा उधळला. अतुल घोड्यावरून खाली पडला पण त्याचा पाय रिकिबीत अडकल्याने काही अंतरअतुल घोडयाबरोबर फरपटला गेला. लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून घोड्याला थांबवला आणि अतुलचा जीव वाचवला. कसेकसे ते राजवाड्यावर परतले.राजवैद्यांनी थोडेफार औषधोपचार केल्यावर अतुलला जरा बरे वाटू लागले. तीलोत्तमेने अतुलला विचारलं तुम्ही पुढच्या विधीसाठी येऊ शकाल नं. अतुलने सहमती दर्शवली. रात्री परत त्याचं ठिकाणी रेश्मा आणि अतुल तिलोत्तमेबरोबर आले. गुरुजी त्यांची वाटच बघत होते. अतुल आणि रेश्मा जाग्यावर बसल्यावर गुरुजींनी आदल्या दिवशीसारखेच संरक्षक रिंगण घातले. विधी अजून चालू पण नव्हते झाले आणि एक प्रकारची कुबट दुर्गधी येऊ लागली. आजूबाजूचे वातावरण काळवंडले. काही कळायच्या आतच खांबावरचे मुखवटे एकेक करून त्यांच्या समोर येऊ लागले जणू काही त्या मुखवट्यामध्ये प्राण आले होते. ते भयंक हुंकार टाकत होते. त्या मुखवटयांनी वरच्या बाजूला कोंडाळ केलं होत. त्यांनी अतुल आणि रेश्मावर हल्ला करायचा प्रयत्न केला. अतुलचे हातरिंगणाच्या बाहेर गेलेला होता. अचानक एका मुखवट्याने अतुलच्या हातातील ताविजावर झेप घेतली. अतुलला असं वाटत होत कि कोणी जंगली श्वापद त्याचा घास घ्यायला टपले आहे. गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. त्यांनी कोणालातरी आवाहन केलं. अचानक राखणदार बाहुल्या तिथे प्रकट झाल्या. त्या आज वेगळ्याच भासत होत्या. त्यांचे चेहरे क्रोधाने भरल्यासारखे वाटत होते. त्यातल्या एका बाहुलीने त्या मुखवटयावर हल्ला चढवला.त्या मुखवट्याचा जोर कमी झाल्यावर अतुलने पटकन आपला हात परत रिंगणात घेतला.त्या बाहुल्या मुखवटयांबरोबर त्वेषाने लढत होत्या. गुरुजींनी त्या बाहुल्यांवर अभिमंत्रित भस्म फुंकले आणि आश्चर्य बाहुल्यांची संख्या वाढली. एकेक करीत सगळे मुखवटे जमीनदोस्त झाले. तेवढ्यात गुरुजींच्या मागच्या बाजूला एक आगीसारखा लोळ उठला आणि त्यातून एक काळे कपडे घातलेला डोक्यावर कुंकवाचा मळवट भरलेला अक्राळ विक्राळ चेहर्याचा माणूस प्रकट झाला. त्या माणसाला पाहून तिलोत्तमा चवताळली, म्हणाली‘मला अंदाज आलेलाच की या सगळ्यामागे तूच असणार, नाहीतर त्यांची काय हिम्मत होती. त्यांच्या मदतीने तुला माझ्या राज्याचा घास घ्यायचा होता. तू त्यांचा प्याद्यासारखा वापर केलास आणि आता इथून पळून जायला मदत केलीस’. उग्रसेन गडगडाटी हास्य करत म्हणाला. हो खरी गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळेला माझा डाव फसत आला. तुझ्या या गुरूने मध्ये खोडता घातला पण आता नाही.यावेळेला मी तुझ्या या गुरूलाच धडा शिकवणार आहे. आता तू काहीही करू शकत नाहीस. तेवढ्यात त्या राखणदार बाहूल्यांनी उग्रसेनवर हल्ला चढवला. पण हाय रे दैवा. उग्रसेनाने एका झटक्यात त्यांचे काम तमाम केले. आता उग्रसेनाने गुरुजींकडे मोर्चा वळवला. उग्रसेन आणी गुरुजी एकमेकांवर निरनिराळ्या अस्त्रांचा भडीमार करत होते. कधी उग्रसेनाचे पारडे जड होत होते तर कधी गुरुजींचे. पण अचानक उग्रसेनाच्या एका अस्त्रामुळे गुरुजी कोसळले. उग्रसेन मोठ्याने ओरडला जितम जितम. तिलोत्तमा धावत कालीमातेच्या मूर्तिकडे गेली आणि तिने कालीमातेच्या हातातील त्रिशूळ खेचून घेतला. तिने कालीमातेला आवाहन केले.कालीमातेचे डोळे लकाकल्याचा रेश्माला भास झाला. एकदम सगळीकडे धूर झाला आणि काही दिसेनासे झाले. परत दिसू लागले तेव्हा तिथे उग्रसेन नव्हताच फक्त गुरुजी खाली पडलेले दिसत होते. तिलोत्तमा गुरुजींना सावरण्याचा प्रयत्न करायला गेली. पण जेव्हा ती गुरुजींच्या एकदम जवळ आली तेव्हा तिथे एक जख्ख म्हातारा दिसू लागला आणि तो तीलोत्त्मेला दरडावू लागला . तुझी मी काय अवस्था केलेली तू एवढ्यात विसरलीस काय. मी अजिंक्य आहे. माझा पराभव कोणीही करू शकत नाही. अतुलला तेव्हाच कन्ह्ण्याचा आवाज ऐकू आला. रेश्माला बरोबर घेऊन तो आवाजाच्या रोखाने पुढे जात होता. काही पलिते विझलेले होते. पण त्या अंधुक प्रकाशातहीएका खांबाच्या खाली अतुलला मनुष्याकृती दिसली. पुढे गेल्यावर त्याला लक्षात आलं ते गुरुजीच होते. त्यांनी अतुलला जवळ बोलावलं आणि म्हणाले आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यांनी एक खंजीर काढून अतुलला दिला आणि म्हणाले. हया मंतरलेल्या खंजीराने उग्रसेनाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध मी सांगतो तो मंत्र म्हणून वार कर. जराजरी वार चुकला तर जीवावर बेतेल एवढं लक्षात ठेव. होमाच्या ठिकाणी अतुल आणि रेश्मा परतले आणि बघतात तर काय, तिलोत्तमा त्रिशुळाने उग्र्सेनावर वार करत होती पण तो ते शिताफीने चुकवत होता.हळूच दबकत दबकत अतुल उग्रसेनाच्या पाठी आला आणि तो बेसावध असतानाच त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध अतुलने वार करायचा प्रयत्न केला. पण तो फसला. उग्रसेन चवताळला आणि तो अतुलवर चाल करून गेला.तेवढ्यात रेश्माने उग्रसेनावर होमातील एक जळंत लाकूड घेऊन वार करायचा प्रयत्न केला. एका बाजूने तिलोत्तमेने त्रिशूळ उग्रसेनाच्या पाठीत खुपसला. त्या त्रिशुळाने जखम झाली असली तरी ती जखम उग्रसेनाने पचवली आणि तो परत उठून अतुलकडे जायचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यातून अंगार फुलत होते. एवढे सगळे घडत होते तेव्हाच पाठून गुरुजी आले आणि त्यांनी अतुलला आवाहन केले. हाच तो क्षण अतुल डगमगू नकोस. तुला सांगितली त्याप्रमाणे कर. अतुलनेही चपळाईने त्याच्या हातातला खंजीरानेउग्रसेनाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध वार केला आणिगुरुजींनीदिलेला गूढ मंत्र ‘ओम र्हाम र्हीं हृम ऐं स्त्रीं श्रीं महाकाली रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जही’ म्हटला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि आक्रोश करत उग्रसेन जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीराची राख होऊन उडून गेली. आता अजिबात वेळ न काढता मी तुम्हाला तुमच्या शरीरात पाठवणार आहे गुरुजी म्हणाले. तिलोत्तमेचा साश्रू नयनाने निरोप घेऊन ते दोघ हवनकुंडासमोर बसले आणि गुरुजींनी काही मंत्र म्हणून आहुती दिल्या. अतुल आणि रेशमाच्या अंगठ्याला छोटासा छेद देऊन त्यांनी त्यांच्या रक्ताचे काही थेंब ह्वनकुंडात अर्पण केले. दोघांभोवती धुळीचा लोट उडायला लागला आणि दोघेही भोवळ येऊन पडले. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते स्वत:च्या शरीरामध्ये परतले होते. प्रोफेसर अग्निहोत्री आणि त्यांचे सहकारी कोंडाळं करून त्यांच्याभोवती उभे होते. दोघेही स्थिरस्थावर झाल्यावरप्रोफेसरांनी अतुलला विचारलं,गेले दोन दिवस तुम्ही दोघे असे वेगळे का वागत होता?अतुलने त्यांना आपली आपबिती सांगितली. हे सर्व विश्वास बसण्यासारखं नव्हतं पण समोर पुरावा होता. पूर्ण शहर स्वत:च्या डोळ्याने पाहिलं असल्यामुळे अतुल आणि रेश्माला सगळ्या पुरातन वस्तूंचाउलगडा व्यवस्थित करता आला. ते प्रोजेक्ट संपल्यावर अतुल आणि रेश्मा विवाहबंधनात अडकले. प्रोफेसर अग्निहोत्री जातीने त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायला हजर होते. Read more....

हस्तक-Gaurav Naygaokar

आज गुरुवार - थरार क्रमांक २ हस्तक-गौरव नायगावकर सावध व्हा..ह्या ईशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका..माझं ऐका.... . . दुष्ट, शैतानी 'पापिऱ्या' ने त्याचे 'हस्तक' मोकाट सोडले आहेत.. पहा.. ऐका.. त्यांचा आवाज येतोय.. ....खस्सस्स, खर्रर्ररर.. .. म्हणजे ते जवळच असतील..वाचवा स्वतः ला.. . . . . त्या अभद्र आकाराला 'हस्तक' नाव चपखल बसतं... दुष्ट पापिरा मानवाच्या मृत शरीराच्या मनगटापासून पुढचा पंजा कापतो अन् त्यावर विकृत विधी करून हस्तकांना 'जिवंत' करतो... . . . . नीट पहा.. ते हस्तक तुमच्या आजुबाजुला तर कोठे नाहियेत् ना? फार फार अभद्र आहेत हो ते.. विद्रूप.. किळसवाणे.. सडक्या, मेलेल्या मांसाचा दुर्गंध असलेले.. . . काही हस्तक केसाळ आहेत.. तर काहींच्या पंज्यावरची कातडी गळून पडलेली आहे.. त्यातून हाडं दिसतात.. ...काहींची बोट् वाकडी झालेली आहेत.. ज्यांची सरळ आहेत, ते बोटांवर वळवळत तुमच्याकडे झेपावतात.. अन् बाकीचे खरडत, सरपटत् जातात.. त्याचाच आवाज येतो हा.. ....खस्सस्स ... खर्रर्ररर. जरा कानोसा घ्या.. कुठे जाणवतोय का तो आवाज? . . . हस्तकांच् काम एकच्.. तुमच्यावर झेप घ्यायची अन् तुमची चिरफाड करायची.. तुम्ही जिवंत असतानाच.. एकदा का तुम्ही मेलात, की ते तुमच् शरीर पापीऱ्याकडे ओढत घेऊन जाणार.. पापिरा तुमच्या शरीरावर तर जगतो.... खाऊन झाल्यावर तुमचे पंजे तो मनगटापासून तोडनार ...अन् हस्तकांना अजुन दोन हस्तक सामील होणार.. ...काही हस्तकांच्या करंगळया तुम्हाला तुटलेल्या दिसतील... असले हस्तक फार क्रूर आणि हिंस्त्र आहेत.. त्यांच्याकडे विशेष कामगिरी दिलेली आहे पापीऱ्याने... ते सरळ तुमच्या तोंडावर झेप घेतात... अन् तोंडावाटे आत जाऊन तुमच् हृदय फाडून बाहेर घेऊन येतात... पापीऱ्याला नजराना म्हणून.... . . एक मात्र आहे.... . . उजेडात हस्तकांच् काही चालत नाही.... त्यामुळे तुम्ही अंधारात चुकून पण जाऊ नका.... पण सावध रहा.... हस्तक कुठेही दबा धरुन बसलेले असू शकतात.. . . .. अंधाऱ्या गल्लीत.. झाडावर, पानाच्या मागे.. तुमच्या गाडीखाली.. .. अंधाऱ्या माळ्यावर.. जिन्याच्या खाली.. जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात.. कुठेही.. तुम्ही कुठे कुठे शोधणार त्यांना.. . . . . तुम्ही एकच् करू शकता.. खस्स्सस्स.. खर्रर्ररर अशा आवजाकडे लक्ष ठेवा.. पहा.. ऐका.... आवाज येतोय? अगदी, अगदी बारीक तरी आवाज जाणवतोय का? ....कदाचित, तुमच्याच् सावलीत, तुमच्या पाठीमागे हस्तक दबा धरुन असतील... संधीची वाट पाहत.... तुमच्यावर कोणत्याही क्षणी झेप घेऊन चिरफाड करायला... एकदा मागे वळून खात्री करून घ्याच्... . . . ऐका माझं... सावध व्हा... इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका... . . . . खस्सस्स.... खर्रर्ररर.... Read more....

नटरंगी नार-Suchita Ghorpade

काय बहार कथा लिहिली आहे सुचीताने....जियो सुचिता.... नटरंगी नार – सुचिता घोरपडे चंदर पाटलाचं धाकलं पोरग जालिंदर म्हंजी देखणापान तरणाताठ गडी. तालिमीतनं कमावलेलं पीळदार शरीर. मिसुरडं आता कुट फुटत व्हत. शहरात रायलेलं पोर गावात कसा जीव रमलं. तवा पाटलानच गडयासंग मळ्यावर धाडलं. “मालक तुमास्नी एक इचारू का?” “हां...!” “नाही म्हंजी तुमासनी पसंद पडलं नाही पडलं.” “आता बोलतो का...” “तसं नव्ह मळ्याच्या खालच्या अंगाला पालं पडल्यात नव्ह.” “कसली पालं,आता नीट बोलतोस का शेंबडात माशी घुटमळ्यागत अडकून राहतोस.” “अवं मालक कानावर बातमी आलीया तमाशातल्या लई पोरी आल्यात्या.अगदी कवळ्याकंच हाईत. नाचत्यात बी अश्या की काळीज पुढयात येवून पडतया.” “असं म्हणतोस बगू तरी कश्या दिसत्यात या मैना.” “हां पर आता जाऊन कसं चाललं, रातीचं जाया पायजे.आज सुपारी देतोच त्या मावशीला. फकस्त आजची वस्ती मळ्यावर करा म्हंजी जालं. तसा निरोप धाडतोच वाडयावर.” “बरं बरं..” “आणि तसबी कालपासनं पालातल्या बायका कपड धुवाया आपल्याच हिरीवर येत्यात. तवा तुमी बगशीलाच त्यासनी. परं जरा जपून मालक, ह्या बाया लई खोडगुनी असत्यात बगा. मव्हाच्या माश्यावानी डसत्यात अन गाबण झाल्या म्हंजी नस्ती पीडा माग पडाया नगं.” “लई अक्कल पाजळू नगस. मला काय खुळा कावरा समजाया लागलास काय. तुझ्यापरीस लई गावचं पानी चाखलयं. तू निग आता.” जालिंदरला मळ्यावर पोचत करून नाम्या रातीचं काम फत्ते कराया निगाला. जालिंदर जरा येळ टेकणार त्योच तुणतुण्याचा सूर कानी आला. अंगात एकदम पेटल्यागत हून जालिंदर उठला. एका गडयानं तरी हटकलच, “मालक भर दुपारचं कुट निगालासा..?” “तुला कशाला पायजे रं नसत्या चौकश्या.गुमान पुढ बगून भांगल.” “तसं नव्ह मालक,भर डोक्यावर ऊन आलं हाय.वावरात एकटया दुकटयान भिरू नगासा.” “लई शानपना दावू नगसं.मला कोन धरतयं का चावतया.” जालिंदर तसाच वावर तुडवत आवाजाच्या दिसनं सुटला. मळा रायला माग. किसन्याची पाणंद आली तवा कुट पाय दबकत निगाला. अन पोटातन धगधग बाहेर पडावी तसं झाल समोरचं इपरीत चितार बगून. एक नटरंगी नार वडयाच्या पाण्यात पाय बुडवून पाण्यासंग अंगालाबी हेंदकाळ देत बसली व्हती. गुलबकावलीगत नाजूक, झेंडवागत पिवळीधम्म, तांबूस केसाचा बुचडा अन त्यावर एक गजरा. शेंगगत वळणा वळणाचा बांधा. डाळिंबागत लालचुटूक व्हट, रेशमागत तांबड जरतारी लुगड अन त्याला हिरवं काठ. इंदराची अपसरा झक मारल असं देखण रूपं. तिला बगूनच भान हरपलं जालिंदरच. भूल पडल्यागत जालिंदर जागचा काय हलना. वा-याची एक हलकी झुळूक आली, तसा जालिंदर भानावर आला. तशी ती पण मान जरा तिरकी करून हसली. एवड निमित पुर व्हत जालिंदरला वळख वाढवाया. पर इथं तर दान उलटचं पडलं. जालिंदरनं एचारायच्या अगोदर तीनं इचारलं, “कोन म्हनायाच पावनं तुमी..? पयल्या डाव पायलं. गावात नव हाईसा काय.” जालिंदर चपापला, “ऑ....मी मी....!” “आता गं बया.असं बक-यागत काय कराया लागला हाईसा.” आपल्याच येडया गबाळ्यागत बोलण्याचा राग येऊन जालिंदर म्हणला, “मी व्हय, मी चंदर पाटलांचा पोरगा..जालिंदर. जालिंदर नाव हाय माज.” चंदर पाटील नाव ऐकून तिचं डोळ असं काय लकाकलं. उरात धपापल्यागत हून मासळीगत टणकन उडी मारत ती जालिंदर म्होर उभी रायली. तिला अशी एकदम तोंडाजवळ बगून जालिंदरचं पुरत पानी पानी जाल. “रग्गड बावडी कमावली की तुमी. तालमीला जातासा वाटत.” एका बाई कडनं आपली तारीफ ऐकून जालिंदर बेडकागत टम्म फुगलाच. पर नवाल एका गोष्टीच वाटत व्हत, ना वळख ना पाळख तरी ही बाय कशी काय एवढी बोलाया लागली हाय. तवा बापाच्या वजनाची आठवन आली. अन छाती आनी चार हात पुढ आली. “तुमी कुठल्या म्हणायचं..?” “आता हित हाय तर हितलीच म्हणा की.” तिचं उत्तर ऐकून जालिंदर कोडयात पडला. तशी ती न बोलता पुढ चालू लागली. चाल बी कशी...भर ऊनात नागीन सळसळत जावी तशी. भूल पडल्यागत जालिंदरबी तिच्या मागन चालू लागला. एक एक रान माग पडलं अन जाधवाची हीर आली. तिथल्या चीचच्या झाडाखाली जवा आली तवाच ती थांबली. तसा जालिंदरबी थबकला. तशी ती म्हणली, “या बसा जरा निवांत. ऊनाच्या झळा जीव कासावीस कराया लागल्यात. घसा बी कोरडा झालाय.” असं म्हणत कमरला गुंडाळलेली चंची काढली.अन म्हणली, “पान घेणार का..?” “ऑ...घेतो की..” “मग असं उभं का पावण बसा की खाली.” असं म्हणत तिनं एक हात धरून तेला खालीच बसविला. तसा जालिंदर हरखला. अंगाला अंग झोंबत व्हत कात कातरताना. तसा जालिंदरच्या मनात केवडा फुलत व्हता. कवळ्या काकडी गत कराकरा खावी काय चीचच्या बुटूकागत एकदम तोंडात टाकावं असं जाल व्हत. तवर नजरनचं पान घ्याया इशारा केला. अन गुणगुणू लागली. “कवळं हाय पान रंगलया छान घातली चुना सुपारी नी कात गं रायानं धरला माजा हात” आता तर खरंच जालिंदरनं तिचा हात धरला. अन गपकन माग खेचला. इंगळावर हात पडावा तसा तेचा हात भाजला. “ऑ...काय जाल ओ..” “ना..ना नाय काय नाय.तुमचं अंग लई भाजालयं.बर बीर नाय का तुमास्नी.” “मला काय धाड भरलीया बर नसाया. म्हणलं नव्ह घशाला कोरड पडलीया. पानी पायजल हाय. जरा आनतासा काय हिरीतन.” इकडं नाम्या मालकाला सांगावा दयाया आला. तर समदी गडी माणसं मालकाला हुडकत व्हती. तसा नाम्यानं एकाला हाळी दिली. “कुट हाईत रं मालक..?” “ठावं नाय..मना करत असतानाबी गेलं नव्ह भर ऊनाचं.” “अरं मालक एक नवं हाईत पर तुमाले कळत नाय काय..?” नाम्या चपापला अन गडयास्नी म्हणाला. “चला रं समदी जाधवाच्या मळयाकडं..एक डाव बगून तर येवूया.” तशी समदी बिचकली.अन आपापसात कुजबुजू लागली. “अरं तिकडं कशाला भर ऊनाच जायाचं. ती तमासगीर सुंदरी थोरल्या मालका पासनं गाबण रायली व्हती तवा त्याच हिरीत जीव दिला नव्ह. अरं अजूनबी दिसतीया ती अधन मधन.कोन काळ कुत्रबी भटकणार नाय तिथं. अन आता तिकड जायाचं.....” “अरं एवढी समदी असताना तुलाच एकटयाला धरतीया काय.चल गप गुमान.” समदी जवा हिरीजवळ आली तवा एकच बोंब ठोकली. हिरीच्या पाण्यावर जालिंदर उताना पडला व्हता. काळीज घट्ट करत जालिंदरला बाहेर काढला. मळ्यावर नेला तवर थोरलं मालक आलं. तेंची तर वाचाच बसली. कडूसं पडलं तसं हळूहळू जालिंदरला सुद याया लागली. थोरलं मालक जवळ जाऊन बसलं. तसं जालिंदरनं तेंचा हात पकडला.अन.. अन गुणगुणू लागला. “कवळं हाय पान रंगलया छान घातली चुना सुपारी नी कात गं रायानं धरला माजा हात” थोरल्या मालकाची दातखीळ बसली अन त्यो तिथचं पडला. Read more....

खोताची विहीर–अक्षय

आज विहिरीचा शेवटचा भाग..काय मग कशी वाटली आमची खोताची विहीर..जरूर कळवा.... खोताची विहीर – अक्षय वाटवे भाग ३ रा आणि शेवटचा.. खोतांची गाडी वेशीबाहेर आली..तिन्हीसांजेची वेळ झाली..सुनंदा...खोतांची सून...मागच्या सीटवर शांत पडून होती मधेच एखाद्या खड्ड्यात गाडी गेली किंवा दगड लागला तर त्या धक्क्याने तिच्या पोटात असंख्य सुया टोचाव्यात तशा वेदना होत..ती किंचाळे आणि काही वेळात शांत होई. सदा खुर्चीतून उठला चार पावलं पुढे झाला..त्याच्या अपेक्षेप्रमाणे एव्हाना सुनेला घेऊन खोत यायला हवे होते. ती मंडळी एकदा इथे पोचली की परिस्थिती त्याच्या ताब्यात असणार मग पुढे सारं काही त्याच्या आदेशानुसार चालणार. पण त्यासाठी सारं त्याच्या नियोजना प्रमाणे व्हायला हवं. आणि तेच नेमकं झालं नाही..सूर्य मावळतिकडे झुकत चालला होता.. समोर आलेल्या बैलाला चुकवण्याच्या नादान बंडूचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याच वेगाने गाडी धाडकन रस्त्याच्या डाव्या अंगाला आंब्याच्या झाडाला आदळली.. बंडूचं डोकं स्टीअरिंग व्हील वर आदळलं आणि तो बेशुद्ध पडला.. दरवाजा तुटून खोत बाहेर फेकले गेले होते. सूनही गाडीतच अडकली... खोत धडपडत गाडीच्या दिशेने सरकले. एवढ्यात कडाड आवाज करीत आंब्याच्या झाडाची एक फांदी खोतांच्या समोर कोसळली.. खोतानी समोर पाहिलं तर सदाच्या घरी पोचण्यासाठी अजून बराच रस्ता बाकी होता. एक उतार, त्यानंतर गावा बाहेरच्या बसस्टॉपचं वळण आणि मग डोंगराच्या पायथ्याशी जायची पायवाट... खोतांना काय करावं सुचेना. गाडीत सून गुरासारखी ओरडत होती. चांगलच अंधारून आलं होतं. कसलासा विचार करत खोत उठले आणि ‘सदा.. ए सदा.. सदा.. वाचव रे धाव’ म्हणत डोंगराच्या दिशेने धावायला लागले..पण..पाउल जागचे हलेना. खोतांची भीतीने पार तंतरली.. “घाबरू नका खोतांनू तुम्हाला काय नाय करणार मी..” आवाज कुठून येतो म्हणून पाहायला खोतांनी मान वळवली तर पाठीमागे भसकन तोच चेहरा समोर आला.. कालचा त्या विहिरीतून बाहेर पडलेल्या बाईचा.. “खोतानू, घाबरलास..?” खोत बसल्या जागी मागे मागे सरकू लागले..भितीने त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.. काळोख वाढत चालला.. “क..कोण तू?... काय हवाय तुला?.. मला.. माझ्या मुलाला.. सुनेला.. सोड..” खोत चाचरत बोलत होते. “मी जानकी..सावत्याची बायल, काय आठवला? ही नावा ही माणसा लक्षात आहेत? का विसरलास... काय रे खोता?” जानकी, सावत्या ही नावं ऐकल्या बरोबर खोताच्या नजरे समोरून २५ वर्षांपूर्वीचा इतिहास गेला.. रोजंदारीवर काम करणारा सावत्या त्या दिवशी खोतांच्या बागेत आला. जानकीला खोतांनी पहिली मात्र आणि खोतांची बुद्धी चळली. काहीही करून जानकी मिळवायची म्हणून खोतांनी जंगजंग पछाडलं.. पण जानकी काही हाताला लागली नाही. खोतांना स्वस्थ बसवेना, अन्न पाणी गोड लागेना. शेवटी जानकीला या ना त्या मार्गे मिळवायची म्हणून कुटील डाव टाकून सावत्याला आपल्या जाळ्यात ओढला होता..कर्जाच्या खोट्या प्रकरणात गुंतवला होता. हे सारं कुकर्म असं फिरून आपल्या समोर उभ राहील असं स्वप्नातही खोतला वाटलं नव्हतं.. आत्ता यावेळी या सगळ्यातून खोताची सुटका एकच व्यक्ती करू शकत होती ती म्हणजे सदा.. पण तोही त्याच्या झोपडीत होता. जानकी बोलायला लागली “खोतानू इथली कर्म इथेच निस्तरायला लागतात. कर्जाच्या वसुलीसाठी तू मला आणि सावत्याला वेठीला धरलास मोलकरीण म्हणून मला वाड्यावर राब राब राबलास आणि त्या दिवशी वाहिनीसाहेब जेव्हा बाळंतपणाला माहेरी गेल्या त्याच्या तिसऱ्या दिवशी डाव टाकलास..माझ्या अंगावर हात टाकलास. सावत्याला सकाळी तालुक्याला पाठवलास..हीच तिन्हीसांजेची वेळ ना ती खोता? आठव....शेवटी माझा नाईलाज झाला आणि तुझ्याच वाड्याच्या अंगणातल्या विहिरीत मी उडी मारली..पण मरतानाही एकच विचार होता डोक्यात माझ्या...” बापू खोत नखशिखांत थरथर कापन घामाने चिंब भिजला होता. त्याला २५ वर्षांपूर्वी संद्याकाळी वाड्यात घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा आठवला.. “खोता..मी आता मरेन पण मेले तरी तुझा माग सोडणार नाही..” विहिरीच्या कठड्यावर उभे राहून उच्चारलेले ते जानकीचे शेवटचे शब्द आजही उकळत्या तेला सारखे खोताच्या कानात शिरले... “खोता २५ वर्ष मी वाट पहात होते रे माझा आवाज कोणीतरी ऐकण्याची आणि तो तुझा सुनेने ऐकला तिचं आणि माझं वैर काहीच नाही..तिने बघितलंन मला पण ती ओळखू नाही शकली निष्पाप पोर बिचारी घाबरली..पण खोता तिच्याच मुळे माझा बाहेर यायचा मार्ग मोकळा झाला..तू त्या वेळी परस्पर माझ्या प्रेताचा निकाल लावलास.. पण आत्म्याचं काय.. तो आहेच रे अजून घुटमळत..” खोतांची वाट पहात अंगणात उभ्या असलेया सदा मनातून सावध होता.. खोत येण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हटल्यावर तो तळघरात आला. काळी कापडी बाहुली तोंडावर उलटी पडलेली दिसत होती तिच्या तोंडातून रक्ताची धार लागून रक्त सुकलं होतं. काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झालेला सदा केव्हाच गावाच्या दिशेने निघाला होता. “जानकी माझी चूक झाली..मला एक डाव माफ..कर..” खोताच्या तोंडातून कसे बसे शब्द फुटत होते.. “माफ !!!” जानकी प्रचंड भयंकर हसायला लागली आणि अचानक खोताच्या सभोवताली जाळ पेटला.. “तू मरणार खोता तू मरणार.. तुला माफी नाही” गाडीत बेशुद्ध पडलेल्या खोताच्या मुलाला शुद्ध आली. तो धपडून बाहेर पडला. पाहतो तर पुढच्या सीट वर आपटून खाली पडलेल्या सुनंदाच्या तोंडातून रक्ताची धार लागली होती. त्याने कसेबसे तिला बाहेर काढले आणि जमिनीवर झोपवून तो बापूंना पाहू लागला.. तर त्याला समोर दिसणार दृश्य अतिशय भयंकर होतं. आगीच्या ज्वाळानी बापू खोताला आपल्या कवेत घेतलं होतं.. कानांना सहन होणार नाही एवढ्या कर्कश आवाजात बापू खोत किंचाळत होता. हे भयंकर दृश्य पाहिल्यावर बंडू बापूंच्या दिशेने धावला मात्र त्याच वेळी मागून तिथे पोचलेल्या सदाने त्याला थांबवले. “थांब बंडू.. बापूंच्या कुकर्माची हीच शिक्षा..” “सदा सदा अरे तू तरी वाचव त्यांना..” “बंडू ही नियती आहे..हा प्रकारातून तुमची मुक्तता करण्याची जबाबदारी माझी होती.. ती मी पार पाडली. हे असं व्हायला नको होतं हे खरं..पण अपराध हा अपराधच त्याला शिक्षा होणारच आज ना उद्या.. इथे नाहीतर तिथे..चल.” सुनंदाला उचलून घेऊन दोघेही वाड्याच्या दिशेने निघाले..खोताची जळून राख झाली... काही काळाने बंडू गाव सोडून निघून गेला... खोताच वाडा पडला. सदा घाडी म्हतारा होऊन मेला. पण खोताची विहीर अजूनही आहे.. Read more....

खोताची विहीर–अक्षय

चित्तथरारक - करमणूक...बुकहंगामा कुठल्याही अंधश्रद्धेचा पुरस्कार करीत नाही. खोताची विहीर – अक्षय वाटवे भाग – २ टळटळीत दुपार...सूर्य डोक्यावर आग ओकत होता.. घामाने न्हाऊन निघालेला सदा गावाच्या वेशीवर पोचला होता. उन्हाने अंगाची लाही लाही होते म्हणून हाता-पायावर पाणी घ्यावं.. तोंडावर पाण्याचा हबका मारावा आणि काहिली शांत करावी, असा विचार करत सदा वेशी जवळच्या सार्वजनिक विहिरीवर गेला...दोरीला कळशी अडकवून त्याने विहिरीत सोडली. भर दुपारच्या निरव शांततेत खडखड आवाज करत रहाटावरून कळशी विहिरीत पोचली. सदा ह्या साऱ्या कृती यांत्रिक पणे करत होता...शरीराची कृती आणि मनातील विचार यांचा संबंध तुटला होता जणू..तो मनातल्या मनात काल रात्री खोतांच्या वाड्यात विहिरीतून बाहेर आलेल्या त्या बाईचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होता. बुड... बुडबुड.. बुड... कळशी भरल्याचा आवाज त्या खोल विहिरीत घुमला आणि सदा भानावर आला त्याने झपाझप दोरी ओढून कळशी वर काढली...सदा कळशी फासातून सोडवून घेणार एवढ्यात अचानक भर दुपारी अंधारून आलं..तिन्हीसांजेची वेळ असावी त्याप्रमाणे काळोख पसरायला लागला..वाऱ्याची झुळूक तर नाहीच पण हवा कोंडली...अचानक सदाच्या हातातून कळशी सुटली आणि ती खाली पडण्या ऐवाजी हवेतल्या हवेत तरंगायला लागली..सदा स्वतः मंत्र-तंत्र विद्या जाणत असून सुद्धा काही क्षण भांबावला...सदा सावध होणार तोच कळशी धाड्कन जमिनीवर पडून फुटली आणि तिच्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. भीतीने सदाचा श्वास कोंडला...सदा आपलं धोपटं शोधत होता..फुटक्या कळशीतून वाहणाऱ्या रक्ताने आता आकार घ्याला सुरवात केली होती आणि तो आकार हळूहळू सदाच्या दिशेने सरकत होता..आणि सदा मागे सरकत होता.. अचानक सदा धडपडून पडला.. त्याचा पाय पाणी काढायच्या दोरीच्या फासात अडकला. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच सरसर दोर खेचला गेला आणि सदा उलटा विहिरीत लटकला... विहीर लालसर-पिवळ्या धुरकट प्रकाशाने भरून गेली होती.. आणि धुपाचा उग्र वास सुटला... सदाची मती गुंग झाली. अचानक त्या लालसर-पिवळ्या प्रकाशातून एक चेहरा तयार झाला.. त्याच बाईचा जी काल रात्री सदाला विहिरीतून बाहेर पडताना दिसली होती. “सदा, खोतांच्या वाड्याच्या विषयात मध्ये पडू नकोस...तुझं माझं काही वैर नाही..” मंजुळ आवाज सदाच्या कानाजवळ तो चेहरा किणकिणला. एव्हाना संपूर्ण परिस्थितीचा नीट आडाखा बांधून सदाने मनातल्या मनात त्याच्या गुरूने शिकवलेल्या प्रतीसंहार शक्तीमंत्रांचा जप सुरु केला होता. स्वतःच्या मनावर नीट ताबा मिळवला होता. “ए सदा, तुला तुझा जीव हवा ना रे... का मरायचंय फुक्कट..?” डोळ्यांच्या खोबण्यातली फक्त पांढरी बुब्बुळं फिरवत तो ओठ नसलेला चेहरा बोलला..आता आवाज मात्र अतिशय कर्कश होता. “तू समोर ये मग बोलू.. असले भ्रम घालू नको. खोट्या पाशात मला फसवायचा प्रयत्न करू नको. सूर्यावर काळी छाया पसरवून तू तुझा अमल निर्माण करू शकत नाहीस. वास्तव आणि सूर्य कोणी लपवू शकत नाही. आणि जेव्हा सूर्य तळपतो तेव्हा काळ्या शक्तींना पाताळाचा तळच गाठावा लागतो. याद राख..” असे प्रचंड शंखनाद व्हावा तसे सदाच्या तोंडून शब्द फुटत होते. हे उद्गार पूर्ण होत असतानाच सदाने एका हाताने त्याच्या गळ्यातला दोरा खेचून काढला होता. आणि त्यातील चांदीचा तावीत उजव्या हाताच्या चिमटीने फोडून त्यातली अभिमंत्रित रक्षा आसमंतात भिरकावली होती.. त्याच वेळी त्याचा प्रतीसंहारक शक्ती मंत्राचा जपही पूर्ण केला होता.. या साऱ्या कृती एका श्वासाचा अंतरात झाल्या. आसमंतात भिरकावलेल्या त्या तावितामधून बाहेर पडलेल्या रक्षेचा प्रचंड मोठा स्फोट झाला. पाठोपाठ त्यातून अतिशय तेजस्वी लोळ निघाला त्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला आणि सदा सुद्धा विहिरीतून बाहेर फेकला गेला. विहिरीतला लालसर-पिवळा प्रकाश क्षीण झाला... धुपाचा उग्र दर्प नाहीसा झाला. “सदा तुझा सामना एका बाईशी आहे लक्षात ठेव.. आणि तुझ्या खोतालाही सांग..त्याची सुटका नाही..” सदा हसला.. “बाई आणि तू...तू ना धड जिवंत ना मृत..ना बाई ना पुरुष...आणि हो, खोताची सुटका होईल नं होईल पण एक मात्र नक्की तुझी सुटका पक्की होणार..तुझ्या सारख्यांना कसं मार्गी लावायचं ते नीटच ठावूक आहे मला.” तापल्या तेलात मोहोरी पडून जसा तडतडाट व्हावा तसा तडतडाट त्या विहिरी मधून झाला. “सदा तू आज वाचलास कारण माझ्यावर मर्यादा आहे. दिवसाची, जागेची, शक्तीची.. पण खोतांची सून मला बळ देते आहे.. अजून काहीच दिवस.. आणि त्या नंतर... पण मी तुला सावध करण्यासाठी इथे आले तर तुझी बुद्धी ठीकाण्यावर नाही..म्हतारा खोत तर मरणारच पण तुही हकनाक जीव घालवणार स्वतःचा... अजूनही वेळ गेलेली नाही. तू सरळ मार्गी म्हणून तुला शेवटचं सांगते..यातून बाहेर पड. खोतला त्याचं मरण मरूदे..” “तू बाहेर पड ” शेवटचं वाक्य काही वेळ घुमत राहिलं आणि नंतर तो कर्कश आवाज विरून गेला. पाठोपाठ धुपाचा उग्र दर्प आणि लालसर-पिवळा प्रकाशही.. “सदा.. सदा काय झालं... पडलास सा.. लागलं तर नाय ना..?” आजूबाजूला जमलेले बघे सदाला एका मागोमाग एक प्रश्न विचारत होते.. एवढ्यात एकाने विहिरीवरची कळशी आणली आणि सदाच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले.. सदाने नकळत ओंजळ पुढे केली..पाण्याची चव विचित्र होती...सदाने चमकून विहिरीच्या दिशेने पाहिलं विहिरीच्या कठड्यावर ‘ती’ बसलेली होती. सदाला कसलाच उलगडा होईना.. लोकांच्या प्रश्नांना कशीबशी उत्तरं देत सदा तिथून निसटला.. आणि खोपटात पोचला...बाहेरून खोपटं दिसलं तरी सदाचं घर आतून नीट नेटकं होतं.. सदाने नेहमी प्रमाणे आत आल्या आल्या धुनी पेटवली..आणि खोपटाचा दरवाजा सरकवला आणि पलीकडच्या कोनाड्यातली एक छोटीशी कळ दाबली.. त्या बरोबर दरवाजा समोरच्या फारश्या सरकल्या आणि तळघराच्या पायऱ्या दिसू लागल्या.. सदा खाली उतरला.. खाली प्रशस्त हॉल, स्नानगृह एका कोपऱ्यात पलंग आणि पलीकडे सदाची वंशपरंपरागत चालत आलेली साधनेची खोली होती. सदाने तडक जाऊन स्नान केले आणि शुचिर्भूत होऊन तो साधनेच्या खोलीत ध्यानाला बसला. सदाच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याची उत्तर त्याला आत्ता त्याच्या गुरूंकडून मिळवीत अशी अपेक्षा होती. त्यावरच त्याची आज रात्री साठीची प्रतिकाराची आणि गरज पडल्यास प्रहराची योजना ठरणार होती. जमिनीवर अंथरलेल्या दर्भासनावर वीरमांडी घालून ध्यानाला बसलेल्या सदाचं शरीर जणू काळ्या दगडातली कोरीव मूर्ती भासत होतं.. दंडाचे आणि छातीचे स्नायू तटतटून फुगले होते.. प्रत्येक श्वासा सोबत नाकपुड्या फुलत होत्या.. कपाळा वरची शीर उडत होती. हळूहळू साचू लागलेल्या घामामुळे त्याचा सावळा रंग शेजारी पेटवून ठेवलेल्या समईच्या प्रकाशात चमकत होता. - भिंतीवरच्या लंबकाच्या घड्याळात चारचे ठोके पडले.. कपाटा शेजारच्या टेबलावर बिड्यांच्या थोटकांचा खच पडला होता.. खोलीत जळलेल्या तंबाखूचा उग्र दर्प भरून राहिला होता. बापू खोत हात पाठीशी बांधून येरझऱ्या घालत होते. एवढ्यात बंडू, बापूंचा मुलगा धावत वर आला. “बापू..बापू सुनंदा” “काय.. काय झाला तीस?” “तिच्या पोटात कळा मारतायत तोंडातून फेस येतोय.. कसासाच करतीये... डोळे फिरवतीये.. तुम्ही या बघू खाली..” बंडू भीतीने घामाघूम होऊन धापा टाकत होता. सुनेचं तोंड फेसाने भरलं होतं, हात पाय थरथरत होते. डोळे पांढरे पडले होते. एकूणच ते चित्र पाहून बापूही घाबरले. त्यांनी बंडूला गाडी काढायला सांगितली. घरातल्या मोलकरणीच्या मदतीने बंडूने सुनंदाला गाडीत घातले. आणि प्रश्नार्थक नजरेने बापूंकडे पाहू लागला. “सदाकडे चल. हे डॉक्टरच्या आवाक्यातलं काम नाय” वाड्या पलीकडच्या पिंपळाला वळसा घालून बागे शेजारच्या कच्या रस्त्याने गाडी वेशीच्या दिशेने निघाली. गाडीच्या पाठोपाठ थोड्या अंतरावरून गाडीच्याच वेगाने एक बाई चालली होती. इकडे सदाने तळघरात केलेली मांडामांड बदलायला सुरवात केली. काळ्या कापडी बाहुलीच्या पोटाला टोचलेली सुई त्याने थोडी सैल केली आणि त्या बाहुलीच्या कपाळाला अभिमंत्रित विभूती फसली. अंगभर उपरणी पांघरून सदा संथ चालीने तळघरातून वर आला. गाडीत खोतांच्या सुनेला बराच आराम पडला पण गाडीच्या धक्क्या बरोबर पोटात कळ उठत होती. बापू खोतांनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. सदा आपल्या खोपटाच्या अंगणात आरामखुर्ची टाकून खोतांची आणि खोतांबरोबर ‘ती’ ची सुद्धा वाट पहात बसला होता. आजचा डाव सदाच्या मैदानात रंगणार होता.. (क्रमशः) Read more....

खोतांची विहीर–अक्षय

खूप दिवसांनी अक्षय पुन्हा एकदा त्याची भयकथा घेऊन आला आहे..जबरदस्त आहे...ह्यात शंका नाही... खोतांची विहीर–अक्षय वाटवे बागेत पाटातल्या पाण्याच्या एकसंथ आवाज घुमत होता.. पाठोपाठ पाण्यात शिरलेली पावलं सपाक-सपाक आवाज करत चालू लागली. प्रत्येक पावला गणिक पाटात पडणारं चंद्रकोरीचं प्रतिबिंब शहारून निघत होतं.. पावलं पाटातून पलीकडे सरकली आणि बागेच्या वरच्या अंगाला लागली. ‘ही बाग काढली का पलीकडे खोतांचा वाडा... सरळ जाऊन एक वळसा घातला की पिंपळ आणि पिंपळाच्या पलीकडे वाडयाचा दिंडी दरवाजा. माडीवरच्या कोपऱ्यातल्या खोतांच्या खोलीतल्या कंदिलाचा मिणमिणता उजेड दिसतोय. ही काय वाड्याभोवती असलेल्या चिरेबंदी कुंपणाची रेषा दिसायला लागलीच की.. का निरोप धाडला असेल खोतांनी..?’ सुमारे एक तास मेंदू हाच विचार करीत होता...करकर वहाण वाजवत चालणाऱ्या पावलांचा वेग वाढला. बागेतून बाहेर पडून चढणी चढून वर येणार एवढ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने पायवाटेवरची लाल माती आणि पतेरा हवेत उडवला छोटंस वादळच जणू... त्याच्या दृष्टीने ही सामान्य गोष्ट नव्हती. पण अजूनही घाबरायची वेळ आली नव्हती हेही तितकच खरं होतं...पण सदाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने या पूर्वी अशी कित्येक वादळं लीलया पचवली. पण आज खोतांच्या घरून बोलावणं यावं याचं जरा त्याला अप्रूप वाटलं. रानातल्या कोल्ह्यांची कर्कश कोल्हेकुई जीवाचा थरकाप उडवून देत होती.. थंडीने दातखिळी बसायची वेळ आली होती. ह्याच्या हातातली चूड विझत आली होती. पिंपळ दिसायला लागला आणि हा अधिक वेगाने पुढे निघाला. एवढ्यात पिंपळाच्या पाराजवळ काहीतरी सळसळं.. काळोखात काही निट दिसत नव्हतं म्हणून डोळे चोळूत थोडा पुढे सरकणार एवढ्यात.. “सदा.. ए सदा..” अशी हाक एकू आली सदाची बोबडीच वळली.. “इथे इथे.. पिंपळाकडे ये..” आता मात्र.. सदा.. नाही म्हटलं तरी जरा घाबरलाच कारण, काहीच तयारी नसताना असा थेट कोणाशी सामना करायचा म्हणजे... पण तरीही त्याने भीत भीत विचारलंच “क... कोण.. ??” “मी रे.... बापू” असं म्हणत खसकन कडी पेटवून स्वतःच्या चेहऱ्या समोर धरून आपली ओळख पटवून देत खोत म्हणाले.. “मी बापू खोत” काड्यापेटीच्या काडीच्या पिवळ्या धमक प्रकाशात बापूंचा लालबुंद चेहरा अधिकच भयाण दिसत होता. त्यांनी त्याच काडीने बिडी शिलगावली आणि सदाला म्हणाले. “चल गपचीप मागच्या दारान आत चल..” सदा.. सदानंद घाडी आणि सोमनाथ उर्फ बापू खोत वाड्यात शिरले. सदा घाडी हा दशक्रोशी मधील विद्वान.. अगदी प्रकांड पंडित पण तो सहसा कोणाला दिवसा बाहेर दिसत नसे कारण त्याचं पांडित्य अघोरी विद्येतलं. आणि म्हणूनच त्याच्या विषयी गावात सर्वांच्याच मनात अढी पण सदा तसा सरळ मार्गी कोणाच्या अध्यात न मध्यात. गावात कोणाची अडीअडचण असेल तर बिबूत मंत्रून द्यायचा.. गंडा-दोरा द्यायचा... कोंबड.. बकर मारायला लावायचा आणि सारखं आपलं गावा बाहेरच्या त्याच्या खोपटात काहीतरी मंत्र पुटपुटत कसलं तरी हवन करत रहायचा.. सोमनाथ उर्फ बापू खोत ही गावातील अजबच वल्ली.... शिडशिडीत अंगकाठी, तांबूस गोरा रंग, घारे डोळे, उभट तरतरीत नाक, अंगात मलमलचा सादरा, दुटांगी धोतर, डोक्यावर काळी टोपी, ओठांवर मिशीची रेष, नजर शोधक, स्वभाव संशयी, वृत्ती अस्थिर, विचार करण्याची पद्धत अतिशय बेरकी आणि कावेबाज आपला स्वार्थ साधण्यासाठी अगदी कोणत्याही स्तराला जायची तयारी. पण जे करायचं त्याची कानोकान खबर लागू द्यायची नाही. खोतांचा पिढीजात नारळ, कात, सुपारी, कोकम आणि इतर काही नगदी मालाचा व्यापार होता. “तर सदा, हे सगळं असं आहे. कळलं..अजून फारफार तर तास भर मग प्रत्यक्ष दिसेल तुला... काल मी कधी बेशुद्ध पडलो आणि कधी सकाळी जाग आली काही कळलं नाही पण ती आली एवढं आठवतंय ” खोतांनी नाकाच्या शेंड्यावर आणि कपाळावर जमलेला घाम उपरण्याने पुसला. पलंगाच्या खाली जमिनीवर बिड्यांच्या थोटकांचा खच पडला होता. सदाला वाड्यावर येऊन सुमारे दीड तास उलटून गेला होता. बापूंनी नवीन बंडल सोडवून बिडी शिलगावली.. जोरकस झुरका घेऊन धूर छातीत भरून घेतला. त्यांचा चेहरा घामाने डबडबला. हात थरथरत होते. भिंतीवरच्या जुन्या लंबकाच्या घडयाळाने तीनचे ठोके दिले आणि वेळेच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. पहिल्या ठोक्या सरशी सदा दचकून उठला त्याच्या मणक्यातून एक थंड शिरशिरी निघून गेली. हे प्रकरण भलतच जड जाणार आपल्याला.. याची पक्की खुणगाठ सदाने मनाशी बांधली. पण तो ही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. “चल..” बापूंच्या आवाजाने सदाची तंद्री भंगली. ते दोघे खोलीच्या खिडकी पाशी आले. खोतांच्या वाड्याची रचना तशी सोपी होती. दिंडीदरवाजातून आत आल्यावर मध्ये अंगण अंगणात डाव्या कोपऱ्यात विहीर उजव्या बाजूल समोर तुळशी वृंदावन. आणि तीन बाजूनी १६ खोल्यांचा वाडा. वर माडी, माडीवर चार मोठ्या खोल्या आणि तळघर. साडेतीनचा सुमार...आणि विहिरीजवळ काहीतरी चमकायला लागलं.. खोतांनी सदाला सावध केलं. अचानक हवेत धुपाचा वास पसरला...सदाला परिस्थितीची जाणीव होताच त्याने पटकन आपल्या खांद्यावरच्या धोपटयातून कसलीशी मुळी काढली आणि दाढेखाली दाबली. तिचा कडवट रस सदाच्या जिभेवर पसरला आणि त्याची नजर बदलली. डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या.. सदाच्या चेहऱ्यावर तेज पसरू लागलं.. धुपाचा वास नाहीसा झाला. खोत नखशिखांत थरथरत होते. त्यांनी सदाचा हात घट्ट पकडला. दोघांची नजर विहिरीवर खिळली. घड्याळाने साडेतीनचा टोला दिला. विहिरीच्या कठड्यावर लालसर.. पिवळा धुरकट प्रकाश दिसायला लागला. विहिरीतून पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आवाज यायला लागला.. आणि अचानक विहीर काठोकाठ भरून ओतायला लागली. त्या पाण्याचा लोट हळूहळू अंगणभर पसरायला लागला.. विहिरीतून येणारा प्रकाश वाढला... सदाची नजर त्या पाण्यावर स्थिरावली.. “जे मला दिसतंय तेच तुलाही दिसतंय काय रे सदा..?” फुललेल्या श्वासावर ताबा मिळवत कुजबुजत्या स्वरात खोतांनी सदाला विचारलं... “काय दिसतंय तुम्हाला बापू?” “ते.... ते पाणी... लाल रंगाचं...” “रक्त आहे ते बापू.. निट बघा..” “काssय?” आतामात्र बापूंची बोबडी वळायची बाकी होती. “म्हणजे काल मला जे वाटलं ते खरं तर..” बापू कसे बसे स्वतःवर ताबा मिळवत होते. आता मात्र हवेत एक विचित्र कुबट वास पसरला होता.. अंगणात पसरलेलं रक्त साकळू लागलं होतं आणि त्याला काळसर झाक यायला लागली. एवढ्यात त्या विहिरी मधून एक बाई बाहेर आली.. “सदा... सदा.. सss दा... ती बघ हिच ती.. हिच मी मी तुला सांगितलं नव्हतं..” बापू अक्षरशः लटलट कापत होते.. श्वास लागला होता. सदाने दाताखालची मुळी पुन्हा एकदा निट दाढेखाली रगडली.. विहिरीतून बाहेर आलेली ती बाई थेट तुळशी वृंदावना जवळ पोचली. आणि एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. “ये.. गं... ये.. मी आलेय तुला न्यायला...ये..” असं म्हणत विहिरीतून बाहेर पडलेली ती बाई पुढे सरकली.. आणि पलीकडे खोलीतून बापू खोताची मोठी सून बाहेर पडली. हे दृश्य वरून खिडकीतून खोतांनी पाहिलं आणि ते चक्कर येऊन कोसळले. ती बाई विहिरीच्या दिशेने सरकत होती आणि खोतांची थोरली सुनबाई तिच्या मागे निघाली होती. सदा विस्फारलेल्या नजरेने हे सगळं पहात होता.. त्याच्या शेजारी खोत असाव्यास्त पडले होते. सकाळचे दहा वाजले होते. डोळे चोळत खोत उठले. पलंगाच्या कडेला टेकून सदा त्यांच्या पायाशी बसला होता. पहाटेचा सर्व प्रकार पाहिल्यावर सदाची झोप उडाली होती पण नंतर कधीतरी त्याचे डोळे पेंगुळले.. सदाला पाहून खोत धडपडून उठले ते काही बोलणार एवढ्यात.. “मामंजी चहा आणलाय..” असं म्हणून खोतांची मोठी सून दरवाजात उभी राहिली. सदाने मागे वळून दरवाजा कडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला.. दहा दिवसांपूर्वी बाजाराच्या दिवशी शेवटची पाहिलेली प्रसन्न चेहऱ्याची, हसतमुख अशी खोतांची मोठी सून सदाला आठवली. हीच का ती? असा प्रश्न पडावा एवढा बदल खोतांच्या सुनेमध्ये झाला होता. चेहरा निस्तेज, डोळे अर्ध मिटलेले. गालफड सुकून बसल्या सारखी. ओठ पांढरे फटक पडलेले. मानेची हाडं वर आलेली. रंग सुद्धा पांढरा पडत चालला होता. सुनबाई आत येऊन चहा ठेऊन निघून गेल्या. खोलीत काल रात्रीसारखा धुपाचा वास तरळला.. “मी काय करू सांग सदा.. आहे हे असं आहे... यातून फक्त तूच आमची सुटका करू शकतोस..” बापू केविलवाण्या नजरेने सदाकडे पहात बोलले. घड्याळात अकराचे ठोके पडले. सदाला घर सोडून बारा तास उलटून गेले होते. तो उठला. खोत आशेने त्याच्याकडे पहात होते. “सुटका कठीण आहे.. पण...” “पण.. पण काय?” खोतांच्या आशा पल्लवित झाल्या.. “पण अशक्य नाही..” काहीसा विचार करत सदा बोलला. “उद्या रात्री येतो..” निरोप घेऊन सदा निघून गेला. बापू खोत सावकाश उठून खिडकी पाशी आले. दिंडी दरवाजातून बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या सदाकडे त्यांनी पहिले. पाठोपाठ त्यांची नजर विहिरीकडे वळली. विहिरीच्या आजूबाजूला कोवळ्या लुसलुशीत गवतावर सूर्याची किरणे चमकत होती. उद्याची संध्याकाळ आपलं अस्तित्व पणाला लावणारी ठरणार या एकाच विचाराचं थैमान मेंदूत घेऊन, करकर वहाणा वाजवत बागेच्या रस्त्याने सदा आपल्या खोपटाच्या दिशेने रवाना झाला. उद्या संध्याकाळी पुन्हा खोतांच्या वाड्यावर येण्यासाठी. - Read more....

अकल्पित - Chandrakant Bhosle

आजची भयकथा प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांची आहे...मस्त आहे...वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी आहे.. विक्रम अकल्पित- चंद्रकांत भोसले ........ तर येस्तेर, एलिएट मिशनच्या शाळेत सायंसची शिक्षिका म्हणून रुजू झाली. तेंव्हा, घर शोधत फिर फिर फिरली. खुप फिरून फिरून तिला हे घर मिळालं. घर म्हणजे तरी काय चार खणी माळवदाचं दोन खोल्यांचं घर. घराच्या छतावर मुलुकभर गवत उगवलेलं. आलिकडे पलिकडे पडकी दोन घरे. आसपास पांढ-या मातीचे ढिगारे. घर पिला आजिनं उघडलं तेंव्हा, खंडीभर जंगली पाखरं मुक्कामाला घरात. फडाफडा उडाले. छताला लटकलेल्या वटवाघळी मात्र तशाच होत्या. पाखरांच्या पिसांनी, खादद्याच्या उस्टावळीने आणि विष्ठेने घरात रवखाळ झालेलं. एक अवजड कबरेबांडे चपळ मांजर चिरचिर आवाज करीत खिडकीतुन उडी मारून पसार झालं.. जातांना ते चिरकत चिरकत एस्तेरच्या हाताला चांगलच ओरखडून गेलं.. घरात त्या जंगली पाखरांच्या अस्तित्वाने उग्र दर्प कोंडलेला. तिला मनात वाटलं, ‘‘काय हे घर. नकोच असलं घर. यापेक्षा जनावरांचा गोठा तरी बरा. कुठे म्हसणखाईत येवून पडलो आपण...! हे मिशनरी लोक खेड्या-पाडयातल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी कुठेही शाळा सुरु करतात. त्याचे वाईट परिणाम आपल्या सारख्या महिला शिक्षिकान्ना सोसावे लागतात. एवढी मोठी ही शाळा... सेंट वेरुनिका कोंन्व्हेंट स्कुल. केवढे मोठे आणि भारदस्त नाव. सर्व सुविधांयुक्त वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी होस्टेल, खेळाच्या सर्व सुविधा. प्रचंड मोठी सायंस प्रयोगशाळा, समुद्रासारखे वाचनालय, अतिशय स्वच्छ आणि रुचकर मेस. पण माझ्यासाठी रहायला तिथे क्वार्टर नाही...! बाहेर तर घर म्हणजे भुतखाणे. जणू सैतानांचे ठाणे. कसं रहायचं या अनोळखी गावात...? आपल्या चिमुरड्या, गोंडस लेकराला घेवून...!.’’ पण तिचा नाईलाज होता. अशा दुर्गम खेड्यात चांगली घरे तरी कुठे मिळणार...? प्रभु येशु, आपला मेंढ़पाळ आहे. सतत आपल्या सोबत आहे. तो आपल्याला वाईटापासून सोडवितो. तो आपल्याला सुंदर कुरणापाशी नेतो. तो आपल्याला कोणत्याही आरिष्टापासून वाचवितो. परमेश्वराच्या सावलीत आपण सुरक्षित आहोत, परमेश्वराचे दूत नियमित आपल्या सोबत असतात. आपले संरक्षण करीत असतात.... आपल्या भोवती पहारा देत असतात.... म्हणून आपणास भीती नाही. यावर तिचा गाढ़ विश्वास होता. तशात ती दिवसाचे चोवीस तास प्रार्थनेमधे असे. नियमित त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या संपर्कात असे. तिने खुप विचार केला, आणि इथे रहाण्याचं निश्चित केलं. पिला आजीने तिला सर्व प्रकारच्या सहकार्याचचं जिव्हाळयाने आश्वासन दिलं. तिच्या दोन वर्षाच्या शाम्युवेलला सांभाळण्याचे डोळे भरून अभिवचन दिलं. घराची मालकिन पिलाआजी. मागे-पुढे कोणी नसलेली. पाच पडक्या घरांच्या वस्तित एकटीच वास्तव्याला असणारी. सावळया वर्णाची. वाढत्या वयामुळे शरीरानं काटकोनी होवू लागलेली. चेह-यावर सुरुकुत्यांचं जाळ विणलेली. हातपाय दुष्काळ पडलेल्या वावरासारखे असलेली. अम्बाडी झालेल्या केसाची. दातवान लावून लावून काळया झालेल्या दाताची. त्यातून काही दात उन्दराने कुरतडल्यावाणी. तर बाजूचे काही मांजरीच्या सुळयावाणी. उरलेले कधी काळी तोंडातून हरवून गेलेले. खालचा ओठ कोण्या जनावराने बोचकारल्याने फाटलेला. कपाळाच्या मध्यभागी कुंकवाऐवजी थोरली लिम्बाएवढी गाठ. उजव्या गालावर भाजल्याची भली मोठी खूण. आवाज रेकणा-या मांजरावाणी. पिला आजीनं मोठ्या प्रेमाने शाम्युवेलला कडेवर घेतलं. त्याच्याशी गप्पा मारू लागली. त्याला गोष्टी सांगू लागली. एस्तेर सुखावली. पिला आजीचे डोळे मांजरीच्या डोळयांप्रमाने चमकू लागले. बदली झाली तेंव्हा आपण इथे राहू शकू का...? हा मोठा प्रश्न तिला सतावत होता. कारण तिची ही पहिलीच बदली होती. लग्न होवून काय साडेतीन वर्षे झाली असतील.. नवरा मर्चंट नेव्ही मधे इंजिनियर. सहा सहा महीने समुद्रावर काम करणारा.. सहा महिन्यातून एकदा, एखाद्या महिन्याच्या सुटीवर घरी येणारा. घरात त्याची मदत शून्य. बाकी सगळ तिला एकटीलाच पहावं लागायचं. आपली नोकरी. घरकाम. कोणी आलं-गेलं. शाम्युवेलला संभाळण. तिची आई सोनगावला सिसिलिया सिस्टर हावुस मधे हावुस कीपिंगचं काम करित होती. लहान भाऊ शिकत होता. वडिल मिशन स्कुल मधे पहारेकरी. म्हनुनच माहेरचं कोणीही एस्तेर सोबत येवू किंवा राहू शकत नव्हते. नव-याचे वडिल गेल्या वर्षी मृत्यु पावले. त्याची आई सेंट फिलोमिना नर्सिंग होम मधे आया. एस्तेरचे दोन लहान भावंडे तिथेच सेंट फ्रांसिस कॉन्वेंट स्कुल सात्रळला शिकत होते.. म्हणून सासरचे सुद्धा कोणी तिच्या सोबत येवू शकत नव्हते. तिला एकटीलाच तिचं काय ते ठरवावे लागे आणि करावे लागे. म्हनुनच ती सतत जबाबदारीन वागत असे. ............ २ .......... तर पिलाआजी तिला सगळ घर साफ़-सुफ़ करू लागली. घरात आढ़याला लोम्बकळणारे वटवाघुळ आजीने हातानेच उपसून काढले. जमिनीवर आपटून मारले. एस्तेरनं विचारलं तर म्हणे, ‘हे पाखरं असे आपटून मारले तर परत येत नाहित. नाहीतर फिरून येतील. लटकतील आढ़याला. रात्री पोराचे डोळे चावून चावून खातील. त्याच्या हातापायाचे बोटं, दोन्ही कान कुरुकुरु खातील.’ तेवढ्यात घरात पहुडलेला एक दांडगा काळा नाग सळासळा घरातून बाहेर निघतांना दिसला. एस्तेर ओरडून पळाली. पिला आजीन लगेच त्या नागाला एका हाताने पकडलं. बसली मटकन खाली. मांडी घालून. आपल्या तीक्ष्ण सुळया दातांनी नागाचे लचके तोडू लागली. त्याला जिवंतच खावु लागली. नागाचं ताजं रक्त तिच्या सुळया दातांच्या अग्राने टपकु लागले. तिचे डोळे मांजरीच्या डोळयांसारखे चमकू लागले. खाता खाता ती एस्तेरला म्हणाली, ‘पोरी, खातेस का तू अर्धा...! खुप दिवस झाले मला साप खावुन. आज मिळाला. किती खावु आणि किती नको, असं मला झालं आहे...!!!’ एस्तेर संशयी नजरेने पिला आजीकडे पाहू लागली. भीतीनं तिची गाळण उडाली.. तिला काहीच बोलता येईना. शाम्युवेलला घेवून ती कोप-यात बसली. तिच्या सा-या सा-या अंगाला कंप सुटला. घामाने ती डबडबुन गेली. तिला काही बोलताही येईना आणि ओरडताही येईना. पिला आजी बोलू लागली, ‘ पोरी, हे आमचं असचं असत इकडं. तुला जरा अवघडल्यावाणी होईल. पण इथं असच आहे. तुम्ही कोंबडी भाजून खाता. आम्ही कच्चीच खातो. जित्ती. इथं खायलाच काही नसतं. मिळेल ते खावा लागतं. गहू, बाजरी, ज्वारी घ्यायला पैसे कोणाकडे आहेत इथं...! आठ दिवस झाले उपाशी असल्याला, आज खातेय मी पोटाला. पोरी माणसाला भूक सगळ विसरायला लावते. भूकेपुढे कोणताच इलाज चालत नाही. साप भाजूभुजु पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे. पोटात भूक मावत नसल्यावर कशाचीच वाट पहात बसत नाही माणूस.’ पिलाआजी खाता खाता बोलत होती. तिचं सगळ तोंड रक्ताने भरलं होतं. तिच्या सुळया दातावर जमलेलं रक्त तिच्याच अंगावर टीपकत होतं. पूर्ण नाग खावुन पिलाआजीनं पदराने तोंड पुसलं. एस्तेर कड़े एकटक शिकारी कुत्र्यासारखं पहात ती उठू लागली. तेवढ्यात तिच्या पायात काहीतरी घुटमळलं. तिने जरा आपले लुगड़े उचलून पाहिलं. एक तगड़ी घूस आपला जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत होती. पिलाआजीने मांजरीच्या चपळाईने त्या घुशीला पकडले. कचाकच काकडीसारखं चावून खावु लागली. अगदी संथपणे पिला आजीने घुस खाल्ली. एस्तेरचे आता डोळेच पांढरे व्हायचे बाकी होते. तिला काय करावं काहीच समजत नव्हतं. आजीची तिला आता भयंकर भीती वाटू लागली होती. शाम्युवेलवरील तिची पकड आता कमी होत होती. ती मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करू लागली. इतक्या म्हाता-या पिलाआजीच्या दातात इतकी ताकद कुठून आली कोणाला माहीत...? एस्तेर प्रेयर करता करता अनामिक भयाने विचार करू लागली. घुशीच्या केसाळ त्वचेसह पिला आजीने घुस हडप केली. पिला आजीची भूक अशी कशी...! जणु कित्येक वर्षापासून आजी उपाशी होती. तिला काहीच खायला मिळालं नव्हतं. एस्तेरला गरगरायला लागलं. तिच डोकं अस्थिर होवू लागलं. हातपाय उचलेनासे झाले. तिचे संपूर्ण शरीर चिखलाचं झालं आहे, असं तिला वाटू लागलं. डोळे हलेनासे झाले. पापण्यांची फडफड बंद झाली. ती निर्विकारपणे पिलाआजीकडे पाहू लागली. पिलाआजी भली भदाडी घूस खावुन एस्तेरकड़े पुन्हा शिकारी कुत्र्यासारखं पाहू लागली. तेवढ्यात शाम्युवेल एस्तेरच्या हातातून निसटुन पिलाआजीकडे रांगत रांगत निघाला. एस्तेरकड़े शाम्युवेलला पकडून ठेवण्याचही त्राण राहिलं नव्हतं. ती एक मानवी पुतळा बनुन बसली होती. तिला भीतीने कशाचच भान राहिलं नव्हतं. पिला आजी संथपणे उभी राहिली. एस्तेरला म्हणाली, ‘‘ आता मला तुझ्या पोराचं कोवळ रक्त प्यायचय. खुप तहाण लागलीय. खुप दिवस झालेत. लहान पोराचं रक्त पिवून.’’ एवढ बोलून ती शाम्युवेलला आपल्याकडे येण्याचा इशारा करीत म्हणाली, ‘‘ ये इकडं माझ्या गाजरा. माझ्या कोकरा. माझ्या रक्ताच्या तांब्या, ये. मी तुझं नरड फोड़ते, माझ्या दाताने.’’ असं म्हणून ती दात इचकुन गदागदा हासली. तेंव्हा तिच्या अनकुचिदार सुळयामधून रक्त टिपकत होतं. शाम्युवेल तिच्या पायाजवळ येताच तिनं त्याला उचलून घेतलं. मोठ्या आनंदाने त्याचं नरड फोडन्यासाठी ती तिचे सुळे शाम्युवेलच्या मानेत घुसवायला लागली. त्यावेळी त्याच्या गळयात असलेल्या क्रोसची साखळी तिच्या सुळया दातांमधे अडकली. ती जिवाच्या आकांताने किंचाळत खाली बसली. दातात अडकलेली साखळी उपसू लागली. काही क्षणातच पिला आजीचा एक पांढ-या मातीचा ढिगारा झाला. शाम्युवेल त्या मातीच्या ढिगा-यावर बसून माती खेळू लागला. एस्तेरने शाम्युवेलला कडेवर घेतलं. म्हणाली, ‘परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.’’ Read more....

पौर्णिमा - Akshay Watve

चित्तथरारक --- अंगावर काटा आणणारी भयकथा ...अक्षय वाटवे...अभिनंदन...क्या बात है!! विक्रम पौर्णिमा – अक्षय वाटवे भाग ६ सोनल हळूहळू शुद्धीवर येत होती. ती भानावर आली तशी तिने आजूबाजूला पाहण्यासाठी मान वळवली आणि तिच्या डोक्यात प्रचंड वेदनेच्या मुंग्या उठल्या. हवेत एकप्रकारचा मास जळत असल्यासारखा उग्र दर्प पसरला होता. श्वास घेतानाही तिला प्रचंड त्रास होत होता. तशातच तिने हात-पाय हलवायचा प्रयत्न केला आणि तिला जाणवलं की तिचे हात-पाय करकचून बांधले आहेत. थोडं जरी हलायचा प्रयत्न केला तरी घट्ट बांधलेल्या दोऱ्या काचत होत्या. ‘आई गं ...’ सोनलने विव्हळून आक्रोश केला. डोक्यात होणाऱ्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. तिला पुन्हा भोवळ आली. तिची शुद्द हरपण्या आधी तिच्या कानावर अस्फुट शब्द पडले. ‘स्वामी सगळी तयारी पूर्ण होत आली आहे. आज अमावस्या, ठीक पंधरा दिवसांनी पोर्णिमा. साधनेच्या शेवटच्या टप्प्याची सर्व सामग्री आणली आहे. स्वामी या वेळी आम्ही नक्की यशस्वी होणार... होणार नं...’ इकडे सोनल शुद्धीवर रहाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तिने आजू बाजूला पाहिलं. दाट काळोख पसरला होता. काही क्षणात तिची नजर काळोखाला बरीचशी सरावली. तिने आपण कुठे आहोत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला काहीच लक्षात येईना. ती पूर्णपणे अनोळखी भागात होती. ते मैदान होतं.. की एक अतिशय विस्तीर्ण दालन.. तिला काहीच कळेना. तिने अतिशय कष्टाने आवाजाच्या रोखने मान फिरवली. समोरचं दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले. तिच्या डाव्या बाजूला काही अंतरावर एक महाकाय भिंत होती. त्या भिंतीवर कसल्याश्या विचित्र भयानक खुणा रेखाटल्या होत्या. एक मोठा षटकोन होता त्याच्या मध्यभागी एक चक्र. चक्र आणि षटकोन यांना जोडणारे बाण. मधल्या रिकाम्या भागात अगम्य भाषेत चितारलेल्या खाणाखुणा. सोनलने सभोवताल नजर फिरवली आणि काय काय दिसते आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. तिने जे काही पाहिलं त्याने मात्र ती अतिशय भयभीत झाली थरथर कापू लागली. त्या भिंतीवरच्या आकृती समोर एका उंचवट्यावर मानवी पुतळा असावा त्याप्रमाणे ‘तो’ मांडी घालूनबसला होता. एका बाजूने त्याच्या अंगावरची चामडी लोंबत होती आणि जुन्या जीर्ण वस्त्राने देहं झाकला होता. डोळ्यांच्या खोबण्यामध्ये मात्र हिरवट प्रकाश चमकत होता. त्याच्या समोर एक व्यक्ती पाठमोरी उभी होती. ‘चारशे वर्ष... चारशे वर्ष वाट पाहतो आहे मी.’ दूर अंतरावरून यावेत त्या प्रमाणे खोल घोगऱ्या आवाजात एक एक शब्द सोनलच्या कानावर पडत होते. सोनल लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. ‘स्वामी,ह्या वेळी विजय आपलाच होणार.’ हा आवाज पाठमोऱ्या उभ्या असलेल्या व्यक्तीचा होता. सोनलला हा आवाज ओळखीचा वाटू लागला. ती व्यक्ती उत्साही स्वरात बोलू लागली. ‘कारण बलीविधीसाठीचा बळी आपल्या ताब्यात आहे, आणि आपला प्रतिस्पर्धी आपण निर्माण केलेल्या भ्रमाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला ...’ ‘होता..’ पुन्हा तोच खोल आवाज. पण आता आवाजात प्रचंड संताप होता. ‘भ्रमाचा भोपळा फुटला आहे...’ ‘म्हणजे..? स्वामी... पण हे हे अशक्य आहे...’ ती पाठमोरी व्यक्ती व्यक्ती भेदरलेल्या स्वरात म्हणाली. राजेश मामा, हो. तोच.. तोच आहे हा.. तसाच आवाज आणि पाठमोरा पहिला तर दिसतोही तसाच. सोनलच्या पाठीतून एक थंड शिरशिरी गेली. ‘राजेश्वर, जरा आकाशात पहा... आपलं सैन्य समीप आलंय... पण मला ऐकू येतायत त्या विजयाच्या आरोळ्या नाहीत तर वेदनेच्या किंकाळ्या..’ त्या खोल आवाजातले हे शब्द हवेत विरतात नं विरतात तोच.. पाच पन्नास जखमी वाघळं त्या दोघांच्या समोर कोसळली. विचित्र आवाजात सुरु असलेल्या त्यांच्या कालकलाटाने राजेश्वर दचकून मागे सरकला... आणि तेवढ्यात शेजारी असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो चेहरा पाहिल्यावर सोनलच्या मनातला संशय पूर्ण पणे दूर झाला. हो. हा राजेश्वर म्हणजे तिचा राजेश मामाच होता. त्या वाघळां पाठोपाठ एका माणसाचं धूडही खाली कोसळलं. जमिनीवर पडल्या पडल्या ते धूड वेदनेने विव्हळलं. ही त्याच्या जिवंत असण्याची खूण पाहून राजेश्वर पुढे सरसावला. मात्र क्षणार्धात चेहरा फिरवून माघारी आला. ‘शाब्बास, किमान शत्रूचा एक मोहरा घायाळ करून त्याला ओलीस घेऊन आलात. शाब्बास माझ्या पाठ्यांनो..’ असं म्हणत हिरव्या डोळ्यांचा ‘तो’ अतिशय कष्टाने उंचवट्यावरुन खाली उतरला. ‘ईssss....शी...’ सोनल मोठ्याने किंचाळी. कारण ‘तो’ खाली उतरला तसं त्याच्या अंगावर पांघरलेलं वस्त्र खाली घरंगळलं आणि समोर दिसणारं दृश्य अतिशय किळसवाणं होतं. त्या शरीराच्या डाव्या बाजूने अंगावरच्या मासाचे गोळे जळत होते. त्यातून रक्त आणि पु वहात होता. त्याची घाण दुर्गंधी पसरली होती. चेहरा डाव्याबाजूने पूर्ण भाजला होता. गालाची हाडं दिसत होती. डोळ्याच्या जागी मात्र खोबण्या होत्या आणि त्यातून बाहेर पडणारा तो हिरवा प्रकाश... सोनलचा आवाज ऐकल्यावर त्या हिरव्या प्रकाशाला लाल छटा येऊ लागली. ते हिरवे डोळे आता सोनलवर रोखले होते. त्या प्रखर हिरव्या प्रकाशात आपलं सारं शरीर भाजून निघतं आहे. असच सोनलला वाटत होतं. त्या असह्य वेदनांनी सोनल आक्रोश करत होती. ‘स्वामी ती आपली बळीची कुमारी आहे.’ खाल मानेने राजेश्वर पुटपुटला. ‘राजेश तू ...?’ जमिनीवर पडलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून एकाच वेळी संताप आणि आश्चर्याने उद्गार निघाले. तो आवाज ऐकला मात्र आणि वेदनेने विव्हळणाऱ्या सोनलने क्षणभर वेदना विसरून आवाजाच्या दिशेने पाहिलं.. आणि समोर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला पाहून ‘बाबा’ अशी अस्फुट हाक तिच्या तोंडून बाहेर पडली मात्र दुसऱ्या क्षणी सोनल बेशुद्ध पडली. तिन्हीसांजेची वेळ... नाडकर्णी वाड्याभोवती घुबडांचे घुत्कार ऐकू येत होते. रातकिड्यांची किरकिर सुरु झाली होती. वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश जणू मिणमिणता झाला होता. खरंतर वाड्या भोवती पसरलेल्या गडद हिरव्या काळोखाने आजूबाजूचा प्रकाश शोषून घ्यायला सुरवात केली होती. वाड्याची लाईट केव्हाची गेली होती. दिंडीदरवाजावर आढ्याला एक वटवाघूळ लटकले होते. त्याची अधून मधून होणारी फडफड वाड्याच्या आवारातली स्मशान शांतता भेदून टाकत होती. सविताबाईंनी कसाबसा तुळशीपाशी दिवा लावला आणि त्या भेदरलेल्या अवस्थेतच झपझप आतल्या दिशेला वळल्या. चार पावलं पुढे गेल्या आणि कसल्याश्या विचाराने त्यांनी फिरून मागे वळून पाहिलं तर... तुळशी समोर लावलेल्या दिव्याची ज्योत फडफड करत अचानक विझली. आजूबाजूला मात्र वाऱ्याची साधी झुळुकही नव्हती. सविता बाईंच्या काळजात धस्स झाल. त्या जीवाच्या आकांताने उपाध्यांच्या खोलीकडे धावल्या. गडद होत जाणारी हिरवी काळी सावली वाड्याभोवती आपले पाश आवळत चालली होती. फक्त उपाध्यांच्या खोलीतून पेटत असलेल्या हवनकुंडातील पिवळ्या-लाल ज्वालांचाच काय तो प्रकाश वाड्यात शिल्लक होता. वाड्यात रक्त गोठवणारा गारठा पसरला होता. सविताबाई धापा टाकत हवनकुंडा समोर येऊन बसल्या. आणि उपाध्यांच्या तोंडून निघालेल्या ॐकारचा दीर्घ नाद संपूर्ण नाडकर्णी वाड्यात घुमला. पाठोपाठ बाहेर घुबडांनी घुत्कार केला. ‘ग..ग..गु..गुरुजी.. म.. ला फार...भीती... वाटतेय हो..’ सविताबाईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. उपाध्यांनी पुन्हा एकदा ओंकार करून शांती मंत्र पाठणाला सुरुवात केली. मत्र पठण सुरु होताच.. हळूहळू त्या खोलीतील ताण कमी होत गेला. सविताबाई सावरून बसल्या. गेल्या सात दिवसात त्यांनी काय पाहिलं होतं सहन केलं होतं ते आठवून त्यांच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. दिवसा रात्री... कधीही घरात वावटळ शिरायची. घरातल्या वस्तूंची उलथापालथ व्हायची. मध्येच अंगणात झाडांना आग लागायची. पाणी टाकायला जावं तर आग अजून भडकायची. एकदातर सविताबाईंचा पदर जळता जळता वाचला होता. वाडा भग्नावस्थ बनला होता. रात्रीच्या वेळी सोनल किंवा शरदराव हाका मारत असल्याचा त्यांना भास व्हायचा. या सगळ्या प्रकाराला त्यांनी धीराने तोंड द्यायचा प्रयत्न केला होता. कारण याची पुसटशी कल्पना ध्यानाला बसण्याआधी उपाध्यांनी त्यांना दिलीच होती. मात्र आज ध्यानाचा शेवटचा दिवस.. आणि तुळशी समोर लावलेला दिवा विझला तेव्हा सविताबाईंचा धीर सुटला. उपाध्यांनी मात्र गेले सात दिवस स्वतःला खोलीत बंद केलं होतं. सात दिवस त्यांची ध्यानधारणा चालू होती. त्याचं तेज त्यांच्या मुखावरून ओसंडून वाहत होतं. . त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढे येणाऱ्या प्रसंगाला समोरे जाण्याची परिपूर्ण तयारी केली होती. पण... आज ध्यानाच्या वेळी त्यांनी जे दृश्य पाहिलं त्याचा त्यांना धक्का बसला होता. शंभर वर्षांपूर्वी पराकाष्ठेने रोखण्यात आलेला हा सैतानी खेळ अतिशय जवळच्या भावनिक आणि रक्ताचे संबंध असलेल्या व्यक्तीने सुरु केला होता. आणि हे आता एकट्या पडलेल्या सविताबाईना सांगणं.. आणि फक्त सांगणच नाही तर त्या व्यक्ती विरुद्ध लढण्याची त्यांची मानसिक तयारी करणं. हेच उपाध्यांसमोर मोठं आवाहन होतं. ‘सविताबाई कदाचित या प्रकरणात आपल्या सोनलचा बळी जाऊ शकतो.’ सविताबाई सारा धीर एकवटून उपाध्यांच्या तोंडून निघणारा एक एक शब्द काळजीपूर्वक ऐकत होत्या. ‘कदाचित शरदराव... परतणार नाहीत... कदाचित सोनल आणि शरदरावांच्या बदल्यात तुमच्याकडे काही काम पूर्ण करण्याची मागणी केली जाईल. कदाचित माझ्या नकळत तुम्ही माझी हत्या करावी असेही सुचवले जाईल. तुम्हाला अतिशय सावध राहावं लागणार आहे. ’ सविताबाईंचे हात-पाय गारठायला लागेल. सोनल आणि शरदरावांचा चेहरा त्यांच्या समोर तरळला.. त्यांनी पुन्हा उपाध्यांकडे पाहिलं. ‘पण.. पण माझ्या कडूनच...का... आणि कोण करून घेणार हे...’ सविताबाईंचा धीर सुटत चालला होता. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. ‘मन घट्ट करून ऐका सविताबाई..’उपाध्यांच्या आवाजाला धार आली होती. ‘हे सारं करणारा तुम्हलाही ह्या पापामध्ये सहभागी व्हायला लावणारा... हा... तुमचा सख्खा लहान भाऊ राजेश आहे..’ ‘काय?..’ सविताबाईना हे ऐकून फार मोठा धक्का बसला होता. ‘हो, सविता बाई हेच सत्य आहे. या सगळ्या प्रकरणात. ‘त्या’चा पुढचा शिलेदार म्हणजेच, शंभर वर्षानंतर होणाऱ्या या विधीचा कर्ता हा सर्वस्वी तुझा भाऊ राजेश आहे.’ सविताबाई दिग्मूढ झाल्या Read more....

पोर्णिमा - Akshay Watve

भयकथा...खऱ्या अर्थाने...रात्री जपून वाचा... विक्रम पोर्णिमा - अक्षय वाटवे भाग ५ उपाध्ये आपल्या खोलीत ध्यानस्थ बसले होते. पण मनात विचारांचं काहूर उठलं होतं. ज्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी एवढी खडतर साधना केली होती ते संकट आता सामोरं येऊन ठेपलं होतं. उपाध्ये त्या संकटाचा सामना करण्यासाठी घाबरत नव्हते. त्यांचं मन पोखरत होतं ते वेगळ्याच शंकेने. सोनलच्या बाबतीत घडलेल्या घटनेला चार दिवस होऊन गेले होते. बंदोबस्त म्हणून तिच्या खोलीत प्रवेश करता येईल अश्या सर्व बाजूंना उपाध्यांनी अभिमंत्रित विभूती पसरवून ठेवली होती. वाड्याच्या सभोवताली सुरक्षा कवचाने मंत्रवलेला पवित्र धागा गुंडाळला होता. सोनलच्या अंगात पुन्हा लालीताबाईंच्या आत्म्याने किंवा दुसऱ्या कोणत्याच दुष्ट शक्तीने प्रवेश करून नये म्हणून उपाध्यांनी सर्वतो परी काळजी घेतली होती. मंत्रविद्येच्या जोरावर त्यांनी पूर्ण वाडा सुरक्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण... हा 'पण'च त्यांना खटकत होता. ‘ही.. ही.. सोनल तयार झाली आहे.. बलीविधीला....’ ललिताबाईंचे शब्द उपाध्यांच्या कानात घुमत होते. त्यांना खटकणारी ही एकच गोष्ट होती. बलिदानासाठी जर खरच सोनल स्वेच्छेने तयार झाली असेल तर काळ्या शक्तीचं पारडं जड होणार होतं. त्र्यंबकशास्त्रींची कित्येक वर्षांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार होती. जर पौर्णिमेच्या रात्री ‘तो’ विधी निर्वेध पूर्ण झाला तर त्र्यंबकशास्त्रींना पुन्हा मनुष्य देह मिळणार होता. पिशाच्च, अतृप्त आत्मे आणि बलाढ्य काळ्या शक्तीवर त्यांची हुकुमत चालणार होती. त्यानंतर जे काही घडेल त्यावर कोणाचाच अंकुश राहणार नव्हता. ह्या सगळ्या विचारांनी उपाध्ये कमालीचे अस्वस्थ झाले होते. एवढ्यात खोलीचा उजवा कोपरा अतिशय तेजस्वी सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघाला. अरविंद उपाध्यांनी त्या प्रकाशाकडे पाहून हात जोडले. ‘मोह... आकर्षण... हेच विनाशाचं कारण असतं अरविंदा. आणि यातूनच भ्रम निर्माण केला जातो. फसवे सापळे तयार होतात. इथे भलेभले मोहात पडून बळी जातात तिथे सामान्यांची काय कथा.’ हा आवाज राघवशास्त्रींचा होता. कसला मोह... कसलं आकर्षण... हे नवं कोडं काय? उपाध्ये विचारांमध्ये गुरफटून गेले असतानाच त्यांच्या दारावर धडका बसू लागल्या.. बाहेर सविताबाई आणि शरदराव होते. ‘वाचवा... गुरुजी आम्हाला.. त्या बये पासून वाचवा... माझ्या सोनलला सोडवा हो..’ बाहेरून रडण्या ओरडण्याचा जोरजोरात आवाज येत होता. आसन सोडून शिताफीने उपाध्ये उठले आणि त्यांनी दरवाजा उघडला तर शरदराव पाठमोरे उपाध्यांच्या अंगावर कोसळले. त्यांच्या डाव्या दंडातून रक्ताची धार लागली होती. चेहरा नखांनी ओरबाडला होता. सविताबाईंच्या चेहऱ्यावरही बोचकारे आणि नखांचे ओरखडे दिसत होते. धडपडत आत शिरत सविताबाईनी धाडकन खोलीचा दरवाजा बंद केला. आणि त्यांनी जमिनीवर बसकण मारली. उपाध्यांनी दोघांना पाणी दिलं. ‘कोणी केलं’ उपाध्यांनी भावनांवर नियंत्रण मिळवत विचारलं? ‘सो.. सोनल..’ सविताबाई प्रचंड घाबरल्या होत्या त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. उपाध्ये तडक खोली बाहेर पडले. सोनल च्या खोलीपाशी आले. ‘सामना कर, तुझं खरं रूप दाखव, मुलीच्या अडून वार काय करतोस...’ उपाध्ये रागाने लालबुंद झाले होते. ‘अरविंद काका काय झालं?’ गोड आवाजात सोनलने बाहेर येत विचारलं... तिच्या निरागस मुद्रेकडे पाहून उपाध्येंच्या मनातले भाव पालटले. ‘ही मुलगी हल्ला करण अशक्य आहे..’ त्यांच्या मनात विचार येतो नं येतो तोच प्रचंड वेगाने सोनलने हातातला कोयता उपाध्यांच्या दिशेने भिरकावला... केवळ दैव बलवत्तर म्हणून उपाध्ये बचावले पण तरीही कोयता त्यांच्या उजव्या दंडाला चाटून गेला. त्याच्या तीक्ष्ण धारेने चोख काम बजावले होते. दंडातून वाहणारी रक्ताची धार दाबून धरत प्रतिकारासाठी उपाध्ये पुढे सरसावले. त्यांनी मान वळवून सोनल कडे पाहिलं मात्र आणि त्यांचेही डोळे विस्फारले. सोनलचे केस मोकळे सुटले होते. लाल बुंद रक्ताळलेले डोळे जणू आगच ओकत होते. तिने जबडा वासला होता. लांब जीभ लवलवत होती. दातांचे सुळे बाहेर आले होते. बोटांना तीक्ष्ण नख्या होत्या हात रक्ताने माखले होते. तिचा चेहरा अतिशय भयाण वाटत होता. हवेत दुर्गंधी पसरली होती. संपूर्ण वाडा काळ्या हिरव्या सावलीने घेरला होता. उपाध्ये मागे सरकले. सोनल आता त्यांच्यावर चाल करून येत होती. उपाध्ये मागच्या पावलाने आपल्या खोली पर्यंत जाण्याचा प्रयत्न करून लागले. एवढ्यात पायरीवरच्या वेलीत पाय अडकून खाली अंगणात पडले. उपाध्यांचे लक्ष पूर्ण विचलीत झाले होते. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांनी आपल्या खोली कडे नजर टाकली तर शरदराव आणि सविताबाई बाहेर येताना दिसल्या. त्यांनी त्यांना नजरेने थांबवण्याचा प्रयत्न केला पण आता उशीर झाला होता. सोनलचे त्या दोघांवर लक्ष गेले आणि तिने शरदरावांवर झडप घातली. शरदराव थोडक्यात बचावले. सोनल प्रचंड संतापली होती. कर्कश आवाजात ती किंचाळली आणि त्या किंचाळी सरशी काळीहिरवी सावली अजून गडद झाली. पाठोपाठ वटवाघळांच्या थव्याने शरदराव आणि साविताबाईंवर हल्ला चढवला. सारा वाडा वाघळांच्या कर्कश आवाजाने आणि सविताबाई आणि शरदरावांच्या आक्रोशाने भरून गेला. पुन्हा सोनल ने आपला मोर्चा उपाध्यांकडे वळवला. उपाध्यांच्या पायाला वेलींचा विळखा तसाच होता. त्यांनी मागे सरकण्याचा प्रयत्न केला. सोनलने शेजारी पडलेली कुदळ उचलली. उपाध्यांना वेलींनी जखडून टाकलं होतं. सर्वशक्तीनिशी सोनल वार करणार.. एवढ्यात एक तेजस्वी सुवर्ण शलाका वाड्यातला अंधार कापत मुख्यदरवाजातून आत शिरली आणि तिने सोनलच्या छातीचा वेध घेतला. सोनल कोसळली. भयभीत झालेले सविताबाई आणि शरदराव सोनल कडे धावले. उपाध्ये स्वतःला सावरत उभे राहिले. आणि तेही सोनलला पाहण्यासाठी उठले. मात्र तिघांनीही जमिनीवर पसरलेल्या शरीराकडे पाहिलं आणि पहाता पाहता त्या शरीराचं रुपांतर हिरवट काळ्या द्रवात झालं आणि क्षणार्धात तो द्रव जमिनीत झिरपून गेला. सारेच स्तब्ध झाले. दिंडी दरवाजातून तेजस्वी सोनेरी प्रकाश आला. त्यापाठोपाठ मानवी आकृती दिसू लागली. ‘तुम्ही भ्रमात अडकला. सत्य आणि आभास याच्या जाळ्यात फासल्याने अरविंदा तुझ्या शक्तीही क्षीण झाल्या.’ गुरुजी उपाध्यांनी नकळत हात जोडले. हा आवाज राघवशास्त्रींचा होता. ‘ती पाशवी माया होती...’ गुरुजी ती तर सोनल... राघवशास्त्री हसले, ‘ती सोनल नव्हतीच.. त्र्यंबकच्या नव्या शिलेदाराने टाकलेलं जाळं होतं ते आणि तुम्ही लीलया त्या जाळ्यात फसलात’ ‘मग सोनल कुठे आहे.. गुरुजी...’ उपाध्यांच्या या प्रश्नाला राघव शास्त्री उत्तर देणार एवढ्यात वाघळांची मोठ्ठी झुंड आली आणि त्या झुंडीने शरदरावांना उचलले. कोणाच्या काहीही लक्षात येण्याआधी ती वाघळ शरदरावांना घेऊन दिसेनाशी झाली. ‘अरविंदा, त्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आहे. आता तुझ्या साधनेची आणि तेजाची परीक्षा..’ (क्रमशः) Read more....

पोर्णिमा - Akshay Watve

चित्तथरारक असे एकाच शब्दात वर्णन करावी अशी ही भयकथा विलक्षण वळण घेते आहे... विक्रम पोर्णिमा - अक्षय वाटवे भाग – 4 शरदरावांनी खोलीच दार उघडलं आणि... त्यांच्या तोंडून अस्फुट किंकाळी बाहेर पडली. ते भयभीत होऊन मागे सरकले. सविताबाई आकांताने पुढे झाल्या मात्र समोरच्या दृश्यावर नजर पडताच अक्षरशः किंचाळत त्या खाली कोसळल्या. समोर सोनलचा पलंग हवेत तरंगत होता आणि त्याला आग लागली होती. मागे उभ्या असलेल्या उपाध्यांनी तातडीने आपल्या शबनम मधून चिमुटभर विभूती काढली आणि झपाट्याने त्यांनी ती सविताबाई आणि शरदरावांच्या कपाळाला लावली. दरवाजा जोरजोरात एकमेकांवार आदळत होता. शरदराव उपाध्यांच्या आधाराने उभे होते. सविताबाई मूर्च्छितावस्थेत पडल्या होत्या..सोनलच्या खोलीतून चित्रविचित्र आवाज आणि किंचाळ्या ऐकू येत होत्या. उपाध्यांनी संरक्षक कवच पठणाला सुरवात केली आणि दरवाजा ढकलला. समोर पलंग उलटा छताला टांगला होता. पलंगावरची गादी अर्धवट जळत होती. उपाध्यांची नजर सोनलचा वेध घेत होती अचानक दार आडून सोनल झपकन समोर आली तिचा चेहरा अतिशय भेसूर दिसत होता तोंडाच्या डाव्या बाजूच्या गालाची चामडी जाळून लोंबकळत होती अंगावरच्या कपड्यांनी पेट घेतला होता. अचानक तिने शरदरावांची कॉलर पकडून त्यांना आत खेचण्याचा प्रयत्न केला. उपाध्ये मागे सरकले. ज्या झपाट्याने सोनलने कॉलरला हात घातला होता त्याच तीव्रतेने चटका बसावा तसा हात मागे घेऊन तिने कॉलर सोडली. त्या झटक्याने शरदराव मागे फेकले गेले आणि ते भिंतीवर आदळले. छताला चिकटलेला पलंग धाडकन खाली कोसळला. सोनल पलंगावर झेपावली. उपाध्यांनी शरदरावांना आधार देत उठवले. विभूतीने तिचं काम केलं होतं किमान आत्ता तरी कोणालाच धोका नव्हता मात्र समोर काय आहे ते जाणून घेणं गरजेच होतं. उपाध्यांच्या मनात विचारचक्र वेगाने चालू लागलं. दरवाजा बंद झाला होता. आतून येणाऱ्या किंचाळ्या मात्र वाढल्या होत्या. ‘उपाध्ये माझी मुलगी...’ असं म्हणत बेभान झालेल्या शरदरावांनी टाहो फोडला. ‘शांत व्हा शरदराव तिला काही होणार नाही, हा फक्त विभ्रम आहे... सर्वात आधी आपल्याला साविताबाईंना सावरायला हवं.’ उपाध्ये कमालीच्या शांतपणे म्हणाले. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रचंड वेगाने बदलत होते. बोलता बोलता उपाध्यांनी सोनलच्या खोलीच्या दाराला भाहेरून कडी लावली. तेवढीच सुरक्षित असल्याची भावना. सविताबाईंना त्यांच्या खोलीत निट झोपवून उपाध्ये आणि शरदराव पुन्हा सोनलच्या खोलीकडे आले. आता मात्र कमालीची शांतता होती. शरदरावांनी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पलंगावर सोनल नव्हती. आणि मगाशी जळत असलेल्या पलंगावर जळाल्याची कणभरही खूण नव्हती. उपाध्ये पुढे झाले, खोलीत शिरले पाठोपाठ शरदराव होतेच. शरदराव सोनलला हाक मारू लागले. एका कोपऱ्यातून हुंदक्यांचा अस्पुट आवाज येत असल्याचं उपाध्यांच्या लक्षात आलं. त्यांनी शरदरावांना शांत केलं. उपाध्ये सावध झाले. त्यांनी शबनम मधून आसन काढलं, एका विशिष्ठ प्रकारच्या गवताचं बनवलेलं ते आसन त्यांनी जमिनीवर अंथरलं आणि त्यावर ते पद्मासन घालून बसले. ‘गुरुजी तुम्ही दिलेल्या दिलेल्या विद्येची आजवर मी जी साधना केली त्याची आज पासून परीक्षा सुरु होत आहे. मला बळ द्या, आशीर्वाद द्या. उपाध्येंच्या नजरसे समोर राघवशास्त्रींची प्रसन्न मुद्रा तरळली. त्यांनी ध्यानाला सुरवात केली. हळूहळू त्यांच्या भोवती अतिशय तेजस्वी वलय तयार होवू लागलं. शरदराव स्तिमित होवून हा प्रकार पहात होते. नकळत त्यांचे हात जोडले गेले. ‘या वेळी तुझा डाव यशस्वी होणार नाही ललिते, काळ बदलला आहे’ धीर गंभीर आवाजात उपाध्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. एकूणच खोलीचं वातावरण भारल्या सारखं झालं होतं. आणि ‘दादा, जाळलं हो मला जाळलं.... “ असं म्हणत कोपऱ्यात बसलेली सोनल धाडकन उपाध्यांच्या समोर येऊन कोसळली. ‘पाचशे वर्ष... झाली ललिते...’ उपाध्यांचा भारदस्त आवाज अधिकच गंभीर आणि खोल झाला होता. सोनल हमसून हमसून रडू लागली होती... ‘तेव्हाही तू असाच डाव टाकलास. तुला वाचवण्याचा मी प्रयत्न केला. पण तू माझ्यावरच उलटलीस , आणि त्यानंतर दर शंभर वर्षांनी हीच वेळ येऊन ठेपायची. हा अरविंदा पाचव्या पिढीतला..’ सोनलचं रड सुरूच होतं आता ते भेसूर होऊ लागल. ‘आजही तू त्याच उद्धेशाने आली आहेस मला पूर्ण कल्पना आहे..’ ‘दादा जाळलं हो मला त्यांनी... पण मुक्ती नाही दिली... सोडवा मला... सोडवा.. मला सोडवाल या फेऱ्यातून मी मी मदत करेन तुम्हाला.. नक्की मदत करेन’ सोनलच्या तोंडून ललिता बोलत होती.’ ‘थांब, लालीता गेली चारशे वर्ष प्रत्येक अनुयायाला तू हेच सांगून फसवलंस, मी फसणार नाही. माझ्या गुरुजींना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठीच गेली बारा वर्ष मी साधना करतो आहे आणि माझ्या कारकिर्दीतच मी हे कार्य पूर्ण करणार. पाचशे वर्षांपूर्वी त्यांनी सुरु केलेलं हे क्रूरचक्र मी थांबवणारच. ललीता तुला कधीच पूर्ण मुक्ती मिळणार नाही.. जोवर तू स्वेच्छेने सहकार्य करत नाहीस. कारण त्या साधनेत तू त्यांच्या बाजूने होतीस... बळी आणण्याची जबाबदारी तुझी होती. त्याही वेळी तूच बळी आणला होतास ’ हा आवाज अरविंदचा होता. आता मात्र खोलीत जे काही घडत होतं ते घाबरलेल्या शरदरावांच्या आकलनशक्ती पलीकडे होतं. ‘पण.. पण मी वचनबद्ध आहे हो... आणि आता आता पुन्हा ती वेळ आली आहे त्यांचे अनुयायी येत आहेत. यावेळी बलीविधी नक्की पूर्ण होणार आणि त्यासाठी निवड मलाच करावी लागणार. आजवर त्यांचे प्रयत्न शेवटच्या क्षणी फसले. तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा जीव पणाला लाऊन बलीविधी हाणून पाडला. पण ह्या वेळी तसं होणार नाही कारण..’ ‘का..?’ उपध्ये संतप्त झाले होते. ‘कारण ह्या वेळचा बळी स्वतःच्या इच्छेने या विधी साठी तयार झाला आहे..’ ‘कोण कोण आहे बळी?’ उपाध्यांनी विचारलं. आता मात्र ललिताबाईंचा आवाज बदलला होता. त्या विचित्र हास्य करत होत्या.. फक्त उपाध्यांच्या भोवती निर्माण झालेल तेजस्वी वलय सोडलं तर चारी बाजूने हिरवी काळी सावली दाटून आली होती... शरदरावांचा श्वास घुसमटू लागला. झोपलेल्या सविताबाईंचा श्वास घुसमटून त्या धडपडून बाहेर आल्या खोलीत पोचल्या. सोनलच्या अंगात संचारलेल्या ललीताबाईंच हास्य अजूनच जोराने आणि चित्रविचित्र होऊ लागलं होतं. ती अक्षरशः खदखदून हसत होती. संतप्त झालेल्या उपाध्यांच्या भोवतीचं वलय अजूनच तेजःपुंज बनलं. ‘ललीते कोण आहे स्वेच्छेने तयार झालेला बळी..?’ करड्या आवाजात उपाध्यांच्या तोंडून राघवशास्त्रींनी प्रश्न केला... ‘ही.. ही.. सोनल तयार झाली आहे.. बलीविधीला.... ‘काय...?’ तिघांच्याही तोंडून एकच प्रश्न आला... सोनल थंडगार पडली होती... Read more....